Tag: दीपावली
मराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा
मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेले गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळणे हे सारे कृषिसंस्कृतीतून, लोकसंस्कृतीतून झिरपलेले टिकून आहे...
गिरगावची दिवाळी – फराळ, अंघोळ, आकाशकंदिल…
पाठारे प्रभू ज्ञातीचे वास्तव्य दक्षिण मुंबईत प्राधान्याने होते. ते स्वतःला अस्सल मुंबईकर मानतात. त्या ज्ञातीमध्ये वर्षभर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. दिवाळीत पाठारे प्रभू पद्धतीचे सुकडी, तवसे, शिंगडी, भानवले, पंगोजी, मुम्बरे, बुंदीचे कडक लाडू असे पदार्थ केले जात. त्यांच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच तेथील विशिष्ट प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध होत्या. असे म्हणतात, की त्या रांगोळ्या बघण्यास त्या काळी ब्रिटिश अधिकारी घोडागाडीतून येत...
सामुदायिक आनंदाची नाशिकची दिवाळी
नाशिक हे मंदिरांचे गाव. तेथे असंख्य आळ्या, पेठा नि वाडे. तेथे ‘दिवाळी तोंडावर आली’ हा शब्दप्रयोग ऐकू येई तो भाजणीच्या खरपूस वासानं ! पूर्वी देवदिवाळी ही नाशिकची खरी खासीयत. श्रद्धा असणारे भाविक नाशिक या मंदिराच्या गावात दिवाळीत आले की हात जोडतात नि अप्रूपाने त्रिपुरी पौर्णिमेला एक पणती प्रवाहात सोडतातच...
असोशीने जगणारी व लिहिणारी लेखिका : वासंती मुझुमदार
वासंती मुझुमदारम्हणजे लेखणी व कुंचला याचा दुर्मिळ संगम असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कवितेचा उत्कट प्रतिमासृष्टी, चपखल शब्दकळा हा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यात मानवी नाती व त्याचा परस्पर संबंध याचे मनोज्ञ दर्शन घडते. वासंती यांच्या कुंचल्याची कधी लेखणी होते, तर कधी लेखणीचा कुंचला होतो ते कळत नाही...
दिन दिन दिवाळी: गाई-म्हशींचाही सण! (Diwali in Chaugaon Village in Old Days)
दिवाळीच्या दिवसांत, गाई-म्हशींना ओवाळण्याची पद्धत आमच्या चौगांवमधे माझ्या लहानपणी होती आणि मी स्वतः काही वर्षे गाई–म्हशींना ओवाळण्याचे काम केले आहे. #चौगाव हे धुळे जिल्ह्यात त्याच नावाच्या तालुक्यात आहे. माळी समाज हा इतर समाजांपेक्षा जास्त पुढारलेला समजला जाई. दूध देणारे पशू हे आमच्या समाजासाठी देव होत. म्हणून गाईगुरांना विशेष मान आमच्या गावात दिवाळीच्या सणाला असायचा. दिवाळी हा जसा भाऊबहिणीचा सण असतो तसा तो आमच्या गावात गाई-म्हशींचापण सण असायचा...
दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती
तमाम महाराष्ट्रातील परस्परविरोधी (आणि परस्पर पूरकही!) विचारांच्या लोकांचे विराट सांस्कृतिक संमेलन जर कोठे पाहण्यास मिळत असेल तर ते फक्त मराठी दिवाळी अंकांमध्ये! साहित्य हे...
दिवाळी अंक आणि आपण
दिवाळी दरवर्षी आली, की मराठी लोकांना तीन गोष्टी हमखास आठवतात - दिवाळी फराळ, फटाके आणि दिवाळी अंक ! फराळाचा अनुस्युत भाग असतो अभ्यंगस्नानाचा. टीव्हीवरील...
अभ्यंगस्नान
अंगाला तेल, उटणे व अत्तर लावून उष्णोदकाने (गरम पाण्याने) स्नान करणे याला अभ्यंगस्नान करणे म्हणतात. त्याला मांगलिकस्नान असेही नाव आहे. ती चाल प्राचीन काळापासून...
बलिप्रतिपदा – दिवाळी पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक...
भाऊबीज (Bhaubij)
कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे),...