Tag: गंगाधरराव नेवाळकर
पारोळा – झाशीच्या राणीचे गाव (Parola – A town with history and Mythology)
पारोळा हे ‘मेरी झांसी नही दुंगी’ असे बाणेदार उद्गार काढणारी मर्दानी झाशीची राणी यांचे माहेर. तांबे हे त्यांचे माहेरचे आडनाव. त्यांचे वंशज पारोळ्यात राहत आहेत. कंगना राणावतने रंगवलेल्या ‘मणिकर्णिका' चित्रपटातील झाशीच्या राणीच्या तडाखेबंद भूमिकेने केवळ एकोणतीस वर्षे आयुष्य लाभलेल्या त्या मर्दानीचा इतिहास पुन्हा जगासमोर आला...
झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्या एकोणीसाव्या शतकात ब्रिटीशांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'विरोधात झालेल्या 1857 च्या स्वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. त्यांनी त्या उठावात गाजवलेल्या शौर्यामुळे त्या क्रातिकारकांचे स्फूर्तीस्थान होऊन गेल्या...