Tag: कलाकार
धनगरी लोककलांच्या संवर्धनाचा अनोखा अविष्कार
धनगरी लोककला संवर्धनासाठी एक दिवसाचे शिबिर कोल्हापूरजवळ कसबा बावडा येथे झाले. धनगरी लोककलांमधील पंचवीसाहून अधिक प्रकार सुमारे अडीचशे कलाकारांनी सादर केले. तो अनोखा व अफाट आविष्कार ठरला. तीन संस्थांनी एकत्र येऊन एवढा मोठा घाट घातला होता. हालमत सांप्रदाय मंडळ (कुपवाड), शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोक संस्कृती केंद्र आणि कसबा बावडा येथील बिरदेव धनगर समाज मंडळ या त्या तीन संस्था...
अचलपूरचा समाजसुधारक कलावंत – राजा धर्माधिकारी
अचलपूरच्या सांस्कृतिक विश्वातील हरहुन्नरी हास्य कवी, कलाकार राजा धर्माधिकारी म्हणजे दिलखुलास गप्पांचा धबधबाच ! नर्म विनोदी कोट्या करून वातावरण हलकेफुलके करण्याची त्यांची लकब मनाला भावते. ते हातचे काही न राखता भरभरून बोलत असतात, तो वऱ्हाडी संभाषणाचा नमुनाच ठरून जातो...
गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर
मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…
निलेश उजाळ यांना ओढ कविता-गीतांची
निलेश उजाळ यांनी ते चौथीत असताना काटकर वाडीच्या जाखडी नृत्यामधून गायकी सुरू केली. छोटा कलाकार गात आहे म्हणून पंचक्रोशीतील लोक त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी करत. गुरूंनी लिहिलेली गाणी गाणारा निलेश, पुढे स्वतः गाणी लिहू लागला. तेच निलेश उजाळ कवी, गीतकार म्हणून टीव्ही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत...
अचलपूरची नृसिंह जयंती – दोनशे वर्षांची परंपरा
श्री नृसिंह जन्मोत्सव वैशाख शुक्ल चौदाला अचलपूरच्या सावरकर नगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. दशावतारातील चौथा अवतार हा नृसिंहाचा. त्या अवतारामागील कथा या दिवशी भक्तिमय वातावरणात नाट्यरूपाने अचलपूर येथे साकारली जाते. हे रोमांचकारी नाट्य गेली दोनशे वर्षे साकारले जाते...
माझा संगीत सत्संग
संगीत हे क्षेत्र व्यापक, विस्तीर्ण आहे, ते मानवनिर्मित आहे; त्यात साक्षात्कारी क्षण/अनुभव असले तरी ते माणसांनी अनुभवलेले असतात आणि त्यांनीच ते आत्मसात करून गळ्यातून/वाद्यांमधून प्रथमतः स्वतःच्या आनंदासाठी आणि परिणामस्वरूप म्हणून श्रोत्यांशी तो आनंद वाटून घेण्यासाठी साकारलेले असतात...
अजिंठा – पिंपरे पितापुत्रीचा ध्यास (Ajintha – Dedicated Efforts by Pimpare Father & Daughter)
बौद्ध जातककथा अजिंठा लेण्यांमध्ये चित्रांतून मांडल्या गेल्या आहेत. त्यात साधारणत: पाचशेसत्तेचाळीस जातककथा आहेत. त्यांतील पंधरा-वीस चित्रे अजूनही ठळक दिसतात. बाकी चित्रे धूसर होऊन गेली आहेत.
छंदमय जीवन जगणारे शिक्षक – शंकर माने
शंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या...
दहा वाजून दहा मिनिटांनी – संतोष हुदलीकर
संतोष हुदलीकर. त्यांनी आठ वर्षांपूर्वी, 2010 साली दहाव्या महिन्यात दहा तारखेला सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मान्यवरांच्या हस्ते दहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील त्यांच्या स्वतःच्या...
लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार!
लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या...