Tag: उपळं
आनंदप्रवासी रवींद्र पिंगे
रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला...