Home Tags अनिल जोशी

Tag: अनिल जोशी

हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल ! – परिचर्चा

जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता...

सांस्कृतिक जग कोठे हरवले?

महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन चा सद्भावना दिवस

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे सद्भावना दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशनच्या संस्कृतिकारणाच्या उद्देशाला धरून परिसंवाद-मुलाखती असे कार्यक्रम शनिवार, 22 मार्च 2025 ला योजले आहेत. त्यात सतीश आळेकर, नीरजा, ‘अंतर्नाद’चे संपादक अनिल जोशी, मिलिंद बल्लाळ, कवी आदित्य दवणे अशा मान्यवरांचा समावेश आहे. तेवढ्याच महत्त्वाची आणखीही एक गोष्ट त्या मुहूर्तावर साधत आहोत. ती म्हणजे गिरीश घाटे रचित व्ही. शांताराम यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन. ते नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. किरण शांताराम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत...