Tag: अंबाजोगाई
श्रीयोगेश्वरी (अंबाजोगाई) : योगमार्गातील शक्तिपीठ
अंबाजोगाईची श्री योगेश्वरी ही महाराष्ट्रीय देवी भक्तांची श्रद्धेय देवता आहे. ती बहुसंख्य चित्पावन घराण्यांची कुलस्वामिनी कुलदेवताही आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे स्थान महाराष्ट्रात तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. ते अनेक संतांचे वसतिस्थान आहे. देवीची स्थापना दहाव्या-अकराव्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे गावात असलेल्या सात शिलालेखांवरून समजते. योगेश्वरीचे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी आहे...
बेणीखुर्दचे कालभैरव- योगेश्वरी मंदिर (Benikhurd’s Kalbhairav- Yogeshwari Temple)
कालभैरवाची मंदिरे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहेत. त्यांची नावे ज्योतिबा, भैरोबा, खंडोबा आणि रवळनाथ अशी आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील बेणीखुर्द येथील कालभैरव- योगेश्वरीचे देवस्थान ही त्या आसमंतातील लोकांची ग्रामदेवता आहे, मात्र ते कुलदैवत शेरे, दळी, कुष्टे आणि बाहेरून कोकणात येऊन स्थायिक झालेले खेर व हर्डीकर ह्या घराण्यांचे आहे. खेरांचे मूळ गाव अंबाजोगाई. ते अंबाजोगाईकडून कोकणात आले, म्हणून तेथील देवता जोगेश्वरी-कालभैरव ही त्यांची कुलदेवता झाली...
अंबाजोगाईतील पुस्तक चळवळ
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच...
ऊर्जाप्रबोधक – पुरुषोत्तम कऱ्हाडे
आयुष्यात काही अनवट वाटा धुंडाळताना स्वत:चे संस्कार व बौद्धिक शक्ती यांचे संमीलन करून त्याचा उत्कृष्ट परिपोष करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम कऱ्हाडे होय! कऱ्हाडे...
दासोपंतांची पासोडी
मराठी साहित्यशारदेचे महावस्त्र
पासोडी सध्या मात्र कुणीही हात लावला तरी तुकडे पडतील अशा जीर्णावस्थेत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी दिलेल्या काचेच्या कपाटात अंबाजोगाई येथे...
अपनी पसंद की जिंदगी
मी अहमदपूरला महात्मा गांधी महाविद्यालयात शिकत होतो, त्या वेळी प्रा. निशिकांत देशपांडे यांच्यासोबत अंबाजोगाईला जाऊन अमरला पहिल्यांदा भेटल्याचे मला आठवते. मी १९८५ साली चंद्रकांत...