काकाचीवाडी या माझ्या गावाचा इतिहास बागणी गावाशी जोडलेला आहे. काकाचीवाडीहे गाव पूर्वी वेगळे, स्वतंत्र नव्हतेच. बागणीमध्ये काकाचीवाडी, फाळकेवाडी, चंदवाडी, रोजावाडी व पांढरमळा ही गावे एकत्रित होती. ती गेल्या चार दशकांत स्वतंत्र झाली आहेत. ती सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात, कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेजवळ आहेत.