टाळ

0
421
tal

 टाळ हे घनवाद्य आहे. द्रोणाच्या आकाराचे दोन पितळी तुकडे असतात. ह्या तुकड्यांच्या मधोमध थोडा फुगवटा असतो. फुगवट्याच्या मधोमध छिद्र पाडून त्यातून दोर ओवतात व फुगवट्याच्या आतील बाजूस दोराची गाठ मारतात. दोन टाळ हातांत घेऊन एकमेकांवर आघात करून ताल धरतात. क्वचित्, दोन्ही टाळ एका हातात घेऊनही वाजवतात. तुकोबा म्हणतात –

एका हाती टाळ,
एका हाती चिपळिया
घालती हुंमरी एक
वाताती टाळिया

 

टाळ जसे पितळी असतात तसे ते दगडी किंवा इतर धातूंपासूनही बनवतात. काशाचे टाळ उत्तम नाद देतात.

टाळांचे काही प्रकार असे आहेत :

देवादिकांच्या आरत्या म्हणताना वापरले जाणारे आरत्यांचे टाळ. गुजराती संगीतासाठी वापरले जाणारे विशिष्ट गुजराती टाळ. नृत्याच्या वेळी ताल धरण्यासाठी छोटी मंजरी किंवा छोटी मंजिरी टाळ. त्याखेरीज कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम्, मोहिनीअट्टम्, मणिपुरी इत्यादी नृत्यप्रकारांत ठेका धरण्यासाठी वेगळे टाळ असतात. दाक्षिणात्य संगीतासाठी बाजाचे खास छोट्या आकाराचे दाक्षिणात्य टाळ. सुपारीची किंवा स्पर्धेची भजने म्हणताना किंवा वारक-यांना लागणारे धंदेवाईक टाळ. लहान आवाजाच्या टाळांना ‘शक्ती’ असे म्हणतात तर मोठ्या आवाजाच्या टाळांना ‘शिव’ म्हणतात.

संदर्भ :

1. भारतीय संस्कृतिकोश, खण्ड तिसरा, पृ. 719

2. वाघे, सुरेश पांडुरंग, संकल्पनाकोश (अप्रसिध्द)

– सुरेश वाघे
दूरध्वनी  (022)28752675

About Post Author