Home Search

साहित्य संमेलन - search results

If you're not happy with the results, please do another search

सव्विसावे साहित्य संमेलन (Twenty Sixth Marathi Literary Meet – 1941

सव्विसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विष्णू सखाराम ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर हे होते. ते संमेलन 1941 साली सोलापूर येथे झाले. खांडेकर हे शिक्षकी पेशातील, सतत दारिद्र्याशी झुंज देत असलेले सात्त्विक प्रकृतीचे गृहस्थ होते. साहित्य हे मनात उच्च हेतू ठेवून लिहिले गेले पाहिजे अशी त्यांची धारणा होती.

पंचविसावे साहित्य संमेलन (Twenty Fifth Marathi Literary Meet – 1940)

पंचविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ना. सी. फडके हे होते. ते संमेलन रत्नागिरी येथे 1940 साली भरले होते. ना. सी. फडके यांची जनमानसात प्रतिमा प्रतिभासंपन्न, चतुरस्त्र लेखन करणारा लोकप्रिय साहित्यिक अशी होती.

चोविसावे साहित्य संमेलन (Twenty fourth Marathi Literary Meet – 1939)

नगर येथे 1939 साली भरलेल्या चोविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महामहोपाध्याय पद्मभूषण दत्तो वामन पोतदार हे होते. ते इतिहाससंशोधक होते. ते पट्टीचे वक्ते होते.

तेविसावे साहित्य संमेलन (Twenty Third Marathi Literary Meet – 1938)

मुंबई येथे भरलेल्या तेविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. विज्ञाननिष्ठ, प्रखर बुद्धिवादी आणि तरीही कविहृदयाचे ते प्रचंड ताकदीचे लेखक. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले.

बाविसावे साहित्य संमेलन (Twenty Second Marathi Literary Meet – 1936)

जळगाव येथे भरलेल्या बाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन होते. माधव ज्यूलियन आधुनिक उत्तम कवी, छंदोशास्त्राचे अभ्यासक, फार्शीभाषेचे उत्तम जाणकार, भाषाशुद्धीला स्वत:चे आयुष्य अर्पण करणारे, फार्शी-मराठी कोशाचे जनक होते.

एकविसावे साहित्य संमेलन (Twenty First Marathi Literary Meet- 1935)

इंदूर येथे भरलेल्या एकविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष औंध संस्थानचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी होते. ते विद्याव्यासंगी होतेच, पण कलांचेही भोक्ते होते. त्यांनीच महात्मा गांधी यांच्या सल्ल्याने त्यांच्या संस्थानात पहिली रयतसभा स्थापन केली...

विसावे साहित्य संमेलन (Twentyth Marathi Literary Meet 1934)

साव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर हे होते. संमेलन बडोदे येथे 1934 साली भरले होते. त्या संमेलनातच कृष्णराव मराठे यांनी अश्लीलतेविरुद्धचा ठराव आणला होता.

एकोणिसावे साहित्य संमेलन – Nineteenth Marathi Literary Meet 1933)

एकोणिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे होते. ते संमेलन नागपूर येथे 1933 साली भरले होते. खाडिलकर यांची ख्याती थोर नाटककार, झुंझार पत्रकार आणि लोकमान्य टिळक यांचे अनुयायी व देशभक्त अशी होती.

अठरावे साहित्य संमेलन (Eighteenth Marathi Literary Meet 1932)

अठराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे होते. ते संमेलन कोल्हापूर येथे 1932 साली भरले होते. मात्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड संमेलनाला हजरच राहू शकले नाहीत !

सतरावे साहित्य संमेलन (Seventeenth Marathi Literary Meet – 1931)

हैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी ‘गोविंदपौत्र’ या टोपणनावाने कविता लिहिल्या...