Home Search

व्यास - search results

If you're not happy with the results, please do another search

माझी पुंजी : मला भेटलेली माणसे !

पद्मिनी दिवेकर शिकागोच्या नेपरव्हिल नावाच्या उपनगरात गेली सत्तावीस वर्षे राहत आहे. त्या नवरा सतीश आणि मुलगी गार्गी भारतातून अमेरिकेला गेले. त्या भारतात ‘कोशीश स्कूल फॉर द डेफ’ ह्या मालाड येथील बहिऱ्या मुलांच्या शाळेत शिक्षिका 1987 ते 1993 पर्यंत होत्या. त्या अमेरिकेत गेल्यानंतर तेथील प्रिस्कूलमध्ये आणि नंतर हायस्कूलमध्ये टीचिंग असिस्टंट म्हणून नोकरी काही वर्षे करू लागल्या. त्यांना पुन्हा स्पेशल एज्युकेशन शिक्षिका व्हावेसे वाटत होते. त्यांनी अमेरिकेत स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या विषयातील असिस्टंट म्हणून इलिनॉईस राज्याच्या अर्ली इंटरव्हेन्शन अंतर्गत काम करतात. त्यांच्या घरापासून पंचवीस मैलांच्या परिघात शून्य ते तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांना घरी जाऊन स्पीच थेरपी देतात. त्या हे काम पंधरासोळा वर्षे करत आहे...

पहिली सिग्नल शाळा ठाण्यात ! (Innovative Signal School in Thane)

ठाणे शहरातील तीन हात नाक्यासह विविध सिग्नलवर भटक्या-विमुक्त जमातींतील शंभराहून अधिक मुले पुलाखाली आश्रय घेऊन राहत होती. पैकी तीन हात नाक्यावरील मुलांचे तेथील वास्तव्य संपुष्टात आले. मुलांचे वडील तेथेच वाढले. मुलांचे जन्म आणि बालपण पुलाखालीच गेले. खरे तर, असे दृश्य एकट्या ठाणे शहरात नसून अशी शेकडो मुले भारतातील प्रत्येक महानगरामध्ये जगत असतात. सरकार शिक्षणप्रसारासाठी अनेक मोहिमा करत असते. तथापी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास राहिलेली ही मुले मुख्य धारेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास अपात्र ठरतात. अशा वेळी, ठाण्याच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेची ‘सिग्नल शाळा’ सुरू झाली...

मुचकुंदी : विशाळगडापासून पूर्णगडापर्यंत !

मुचकुंदी ही कोकणातील नदी. तिला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. तिचा जन्म होतो विशाळगडाजवळ आणि ती समुद्राला मिळते पूर्णगडाशेजारी ! एका गडाजवळ उगम पावत अन्य एका गडाजवळ समुद्रात अंतर्धान पावणारी ही एकमेव नदी असावी. मुचकुंदी नदी अनेक गावांना सुजलाम सुफलाम करत पूर्णगड खाडीत उतरून अरबी समुद्राला मिळते. मुचकुंद ऋषींची गुहा लांजा तालुक्यातील माचाळ या गावात आहे. माचाळ हे गाव ढगांचे माहेरघर, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. गिर्यारोहक माचाळ-विशाळगड असा ट्रेक करतात...

वैभवशाली लातूर (Latur’s cultural affluance)

मला लातूर, कानापूर-मोहा आणि मुंबई ही गावे व्यक्तिगत जिव्हाळ्याची वाटतात. लातूर हे माझे जन्मगाव. लातूर सध्या शिक्षणवर्गांसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून गाजत असते. माझे लातूरशी भावनिक नाते आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथे झाले. बीड जिल्ह्यातील कानापूर-मोहा हे माझे वडिलोपार्जित गाव. मी उच्च शिक्षण व व्यवसायक्षेत्र म्हणून मुंबई महानगराशी ममत्वाने जोडला गेलो आहे. देश आणि राज्य स्तरावर नोंद घेता येईल असा भौगोलिक वा नैसर्गिक समृद्धीचा वारसा न लाभलेले लातूर गाव ! मात्र ते भूकंपामुळे सर्व जगास परिचयाचे झाले. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असल्याने लातूर गावाचा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन आढावा घेत आहे. लातूर गावास प्रागैतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ती तेथे प्राप्त झालेल्या शिलालेखांतून सिद्ध होते...

त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्याचे आध्यात्मिक मूल्य (Prof T V Sardeshmukh took criticism to spiritual...

त्र्यं.वि. सरदेशमुख यांची जन्मशताब्दी 2020 साली झाली. त्यांची मुख्य ओळख कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून आहे. त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. त्यांच्या साहित्यकृतीचा लेखक निशिकांत ठकार यांनी लेखस्वरूपात घेतलेला आढावा...

नीतिन वैद्य यांनी रचलेला त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा विचारकोश (T V Sardeshmukh’s world of...

सोलापूरचे नीतिन वैद्य यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एक, ‘त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्य- संदर्भ साहित्य : सूची आणि चरित्रपट’ हे पुस्तक व दोन, ‘जवळिकीची सरोवरे’ हे पुस्तक. यांपैकी पहिले पुस्तक सूची वाङ्मयाचे आहे. त्यात सूचिकाराने स्वतः प्रास्ताविक जोडलेले आहे. त्यातून, सूचिकाराने सरदेशमुख यांच्या साहित्याचा शोध कसा घेतला, त्यास कोठे कोठे हिंडावे-फिरावे लागले, आर्जवे-मिनतवाऱ्या कराव्या लागल्या या शोधाची मन पिळवटून टाकणारी कहाणी आहे. त्याने स्वतःच्या शारीरिक मर्यादांची तमा न बाळगता केलेली ती धडपड थक्क करणारी आहे ...

उदयन वाजपेयींची संवादयात्रा- शम्सुर्रहमान फारूकी (Udayan Vajpayee Interviews: Shamsur Rahman Faruqi)

उदयन वाजपेयी हे हिंदीमधील आघाडीचे लेखक. त्यांनी त्यांच्या दीर्घ लेखन कारकिर्दीत कथा, कविता, कादंबरी, प्रवासवृत्तांत-समीक्षात्मक निबंध, अनुवाद असे अनेकविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले आहे. त्यांनी स्वत:च्या लेखनाबरोबरच समकालीन प्रतिभावंतांचे विचारविश्व जाणून घेण्याच्या उद्देशाने काही दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्या मुलाखतींपैकी शम्सुर्रहमान फारूकी यांच्या मुलाखतीविषयी परिचयात्मक लेख निरंतर वाचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नितीन वैद्य यांनी लिहिला आहे...

मुरुडचे दुर्गादेवीचे विलोभनीय मंदिर (Murud: Beautiful Temple of Goddess Durga)

1
दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते. मुरुडच्या दुर्गादेवीच्या देवळाची कथा तशीच आहे. मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्धपुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले. तशी बखर आहे. गंगाधर भट समुद्रकाठाकाठाने सोळाव्या शतकात सौराष्ट्रातून आले होते. मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली. मंदिरे स्थापन झाली. तरी एक भय राहिले. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे सावट असे. गावे लुटली जात. म्हणून रक्षणकर्त्या दैवताचे सान्निध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले...

संगमनेरची सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था (आठ कंदील ते एलइडी लाईट)

संगमनेरच्या नगरपालिकेने कामकाज 1860 मध्ये सुरू केले आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या बाबतीत एकेक प्रगती सुरू झाली. गाव अगदी छोटे असल्याने गावात आठ महत्त्वाच्या सार्वजनिक जागा निश्चित करून, तेथे लाकडी खांब 1860 साली रोवले गेले. त्या खांबांवर आठ कंदील लावण्यात आले. रोज संध्याकाळी अंधार पडण्याच्या वेळी नगरपालिकेचा एक कर्मचारी येऊन, त्या कंदिलाची काच पुसून तेलपाणी करी आणि कंदील पेटवून जात असे. लोकांना त्या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटे...

पातंजल योगदर्शन (Paatanjal Yogdarshan)

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाभ्यास करण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. जागतिक पातळीवर तो व्यायामाचा प्रकार म्हणून लोकप्रिय होत आहे. योग दिन (21 जून) हा जगातल्या अनेक देशांमध्ये साजरा होतो. भारताने जगाला दिलेल्या महत्त्वाच्या देणग्यांपैकी योग ही एक देणगी आहे. मात्र ही देणगी भारताला दिली आहे ती पतंजली या इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या मुनींनी. योगाचे मूळ काय आहे आणि पतंजलींनी त्याचा अभ्यास करण्याची सांगितलेली पद्धत याचा सोप्या भाषेत परिचय करून देत आहेत पत्रकार आणि लेखिका वृषाली मगदूम...