Home Search
वाचन संस्कृती - search results
If you're not happy with the results, please do another search
मोगरा फुलला !
मराठी साहित्यविश्वातील कवयित्री व भाषा अभ्यासक सुनंदा भोसेकर आणि आघाडीच्या ललित लेखिका राणी दुर्वे या दोघी ‘मोगरा फुलला’ या नावाचे नवे दालन घेऊन थिंक महाराष्ट्र वेबपोर्टलच्या समूहात दसऱ्यापासून सामील होत आहेत. दालनात संवेदनाक्षम व जाणीवसमृद्ध अशा अनेक लेखकांचे विविध विषयांवरील साहित्य/कला/विचारसमृद्ध असे लेखन तेथे प्रसिद्ध होईल. त्यामधून सद्भावना व सुसंस्कृतता या गुणांचा परिपोष व्हावा आणि मराठीतील समृद्ध सांस्कृतिक जग पूर्वगुणवत्तेने प्रकट व्हावे असा प्रयत्न आहे...
धनगरी लोककलांच्या संवर्धनाचा अनोखा अविष्कार
धनगरी लोककला संवर्धनासाठी एक दिवसाचे शिबिर कोल्हापूरजवळ कसबा बावडा येथे झाले. धनगरी लोककलांमधील पंचवीसाहून अधिक प्रकार सुमारे अडीचशे कलाकारांनी सादर केले. तो अनोखा व अफाट आविष्कार ठरला. तीन संस्थांनी एकत्र येऊन एवढा मोठा घाट घातला होता. हालमत सांप्रदाय मंडळ (कुपवाड), शिवाजी विद्यापीठाचे राजर्षी शाहू लोक संस्कृती केंद्र आणि कसबा बावडा येथील बिरदेव धनगर समाज मंडळ या त्या तीन संस्था...
प्रशांत परांजपे : समाजभान जपणारा बहुरूपी
प्रशांत परांजपे पाक्षिक ‘सर्वांगीण निवेदिता’ आणि ऑनलाईन पत्रकारितेतील ‘निवेदिता फास्ट न्यूज’ अशी दोन नियतकालिके चालवतात. त्याशिवाय ते इतर वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लेखन करत असतात. त्यांनी प्लास्टिकविरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे आणि प्रदूषण व अस्वच्छता यांना विरोध केला आहे. वृक्षतोड थांबावी म्हणून मोहिमा आखल्या आहेत. खासगी स्वयंसेवा हे तर त्यांचे स्वत:चे खास क्षेत्र. प्रशांत व्याख्याने, लेख, बातम्या अशा माध्यमांतून कोकणासमोर सतत येत राहिले आहेत. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची दापोली शाखा जालगावातून चालवली...
दापोली- मुरुडचे कर्वे पितापुत्र
धोंडो केशव कर्वे व त्यांचे चिरंजीव रघुनाथ धोंडो कर्वे या दोन समाजसुधारक नररत्नांनी त्यांच्या लोकोत्तर कार्याने दापोलीतील मुरूड गावाची ओळख साऱ्या जगाला करून दिली; जनरीत बदलली ! पिता व पुत्र पुरोगामी, प्रगत विचारसरणीचे, अनिष्ट रूढींविरूद्ध झगडणारे समाजसुधारक होते. दोघांमध्ये धारदार बुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन व समाजाच्या सुखासाठी झटण्याची निस्पृह सेवावृत्ती होती. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्या आयुष्याचे योगदान स्त्रियांचे शिक्षण, विधवा विवाह या कार्यासाठी दिले...
मुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी
दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसले आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे...
नास्तिकांची दापोली
कोकणी माणूस त्याचे कुळाचार, त्या त्या समाजाने ठरवलेल्या रूढी-प्रथा-परंपरा कटाक्षाने पाळणारा आहे. कोकणवासी मंडळी धार्मिक सण-उत्सव यांत वर्षभर मग्न व दंग असतात. तरीही दापोली तालुक्यातील नास्तिक नमुने त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात याचा मला अचंबा वाटत आला आहे. दापोलीतील निरीश्वरवादी मंडळींवर उपजत चिकित्सक वृत्ती, वाचन, नास्तिक मंडळींचा सहवास आणि समाजवादी धोरण या घटकांचा प्रभाव दिसून येतो...
निसर्गदत्त महाराज – आधुनिक उपनिषदकार
‘I AM THAT’ हा ग्रंथ जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्धी पावला आहे. ग्रंथाचे भाषांतर त्या त्या देशातील भाषेतही झाले आहे. त्याची भाषांतरे विविध भारतीय भाषांमध्ये झाली आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील विद्वद्जनांनी त्या ग्रंथाला आधुनिक उपनिषद म्हणून गौरवले आहे. त्या ग्रंथामुळे जगातील कानाकोपऱ्यातून शेकडो अभ्यासू, पंडित, संशोधक यांची जणू रीघ भारतात आधुनिक काळात लागली ! या ग्रंथाचे कर्ते निसर्गदत्त महाराज या नावाने ओळखले जातात...
बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता व विविध कामगिरी
जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात. प्रबोधनाचे ते त्यांचे कार्य थोर आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात पत्रकारिता, शिक्षण, इतिहास, पुरातत्त्व संशोधन, पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान, सामाजिक व धार्मिक जागृती व सुधारणा, शालेय पाठ्यपुस्तके, गद्य-पद्य इत्यादी क्षेत्रांत महत्तम कार्य केले आहे...
भाषादूत मॅक्सिन बर्नसन
मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...
मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान
अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...