इतिहासाला मर्यादा आहे. तो माणसाच्या खोल अंतर्मनात शिरू शकत नाही; काव्य मात्र माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेऊ शकते. म्हणूनच श्रीकृष्णाचे काव्य व बुद्धाचे मिथक माणसाला अंतरी खोलवर झेप घेण्यासाठी समर्थ करू शकते. पाश्चिमात्य लोक जेव्हा तुलसीदास वाचतात तेव्हा ते म्हणतात, की हा इतिहास नव्हे, कल्पित आहे ! बरोबरच आहे ते. तो इतिहास नाहीच आहे. कल्पितच आहे ते. तरीसुद्धा तुलसीदास हा कवी संत लूक याने ख्रिस्ताला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा अधिक न्याय श्रीरामाला देतो...
नववे साहित्य संमेलन 1915 साली मुंबई येथे मिरज संस्थानचे संस्थानिक श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. गंगाधरराव पटवर्धन हे तसे पाहिले तर साहित्यिक नव्हते.
रायरंद किंवा बहुरूपी म्हणजे अनेक रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारा लोककलावंत. रायरंद, रायरंद्र, रार्इंदर हे शब्द मराठी भाषेतील रायविनोदी म्हणजे विदूषक, बहुरूपी, खुशमस्कऱ्या या अर्थाने वापरले जातात...
विष्णूच्या भक्तीचे कार्य ईशान्येकडील राज्यांत करणारे महापुरुष म्हणजे श्री शंकरदेव. त्यांची वैष्णव चळवळ आसाम राज्यात ‘महापुरुषीय धर्म' या नावाने प्रसारित झाली. विष्णुभक्ती भारताच्या विविध प्रांतांत चैतन्य महाप्रभु, संत कबीर, बसवेश्वर, रामानंद यांनी नेली;
विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’ ग्रंथात आढळतो. तो वैदिक देव नव्हे. विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात फक्त पाच सूक्तांत आहे.
शैव हा शिवदेवतेला उपास्य दैवत मानणारा संप्रदाय आहे. शिवाची उत्पत्ती प्रागवैदिक काळातील आहे. वैदिक युगाच्या प्रारंभी शिव नावाचा देव आढळत नाही. तथापी शिवलिंग उपासनेचे पुरावे हे हडप्पा संस्कृतीमध्येही सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीमधील समाज हा शिवाची पूजा करत असावा असे निदर्शनास आले आहे.
विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’...
मराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव,...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली, छत्रपती शिवाजी राजांना ‘भवानी’ तलवार प्रदान करणारी, त्यांची प्रेरणाशक्ती, तुळजापूरची ‘तुळजाभवानी’ अनेकांची आराध्य दैवत आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत धावणारी ती...
आषाढाचा पहिला दिवस माझ्यासाठी वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा असतो. खरे तर, महाकवी कालिदास यांच्या नावाचा दिन. पण माझे खाद्यकॅलेंडर त्या दिवसापासून सुरू होते. आषाढातील संततधार...