Home Search
पत्रकार - search results
If you're not happy with the results, please do another search
बहनो और भाइयो… (Ameen Sayani)
अमीन सायानी यांचे 21 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. पन्नास वर्षांहून अधिक काळ ज्या आवाजाची जादू या देशातल्याच नाही तर जगभरातल्या भारतीय चित्रपट संगीतप्रेमींच्या हृदयावर चालली ज्या आवाजाने चार पिढ्यांच्या कानांचीच नाही तर मनांचीही मशागत केली आहे. भारतीय चित्रपट संगीत हे मनामनांना जोडणारा अद्भुत धागा आहे.एक्याण्णव वर्षांचे समृद्ध आयुष्य जगून अमीन सायानी गेले. रफी-लता-किशोर या जादुई आवाजांइतकाच त्यांचा जादूई आवाज श्रोत्यांच्या कानात गुंजत राहील...
उषा बाळ यांची सोबती समवेत आव्हानांवर मात
मानसशास्त्रज्ञ डॉ.अल्बर्ट एलिस म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मी माझ्या समस्यांची जबाबदारी स्वतः घेणार आहे. त्याबद्दल इतर माणसे किंवा परिस्थिती यांना दोष देणार नाही, तो क्षण साक्षात्काराचा असतो. तेथून तुमची प्रगती वेग घेते.’ अंध व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या 'सोबती पालक संघटने'च्या संस्थापक उषा बाळ यांच्या जीवनाकडे बघताना या वचनाची प्रचिती येते. असंख्य आव्हानांना पुरून उरलेल्या या दुर्गेची ही प्रेरक कहाणी...
तू सिंगल आहेस?…
एकटेपणा ही संकल्पना ‘इंटरेस्टिंग’ आहे. एकट्या व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन, मानसिकता याचा क्वचित त्रास होऊ शकतो; तो एकटे असल्यामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात दुसरे कोणी लुडबुड करत आहे या गोष्टीचा. ‘तू सिंगल आहेस?’ या प्रश्नामागे असलेली उत्सुकता, कुतूहल, आकर्षण किंवा बोटचेपेपणाची वृत्ती, या साऱ्याला समोर ठेवून ऋता बावडेकर यांनी केलेला विचारांचा उहापोह...
ॲनिमल चित्रपटाच्या निमित्ताने… (Movie Animal – A Turning Point ?)
ॲनिमल या चित्रपटाने हिंदी चित्रपटातील नायकाची प्रतिमा बदलली. सहृदय ही नायकाची प्रतिमा मागे सारून रासवट, नरपुंगव अशी प्रतिमा या सिनेमाने पुढे आणली आहे. ‘अल्फा-मेल’ अशी संज्ञा या प्रतिमेच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. हा नायक सभ्य, सुसंस्कृत वागणुकीवर विश्वास ठेवत नाही की शासनव्यवस्थेची पत्रास बाळगत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारा, संवेदनाहीन आणि केवळ हिंसेवर निष्ठा असलेला हा नायक समाजाच्या बदलत्या मूल्यभानाचे प्रतिक ठरत आहे का...
कहीं ये वो तो नहीं ?… भाग दोन (Musings)
ज्या प्रेक्षकाकडे पूर्वानुभव असतो त्याच्यापर्यंत दृश्यात सूचित होणाऱ्या या संवेदना दृश्य आणि ध्वनीतून पोचतात. चंद्रमल्लिकेचा, चंदनाचा गंध, चाफ्याच्या रंगाच्या साडीचा रंग, जवळिकीतून होणारा अस्पष्ट स्पर्श, येणारा अंगगंध या संवेदना दृश्यातल्या संवादातून आणि दृश्याच्या रचनेतून प्रेक्षकापर्यंत पोचतात. त्यातून संयत शृंगार रसाची निष्पत्ती होते. विविध कलांचा अनुभव देणाऱ्या संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा. आज विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण. किती वेचावेत, किती मोजावेत...
कहीं ये वो तो नहीं?… (Musings)
हिंदी सिनेमाचे सगळ्यांच्याच मनात एक आढळ असे स्थान आहे. त्यातही हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातील गाणी आणि संवेदन हे जणु हातात हात घालून प्रकटते. जसा पावसाआधी मातीचा सुगंध येतो आणि मग पाऊस प्रकटतो तसे एखाद्या खास गाण्याचे सूर काहीतरी आठवण मनात प्रकट करुन जातात आणि असे एखादे गाणे प्रत्येक संवेदनशील मनकोपऱ्यात असतेच असते... ‘ओ रात के मुसाफिर’मधल्या लता-रफी यांच्या सुरांना चांदण्याचा रंग असतो. गुरुदत्तच्या ‘जाल’मधलं ‘ये रात ये चांदनी फिर कहाँ’ ऐकताना चांदण्याला उधाणलेल्या समुद्राचा खारा वास येतो...
कथा ग्लासफर्डपेठा गावाची (Story of Glasfurdhapeta)
भारत देशात अशी काही गावे आहेत जी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावरून ओळखली जातात. त्या गावांशी निगडित कथा तितक्याच सुरस व रंजक आहेत. ‘ग्लासफर्ड’ हा मूळ स्कॉटिश शब्द आहे. त्याचा अर्थ ‘ग्रीन फॉरेस्ट’ असा होतो. ते गाव प्राणहिता नदीच्या तीरावरील घनदाट जंगलात आहे. इंग्रजी सत्तेच्या काळात ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे गाव वसवले त्याच्या नावावरून त्या गावास नवे नाव मिळाले. त्या अधिकाऱ्याचे पूर्ण नाव होते - चार्ल्स लॅमन्ट रॉबर्टसन ग्लासफर्ड. त्याने नागपूरजवळ काही शिलावर्तुळे शोधून काढल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ग्लासफर्डचे नाव विदर्भातील बृहदश्म किंवा महापाषाणयुगीन संस्कृती यांच्या आद्य अभ्यासकांमध्ये घेतले जाते...
ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)
उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...
अंधांना डोळे आणि डोळसांना दृष्टी – अत्याळची चळवळ
‘नेत्रदान’ हे श्रेष्ठ दान आहे ही जाणीव गडहिंग्लज तालुक्याच्या ‘अत्याळ’ गावातील लोकांमध्ये जागी झाली आहे. तेथे गेल्या दहा वर्षांपासून (2012) ‘अंधांना डोळे व डोळसांना दृष्टी’ या ब्रीदवाक्यावर आधारित चळवळ सुरू आहे. कौतुक म्हणजे अत्याळमधील चळवळीशी वर्षागणिक नवी गावे जोडली जात आहेत. चळवळीच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या गावांतून अकरा वर्षांत शहाण्णव जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे ! परस्परांपासून दुरावत चाललेली माणसे एकमेकांना जोडली जावीत ही भावना हा चळवळीचा गाभा होऊन गेला आहे. ज्या अंधांना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी मिळू शकत नाही अशा दृष्टीहीनांचा समाजातील वावर सुकर व्हावा म्हणून कार्यशाळा आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केंद्र असे जादा उपक्रमही चळवळीमार्फत चालतात...
चतुरस्र कर्तबगारी- विवेक मेहेत्रे (Vivek Mehetre – Multifaceted Personality)
विवेक मेहेत्रे यांच्या कामगिरीची अनेक क्षेत्रांतील घोडदौड स्तिमित करणारी आहे. हा एक माणूस इतकी विविधांगी कामे कशी करू शकतो याचे आश्चर्य वाटते. अर्थात त्यांना त्यांची पत्नी वैशाली यांची तेवढीच खंबीर व समर्थ साथ आहे. त्या दोघांनी ती कामगिरी स्वप्रतिभा आणि जगातील माहितीच्या साठ्याचा योग्य उपयोग या आधारे साधली आहे. नवनवीन माध्यमांचा तत्काळ व सदुपयोग करणारी त्यांच्यासारखी मराठी व्यक्ती विरळाच आढळेल...