Home Search

कवी - search results

If you're not happy with the results, please do another search

मराठी कम्युनिटी

मराठी (व एकूणच स्थानिक) भाषा व संस्कृती ही मुळात टिकणार कशी हा प्रश्न जाणकार (मराठी) जनांना भेडसावत असतो. त्याच बरोबर भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनाच्या गोष्टीही काही डोक्यांत असतातच. त्याकरता क्रियाशील मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या तऱ्हांची कामे करत असतात. मराठीतील पाच संस्थांमार्फत आम्ही असे ठरवत आहोत, की जगातील साऱ्या कर्तबगार मराठी जनांना, त्यांच्या कार्याला एका सांस्कृतिक दुव्याने जोडून घ्यावे – त्यांच्याकडील माहितीचे व ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे आणि अशा तऱ्हेने मराठी माणसाचे शक्तिसामर्थ्य प्रकटावे...

गुडघे गावचा ग्रामोदय

दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत...

हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल ! – परिचर्चा

जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता...

सांस्कृतिक जग कोठे हरवले?

महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन चा सद्भावना दिवस

‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे सद्भावना दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशनच्या संस्कृतिकारणाच्या उद्देशाला धरून परिसंवाद-मुलाखती असे कार्यक्रम शनिवार, 22 मार्च 2025 ला योजले आहेत. त्यात सतीश आळेकर, नीरजा, ‘अंतर्नाद’चे संपादक अनिल जोशी, मिलिंद बल्लाळ, कवी आदित्य दवणे अशा मान्यवरांचा समावेश आहे. तेवढ्याच महत्त्वाची आणखीही एक गोष्ट त्या मुहूर्तावर साधत आहोत. ती म्हणजे गिरीश घाटे रचित व्ही. शांताराम यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन. ते नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. किरण शांताराम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत...

पन्नासावे साहित्य संमेलन (Fiftieth Marathi Literary Meet 1974)

सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्यसंमेलनाच्या (इचलकरंजी, 1974) अध्यक्षपदाचा मान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मिळाला होता. ते त्यांच्या आद्याक्षरांवरून पुलं म्हणूनच ओळखले जातात. त्यांचा जन्म मुंबई येथे 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला. पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले. त्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार फार प्रसृत नव्हता. पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्रापुरते त्या प्रकाराचे प्रवर्तक म्हणता येईल. ते ग्रेट एंटरटेनर होते...

विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !

महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...

हिंगोली : शेतकऱ्यांच्या मीराई !

हिंगोली येथील मीरा कदम या शिक्षिका स्वत: पायांनी अधू आहेत. त्यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले. त्यांना चालताना कशाना कशाचा आधार घ्यावा लागतो; पण त्यांची वृत्ती मात्र आधार देण्याची आहे ! त्यांनी मुख्यत: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये म्हणून ‘सेवासदन’ वसतिगृह चालवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची सुरुवात एकोणीस वर्षांपूर्वी झाली. मीरा कदम यांचे वडील वारले, तेव्हा त्यांना वडिलांचे छत्र हरपल्याने निर्माण होणारी पोकळी जाणवली. त्यांनी पाच मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली. त्यांच्या कार्याला लोकांचा पाठिंबा मिळाला, तेव्हा त्यांनी चाळीसपर्यंत मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे सुरू केले. मीरा यांनी आत्महत्या करू नका असा संदेश देण्याचे ठरवले. गावोगावी जाऊन मंदिरातील ध्वनिवर्धकावरून त्या ‘आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील इतरांची कशी परवड होते, तेव्हा आत्महत्या करू नका’ हे हृदयद्रावक वर्णन करून सांगू लागल्या...

राजाराम महाराजांचे इटालीमध्ये स्मारक ! (Rajaram Maharaj Memorial In Italy)

0
कोल्हापूरचे महाराज राजाराम (दुसरे) ह्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1870 मध्ये युरोपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जनसामान्यांत आणि काही कुटुंबीयांतही नाराजी उमटली. समुद्र ओलांडण्याला सनातनी हिंदुधर्मात मान्यता नाही असा समज होता ना ! पण राजाराम महाराज ती सर्व नाराजी ओलांडून निर्धाराने युरोपात गेले, कारण त्यांना युरोपीय शिक्षणपद्धत समजाऊन घेऊन ती स्वतःच्या संस्थानात सुरू करायची होती. राजाराम महाराज स्वतः इंग्रजी शिकलेले होते. त्यांनी उत्तम संभाषण इंग्रजीत करण्याइतकी पात्रता मिळवली होती. ब्रिटिशांनी राजाराम महाराजांना राज्यकारभार व शालेय शिक्षण, दोन्ही चांगल्या प्रकारचे देण्याची व्यवस्था केली होती...

सातवाहन – महाराष्ट्रातील पहिले राजघराणे

1
सातवाहन हे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले राजघराणे. त्यांचा कार्यकाळ इसवी सनपूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंतचा आहे. साधारणतः साडेचारशे वर्षे. सिमुक या सातवाहन राजाने त्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली तर त्याचा पुत्र सिरी सातकर्णी या कर्तृत्ववान राजपुरुषाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. सातवाहन घराण्याच्या सिमुक सातवाहनानंतर राजगादीवर आलेला हा दुसराच राजा होता. असे असताना त्याने त्याच्या कर्तृत्वाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. राजाचे कर्तृत्व नागनिका राणीने कोरवून घेतलेल्या नाणेघाट लेण्यातून कळते. सातकर्णी राजाची राणी ‘नागनिका’ ही त्या काळातील पहिली कर्तबगार ज्ञात स्त्री...