Home Search

कलाकार - search results

If you're not happy with the results, please do another search

आरंभकाळातील पोस्टरविचार

भारतातील पहिला बोलपट ‘आलमआरा’ हा 1931 साली निर्माण झाला. त्या आधी मूकपट 1913 पासून प्रदर्शित होऊ लागले होते. पहिल्या बोलपटानंतर, 1934 पर्यंत पुढीलप्रमाणे चित्रपट निर्माण झाल्याची नोंद आढळते. ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘मायामच्छिंद्र’ (1932); ‘सैरंध्री’, ‘सिंहगड’ (1933); ‘अमृतमंथन’ (1934) येथपर्यंतच्या चित्रपटांची पोस्टर्स जरी उपलब्ध असली तरी त्या चित्रकृती कोणाच्या त्यांचा नामोल्लेख नाही. आरंभ काळातील चित्रपट आणि त्यांचे पोस्टर कलाकार - या कलावंतांचा कार्यकाल 1924 ते 1941 असा आहे. सुबोध गुरुजी यांनी त्या कलाकार मंडळींची चरित्रे व कार्य अशा स्वरूपातील माहिती संकलित केली आहे...

गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती (Borrowing Gazal Ideas)

‘गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती’ हे लेखाचे नाव थोडे विचित्र वाटू शकेल. प्रत्येक भाषेची स्वत:ची संस्कृती असते. उर्दूमध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या कवी/शायर यांच्या गझलमधल्या ओळी घेऊन त्यापुढे स्वतःच्या ओळी जोडण्याची सर्रास पद्धत आहे. यात वाङ्मयचौर्य वगैरे न समजता ही ज्येष्ठ कवीला दिलेली मानवंदना आहे असे समजतात. हिंदीतले प्रसिद्ध कवी आणि सिनेगीतकार देवमणी पांडेय यांच्या ह्या लेखाचे मराठी कवयित्री रेखा शहाणे यांनी भाषांतर केले आहे. अनेक सुप्रसिद्ध गझल आणि गीतांमधील देवमणी पांडेय यांनी दाखवून दिलेले साम्य मननीय आहे...

कारी कारी बादरिया – मल्हार ! (Monsoon clouds and Raga Malhar)

यावर्षी पावसाने कृपा केली आहे. येणाऱ्या सुगीचे स्वप्न पहायला हरकत नाही असा माहोल आहे. ढग दाटून आले आहेत आणि पावसाच्या धारा कोसळत आहेत. या कोसळणाऱ्या धारांचे संगीत म्हणजे राग मल्हार. त्यात पावसाचे सगळे विभ्रम साठलेले आहेत. भीमसेन जोशींचा मल्हार ऐकताना गडगडणाऱ्या ढगांची आणि कोसळणाऱ्या धारांची आठवण येते. मोगरा फुलला या सदरामध्ये सौमित्र कुलकर्णी मल्हार रागाचा परिचय करून देत आहेत. रागाचे स्वरूप स्पष्ट व्हावे आणि अलौकिक गाण्याचा आनंदही मिळावा या दृष्टीने त्यांनी युट्यूब लिंक्स सोबत दिल्या आहेत. अभिजात व आधुनिक संगीताचा मेळ घालून सादर केलेली 'मल्हार जॅम' ही त्यातील एक आगळीवेगळी प्रस्तुती. स्वत: सौमित्र कुलकर्णी यांनीही एक बंदीश गायली आहे. मल्हाराच्या या धारा खचितच आनंददायी ठरतील...

स्वरांची मोहिनी (Mesmerising Music)

4
संगीताची मोहिनी अवीट आहे. प्रत्येकापाशी गाण्यांच्या आठवणी असतात. एखादं गाण पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच्या किंवा एखादं गाणं ऐकत असताना घडलेल्या प्रसंगांच्या... ते गाणं आणि त्या आठवणी हातात हात घालूनच येतात. या विषयावर प्रत्येकजण स्वत:चा असा ललित लेख लिहू शकेल. भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरींचे धारानृत्य सुरू असताना मनाला आपसूकच हुरहुर लागते. अशा वेळी गाणं आणि गाण्यांच्या आठवणी साथ देतात. मनाला सुकून देतात. या लेखात गाण्यांच्या आठवणी सांगत आहेत, इतर वेळी गणिताविषयी लिहिणारे मुकेश थळी. त्यांच्या मते, गाण्यातही गणित आहे आणि गणितातही गाणे आहे...

नादसागर मालकंस (Melodic Malkansa)

शास्त्रीय संगीतातील रागांचा परिचय करून देणाऱ्या लेखमालेत डॉ. सौमित्र कुलकर्णी ‘मालकंस’ या लोकप्रिय आणि कलाकारप्रिय रागाविषयी माहिती देत आहेत. हा राग गाण्याची वेळ मध्यरात्र ही आहे. मध्यरात्रीच्या महासागरासारखा, प्रशांत आणि धीरगंभीर असलेला हा राग माहीत नसतानाही त्यावर आधारित संगीतरचना मनाला मोहिनी घालतात. थोडासा परिचय झाला तर त्या आनंदात भरच पडेल. दिग्गज कलाकारांनी गायलेल्या या रागातल्या बंदिशींच्या यू-ट्युब लिंक सोबत दिल्या आहेत, रागाचा परिचय होण्यासाठी त्यांची मदत होईल...

भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)

भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...

पोस्टर व बॅनर चित्रकला लोपली !

घराणी सिनेमाक्षेत्रात अनेक होऊन गेली; अजूनही आहेत. सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय ही क्षेत्रे कमीजास्त ग्लॅमरची; लोकांच्या मनी आकर्षण असलेली. परंतु त्या कलावंतांची तशी प्रसिद्धी करणारे जे चित्र कलाकार पडद्यामागे काम करतात ते मात्र दुर्लक्षित राहतात, उपेक्षित असतात. चित्रपटनिर्मितीचे श्रेय दादासाहेब फाळके यांचे. पण चित्रपटाला वास्तववादी चौकट दिली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी. पोस्टर व बॅनर चित्रकलेतील 1924 ते 1989 ही पासष्ट वर्षे म्हणजे रंगरेषांचा ‘महायज्ञ’च होता. तो 1990 नंतर निवांत झाला, असे वर्णन चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी सुबोध गुरुजी यांनी संकलित केलेल्या ‘पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केले आहे. सुबोध गुरुजी यांनी स्वत: त्यास ‘मानवी स्पर्श संपला’ असे समर्पक रीत्या म्हटले आहे...

स्त्री मुक्ती संघटना (Stree Mukti Sanghatana)

स्त्री मुक्ती संघटना गेली 48 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून संघटनेने विविध स्तरातील स्त्रियांच्या आयुष्यात गुणात्मक फरक केला आहे. पंचवीस वर्षे स्त्री मुक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष आणि 2018 पासून त्या संघटनेच्या सेक्रेटरी असलेल्या अमोल केरकर या लेखात स्त्री मुक्ती संघटनेच्या उद्दिष्टांविषयी आणि वाटचालीविषयी विस्ताराने सांगत आहेत. संस्थेच्या 48 वर्षांच्या कामाविषयी असल्यामुळे लेख काहीसा दीर्घ आहे. मात्र संस्थेच्या वाढीसाठी केलेले विविध उपक्रम या लेखामुळे इतर संस्थांनाही मार्गदर्शक ठरतील असे आहेत. अमोल केरकर यांना बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीत काम करण्याचाही दीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या मृदू स्वभावाच्या आणि चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्तीचे अनुभव आणि विचार महत्त्वाचे आहेत...

दशावतार : एक समृद्ध कलावारसा (Folk Theater of Konkan –Dashavtar)

महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे. अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कोठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो...

नवचित्रकला (Modern Art)

सर्वसामान्यपणे नवचित्रकला ही अगम्य आहे, ती आपल्याकरता नाही अशी समजूत असते. ती समजत नाही असे गृहीत धरून तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तिची थोडी हेटाळणी...