Home Search

शेतकरी - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

प्रल्हाद पाटील-कराड – प्रगतशील शेतकरी

प्रल्हाददादांची ओळख ही ‘एक प्रगतशील शेतकरी’ म्हणून आहे. प्रल्हाददादांचा (प्रल्हाद नामदेव पाटील) जन्म २७ फेब्रुवारी १९३० रोजी जळगाव, तालुका निफाड येथे शेतकरी कुटुंबात झाला....
carasole

शेतकरी एकत्र आला तरच टिकू शकेल

'उत्‍सव चांगुलपणाचा' कार्यक्रमात विलास शिंदे यांचे प्रतिपादन महाराष्‍ट्रातला शेतकरी हा प्रामुख्‍याने अल्‍पभूधारक आहे. जमिनीचा लहानसा तुकडा कसणारा शेतकरी मोठा फायदा मिळवू शकत नाही, मात्र त्‍याचवेळी...
carasole

भागवत नखाते – हाडाचे शेतकरी

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील अकोला हे गाव पेरूंसाठी  प्रसिद्ध  आहे. तेथील वैशिष्ट्यपूर्ण पेरूच्या शोधात भेटले ते भागवत नखाते. फाटक्या अंगाची धुवट कपड्यातील व्यक्ती. त्यांनी...
carasole

रिधोरे येथील शेतकरी ज्ञानमंदिर

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रिधोरे गावात आधुनिक आगळे-वेगळे मंदिर आहे. ते 'शेतकरी ज्ञानमंदिर' या नावाने ओळखले जाते! आधुनिक मानवी शक्तीची देवता म्हणून शेतकरी मंदिर....

अमेरिका – स्थलांतरितांचा देश (America, The Migration Story)

0
पृथ्वीतलावरील अनेक देशांतील लोक 1840 सालापासून अमेरिकेच्या भूमीवर येऊन थडकत आहेत. कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यात सोने सापडल्याची बातमी 1848 च्या सुमारास जगभर पसरली. त्यामुळे सोन्याच्या मोहाने त्यावेळी तीन लाखांपेक्षा जास्त लोक अमेरिकेत येऊन ठेपले. त्या विषयी एक सिनेमाही विसाव्या शतकाच्या मध्यावर निघाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अनेकांना त्यांचे त्यांचे देश सोडून पळावे लागले होते. अनेक देशांतील प्रतिभावान आणि मेहेनती तरुण त्या काळात अमेरिकेत दाखल झाल्याने अमेरिका श्रीमंत होण्यास मदत झाली ! किंबहुना तेव्हापासूनच अमेरिकेची धारणा अशी बनत गेली, की जगातील हुशार लोकांनी अमेरिकेत यावे ! आणि त्यांच्या बुद्धिप्रतिभेला व कार्यशक्तीला तेथे वाव होताही...

पाजपंढरीची समस्या अपंगांची (Dapoli village faces a problem of handicapped generation)

0
एका छोट्याशा, चार हजार लोकवस्तीच्या गावात दोनशेहून अधिक अपंग आहेत हे वाचून नवल वाटेल ! पण तसे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहे. त्याचे नाव आहे पाजपंढरी. त्या गावात अपंगांची संख्या एवढी का? तर गरोदरपणातील स्त्रियांच्या प्रकृतीची हेळसांड ! अनिल रामचंद्र रघुवीर या अपंग कार्यकर्त्याने त्याच्या प्रयत्नाने गावाच्या या व्यथेवर मात केली. त्याने हताश अपंग दुर्बलांना संघटित करून त्यांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडले. त्यांना ही प्रेरणा संतोष शिर्के नावाच्या दापोलीच्या सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळाली...

गोपीनाथ पाटील : ठाणे-कळव्याचे ध्यासपर्व (Gopinath Patil’s dedicated work for Kalawa area)

ठाण्याजवळच्या कळवा गावचे गोपीनाथ पाटील हे ध्येय व ध्यास घेऊन सार्वजनिक जीवनात वावरले. त्यांच्या कार्यासाठी त्यांचे परवलीचे सूत्र होते, सहकार ! तेच कार्यसूत्र, खरे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्था, उपक्रम यांच्या स्थापनेत होते. गोपीनाथ यांच्यामुळे अनेक उपक्रम स्वतःच्या पायावर कळवा परिसरात भक्कमपणे उभे आहेत. ती त्यांच्या कार्याची पावती होय. ते ज्या कळवा गावात राहत होते ते गाव ठाणे या शहराला लागून असूनसुद्धा अनेक सुविधांपासून दूर होते. कळवावासीयांना दैनंदिन व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी ठाण्याची वाट तुडवण्याला पर्याय नव्हता. कळव्यातील ते अंधारयुग नष्ट करण्यासाठी आंतरिक तळमळीने उभे राहिले ते गोपीनाथ पाटील. त्यांच्या सार्वजनिक कार्यातून उभ्या राहिल्या अनेकानेक संस्था...

कोळगाव – जोड पाच तालुके, चार जिल्हे यांची

कोळगाव हे जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील मध्यवर्ती असे महत्त्वाचे गाव आहे. ते गाव एकटे, सुटे असे नाही; त्याला लागून पूर्वेला पिंप्रीहाट नावाचे गाव एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गाव कोळगाव-पिंप्री या नावाने ओळखले जाते. एस टी स्टँडवर उतरल्यावर तेथील गजबजलेला परिसर पाहून गाव खूप मोठे आहे असा प्रथमदर्शनी भास होतो. स्टँड परिसर आणि त्याच्या आसपासची दुकाने, हॉटेले हे सारे दोन्ही गावांना सामायिक उपयोगी येते. पिंपरी या गावाचे नाव कागदोपत्री पिंप्रीहाट असे आहे. कोळगाव पिंप्री हे गाव शिंदी कोळगाव या नावानेही प्रसिद्ध आहे...

नागाव (गोरेगाव) : सामाजिक एकोप्याची अजब कहाणी (Nagaon : Story of Social integration)

रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील नागाव (गोरेगाव). ते महाड-गोरेगावचे उपनगर वाटावे असे आहे. आमच्या गावाचा परिसर हा कातळी. त्यामुळे आंबा, फणस, नारळी यांच्या बागा… असा कोकणचा मेवा तेथे नाही. तेथे भातशेती ही मुख्य; रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणत ना ! उन्हाळ्यात कलिंगड, टरबूज ही फळे येत; पावसाळी भाज्या भरपूर होत. गावात असतील दोनशे घरे. गावाची समाजरचना जमीनदार आणि खंडकरी शेतकरी, अशी. त्यामुळे ती शेती आम्ही आमच्याच गावातील कुणबी-मराठा यांच्याकडे ‘अधेली’ने दिली होती...

दशावतार : एक समृद्ध कलावारसा (Folk Theater of Konkan –Dashavtar)

महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे. अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कोठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो...