Home Search

व्यास - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

शिक्षकांचे व्यासपीठ – आवाहन

0
‘शिक्षकांचे व्यासपीठ’ ही संकल्पना आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे आकारास आणत आहोत! आदर्श समाज घडवण्यासाठी शिक्षक त्या योग्यतेचे असणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक...

पूर्णतावादी चतुरस्र व्यासंगी द. ग. गोडसे

दत्तात्रय गणेश गोडसे किंवा द. ग. गोडसे म्हटले तरी ज्यांना त्यांची अपुरी, चुकतमाकत ओळख पटेल, त्यांना चित्रकार गोडसे म्हटले तरी पुरी, पक्की ओळख पटल्यासारखे...
_Dilip_Karambelkar_1

सांस्कृतिक संघर्ष व समन्वय – व्यासपीठाची गरज

आज आपण भारतीय अनेक पदरी सांस्कृतिक संघर्षातून जात आहोत. गेल्या शेकडो वर्षांच्या संस्कृतीने आपले भावजीवन घडवले आहे. त्या संस्कृतीने आपल्या जीवनाची काही परिमाणे निश्चित...

मनोरंजनाच्या’ हव्यासापायी माणसांची अपमानजनक थट्टा

सोनी वाहिनीवर ‘एण्टरटेनमेण्ट के लिए कुछ भी करेगा’ नावाचा रिअॅलिटी (?) शो प्रसारित केला जातो. या कार्यक्रमात वेगवेगळ्या व्‍यक्‍ती आपापली कला सादर करतात. एके...
‘व्यासपीठ’तर्फे आयोजित ‘शिक्षण आणि सुजाण नागरिकत्व’ या कार्यक्रमात योगेश देसाई (कारागृह अधीक्षक, ठाणे), अभय ओक (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ

‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल?

 शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी प्रेरणा-प्रबोधन-प्रयत्न अशी संकल्पना ठरवून, त्यासाठी शैक्षणिक घटकांचा म्हणजे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय ठरवून ‘व्यासपीठ’च्या...

गुडघे गावचा ग्रामोदय

दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत...

एकावन्नावे साहित्य संमेलन (Fifty First Literary Meet 1975)

कराड येथे 1975 साली भरलेल्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांना लाभला. दुर्गाबाई लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्ध धर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या होत्या. त्यांचा जन्म इंदूर येथे झाला. त्यांचे कुटुंब मूळचे पंढरपूरचे. ते नंतर बडोद्याला स्थायिक झाले. त्याकाळी बडोदा हे भारतातील एक संस्थान होते. दुर्गाबाईंचे कुटुंब सुशिक्षित होते. वडील शास्त्रज्ञ होते आणि त्यांची बहीण कमला सोहोनी भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत...

अलिबाग माझे गाव

अलिबाग हे पुण्यामुंबईजवळचे समुद्र किनाऱ्यावरील गाव. अलीकडच्या काळात ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणून गाजलेले. ते दोन दिवसांच्या ट्रिपसाठी उत्तम मानले जाते. मुंबईहून तेथे ‘रोरो बोट सर्व्हिस’ने जाता येत असल्याने अलिबागचे पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व अधिकच वाढले आहे. पण अलिबागला मोठा इतिहास आहे. शिवाजीराजे व आंग्रे सरदार यांच्या कथाकहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण ज्यू लोक दोन हजार वर्षांपूर्वीपासून येथे राहत आले आहेत. त्यांची जुनी घराणी आहेत आणि आता संबंध इस्त्रायलशी जोडलेले आहेत. बरेच लोक तिकडे स्थलांतरित झाले आहेत. अलिबागचा पांढरा कांदा हे तेथील वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. अलिबागला ब्रिटिशकाळात हवामान केंद्र होते. ते तत्कालीन कुलाबा (आता रायगड) जिल्ह्याचे मुख्य शहर होय. तेथून जिल्ह्याचे सर्व व्यवहार होतात...

लिबरल आर्ट्सचा अभ्यास – नवे आव्हान

0
लिबरल आर्ट्स ही शाखा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नव्याने उदयास आली आहे आणि फोफावत आहे. प्रतिष्ठाप्राप्त महाविद्यालये, विद्यापीठे आणि नव्याने उदयास आलेली खाजगी विद्यापीठे यांनी लिबरल आर्ट्स हा मुक्त अभ्यासक्रम दशकभरापूर्वी सुरू केला. ज्ञानशाखांची नावे काळाप्रमाणे बदलत राहतात. पूर्वी या शाखेस ढोबळपणाने कला (आर्ट्स) किंवा काही ठिकाणी मानव्यविद्या शाखा असे म्हटले जाई. त्यात फरक होता - त्या शिक्षणक्रमास मर्यादा होती. पण आता, त्यांच्याऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लिबरल आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा दिसू लागला आहे. गेल्या दशकभरात प्रथम वर्ष पदवीला नव्वद टक्के गुणांना प्रवेश बंद होत आहेत. बदलत्या काळात ज्ञानशाखांच्या कक्षा रुंदावल्या. पालकांच्या व मुलांच्या दृष्टिकोनात बदल झाला...

ग्रंथालये नव्हे, सांस्कृतिक केंद्रे ! (Book Libraries will be cultural Centers)

पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय, एवढाच विचार लोकमानसात असतो. परंतु बदलत्या काळ-परिस्थितीत ग्रंथालयांना तेवढेच कार्य करून पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल- वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील- ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा अभिप्राय चिपळूण येथे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळाव्यात व्यक्त झाला...