Home Search

यात्रा - search results

If you're not happy with the results, please do another search

मांगरुळ गावची श्रीचिंचेश्वराची यात्रा

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील मांगरूळ गावात पर्वतरांगांच्या कुशीत, अगदी उंच डोंगरावर श्रीचिंचेश्वर देवाचे मंदिर...
carasole

दुगावची पीराची यात्रा – हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या पूर्वेस बारा किलोमीटर अंतरावरील चांदवड-मनमाड मार्गावर ‘दुगाव’ नावाचे गाव आहे. गावाची लोकवस्ती पाच हजार. गावात हिंदु, मुस्लीम आणि इतर समाजाचे...
carasole

वडांगळीची सतीदेवीची यात्रा

2
‘सतीदेवी सामतदादा’ हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत! ते देवस्थान नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात आहे. तेथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सतीदेवीच्या यात्रेमुळे वडांगळी गावची ओळख महाराष्ट्रभर...

सावरकर अभिवादन यात्रा

तो २०१० सालचा फेब्रुवारी महिना होता. शंकर अभ्यंकर यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर व्याख्यानमाला ठाण्यात सुरू होती. व्याख्यानात त्यांनी सांगितले, की सावरकरांच्या प्रसिद्ध उडीला शंभर वर्षे...
निघाली साईंची पालखी

अंधांची पदयात्रा

मुंबई (अँटाप हिल) ते शिर्डी      अंधांची पदयात्राआम्ही शिर्डीला जाण्यासाठी 'ॐ साई'च्या जयघोषात पालखीबरोबर चालू लागलो आणि क्षणार्धात पुढील आठ दिवसांचा प्रवास नजरेसमोर तरळला,...

वसंत जोशीचा मृत्यू – जो आवडे सर्वांना… (Vasant Joshi, Yogic Man Liked by All)

वसंत जोशी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शांतपणे झोपेत मरण पावला. तो त्या आधी चार दिवस थोडा अस्वस्थ होता. तसे तर, त्याने त्याचे सार्वजनिक कार्य वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी थांबवले होते. वयोमानाने शरीर थकत होते. त्याच्या पत्नीचे, सुनीताचे देहावसान त्या आधी, तीन वर्षांपूर्वी झाले. त्या काळात, त्याला काही व्याधींनी घेरले, विस्मृती जाणवू लागली होती, पण गंभीर असे काही नव्हते. त्यात सोसायटी पुनर्विकासानंतर मिळालेला फ्लॅट मोठा; अपत्याविना जीवन एकाकी होते. त्याचे पुतणे रविंद्र जोशी व सूनबाई अश्विनी यांनी त्याच्या नाश्ता-जेवणाची व्यवस्था केली होती. पुतणी ज्योती पानसे जाऊन-येऊन लक्ष ठेवायची. तो स्वतः उठून शनिवार, रविवार पुतण्या व पुतणीकडे जाई. वसंतचा स्वभाव ‘सोशल’; सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा, हसतमुख राहण्याचा होता. त्याने जीवनाबद्दल तक्रार कधीही, अगदी शेवटच्या काळातही केली नाही. परंतु घरात तो एकटा असे. सोसायटीतील काही परिवारांचा त्याला आधार होता...

विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !

महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...

जामनेर – बागायती आणि सुसंस्कृत (Jamner – city with rich development and cultural activities)

जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे...

घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी

3
दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे...

पहिली सिग्नल शाळा ठाण्यात ! (Innovative Signal School in Thane)

ठाणे शहरातील तीन हात नाक्यासह विविध सिग्नलवर भटक्या-विमुक्त जमातींतील शंभराहून अधिक मुले पुलाखाली आश्रय घेऊन राहत होती. पैकी तीन हात नाक्यावरील मुलांचे तेथील वास्तव्य संपुष्टात आले. मुलांचे वडील तेथेच वाढले. मुलांचे जन्म आणि बालपण पुलाखालीच गेले. खरे तर, असे दृश्य एकट्या ठाणे शहरात नसून अशी शेकडो मुले भारतातील प्रत्येक महानगरामध्ये जगत असतात. सरकार शिक्षणप्रसारासाठी अनेक मोहिमा करत असते. तथापी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास राहिलेली ही मुले मुख्य धारेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास अपात्र ठरतात. अशा वेळी, ठाण्याच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेची ‘सिग्नल शाळा’ सुरू झाली...