Home Search

महालक्ष्मी - search results

If you're not happy with the results, please do another search

मुखवट्यातून उभ्या केलेल्या चार देवींची यात्रा

मुरूड, आंजर्ले व वेळास ही गावे दुर्गादेवीच्या, तर केळशी महालक्ष्मीच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. ती चारही गावे तीनशे वर्षांपासून या यात्रांनी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यात्रांच्या शेवटच्या दिवशी रथयात्रा निघते, त्या दरम्यान प्रत्येक जातीजमातीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला मानाचा विडा देऊन सन्मानित करण्याची रीत आहे. विनायक बाळ यांनी दापोली तालुक्यातील या चार गावांत मुखवट्यातून उभ्या करण्यात येणाऱ्या चार देवींच्या यात्रांचे वेगळेपण या लेखातून मांडले आहे...

पंचांग – टिळक की दाते (Lokmanya Tilak Reforms Indian Traditional Almanac)

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे...

केळशी देवीचा उत्सव : समाजजीवनाचे प्रतिबिंब

केळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन प्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.

स्वप्नसोपान बारोंडागड

‘बारोंडागड’ हे नाव खडबडीत आहे. ते ठिकाण पालघर जिल्ह्यातील विरारपासून हाकेच्या अंतरावर असूनही लोकांच्या नजरांपासून मात्र दूर राहिले आहे. ते झाकले माणिक आहे असेही म्हणता येईल. सूर्योदय, सूर्यास्त, पावसाळा, हिवाळा या सगळ्याची उत्कंठा अनुभवावी ती निसर्गरम्य बारोंडागडावर !

कोल्हापूर-मिरज रेल्वेचा आरंभ !

छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरू आहे. त्यानिमित्त अनेकानेक कार्यक्रम होत आहेत. शाहू महाराजांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी करून तो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला. त्यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !

खांबपिंपरीचे बारववैभव !

नगर जिल्ह्यातील खांबपिंपरी हे गाव म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या मोठा खजिना आहे ! ते गाव पुरातत्त्वीय दृष्ट्या पांढरीच्या टेकाडावर वसलेले आहे. त्या गावातील शिल्पसमृद्ध बारव, शेतात विहिरी खणू लागल्यावर सापडणाऱ्या अनेक प्राचीन वस्तू व घर बांधणीत चार फुटावर पाया खोदल्यावर सापडणारे माणसांचे सापळे या गावाबद्दल अधिकच कुतूहल निर्माण करतात...

कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)

"ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा." लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला...

मिरीकरांचा सहा पिढ्यांचा इतिहास (Mirikar family depicts it’s six generation history into museum in...

15
अहमदनगर शहराजवळील मिरी या गावाचे सरदार यशवंतराव मिरीकर यांचा वाडा ब्रिटिशकालीन कारकिर्दीच्या खाणाखुणा घेऊन उभा आहे. यशवंतराव यांचे पणतू, गोविंद मिरीकर यांनी त्या वाड्याचे नूतनीकरण करून, तेथे वस्तुसंग्रहालय (म्युझियम) उभे केले आहे.

अनिल नाकतोडे – झाडीवूडचा खलनायक (The Villain of the Jhadistage)

झाडीबोलीच्या नाट्यकलेचा पिढीजात वारसा जपणारा उदापूरच्या मातीतील अवलिया म्हणजे अनिल नाकतोडे. त्यांचे वडील दाजीबा नाकतोडे हेही गावात होणाऱ्या नाटकांतून भूमिका साकारायचे.

दीपावली – सण प्रकाशाचा! (Deepawali)

दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, तो येतो.