Home Search

भारदे - search results

If you're not happy with the results, please do another search

शेवगावचा एव्हरेस्टवीर अविनाश बावणे (Avinash Bavane from Shevgaon… to Everest)

नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील तरुण अविनाश बावणे याने नौदलाच्या पथकाबरोबर जाऊन एवरेस्ट शिखर सर केले. त्याने तो पराक्रम तीन दिवसांत दोनदा केला- प्रथम एकट्याने व नंतर पुन्हा चमूबरोबर समूहाने. अशी यशसिद्धी असलेला जगातील तो एकटाच...

शेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी 1885 साली स्थापन केलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय हे शेवगावच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरले आहे. बाळासाहेब भारदे यांनी वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यास वैभव प्राप्त करून दिले. वाचनालयात पन्नास हजारांहून अधिक ग्रंथ तर तीस दैनिके, सोळा साप्ताहिके, सहा पाक्षिके आणि वीस मासिके अशी संपदा आहे...

खो-खो खेळासाठी शेवगाव स्पोर्ट्स क्लब

0
क्रिकेट, बॅटमिंटन, टेनिस, स्केटिंग अशा खेळांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील विविध क्लब आपल्याला माहिती आहेत. पण आपल्या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देणारे क्लब विरळच! असाच एक वेगळ्या वाटेवरुन यशोदायी प्रवास करणारा महाराष्ट्रातील एक क्लब म्हणजे ‘शेवगाव स्पोर्ट्स क्लब’. या क्लबने शालेय पातळीवर असणारा खो-खो हा खेळ राष्ट्रीय पातळीवर पोहचवला…

बाबुराव भारस्कर यांचा निवडणूक चमत्कार!

बाबुराव भारस्कर यांच्यावर गांधीवादाचे संस्कार झाले. ते मातंग समाजातून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचलेले साठच्या दशकातील पहिले नेते. बाबुराव यांनी वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले...

जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या व्यक्ती (Janmashatabdiveer)

मी, माझा सहकारी राजेंद्र शिंदे आणि विनय नेवाळकर, आम्ही त्या तिघांच्या जन्मशताब्दीचा विचार करताना वेगळीच कल्पना लढवली. गेल्या शतकातील व या शतकाच्या पहिल्या काही दशकांत सामाजिक-सांस्कृतिक जीवन घडले गेले ते ढोबळपणे 1900 ते 1930 या काळात जन्मलेल्या महनीय व्यक्तींच्या संस्कारांतून. त्यांच्याच जन्माची शंभर वर्षे विद्यमान ज्येष्ठ जनांना महत्त्वाची वाटत आहेत व तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जावा असेही वाटत आहे.
_Sangamner_Shikshan_Prasarak_1.jpg

संगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था

4
‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली...

मराठी साहित्य मंडळ, बार्शी

(स्थापना 1961, नोंदणी 1972) बार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ...
carasole

वावीचे वारकरी संत – रामगिरी महाराज

भक्तिमार्गाचा अधिकार त्रैवर्णीकांना वारकरी संप्रदायाने दिला. सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह गावागावांत होत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भारदेबुवा यांच्यासारखे श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार तेथे पोचत असत....