Home Search

कवी - search results

If you're not happy with the results, please do another search
_Lekhak_Kavi_Ghadavanari_Shala_1.jpg

लेखक-कवी घडवणारी वढू खुर्द शाळा

आमची वढू खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे उपक्रमांचे माहेरघर. वढू खुर्द गाव पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात आहे. शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमी राबवले...

मराठी कवींचा ‘सेफ्टी झोन’

8
घर नावाच्या परिघाबाहेर पडल्यानंतर उमगू लागते, की जग ही काय ‘चीज’ आहे! त्याप्रमाणे मातृभाषेच्या कुशीतून उठून, इतर भाषांच्या आवारात जाऊन आल्यानंतर व्यक्तीला कळते, की...

कवी कालिदास

0
कालिदास हा शकारी विक्रमादित्याच्या पदरी असलेल्या नवरत्नांपैकी एक होता असे मानले जाते. पण डॉ. भांडारकर, मिराशी इत्यादी पंडितांच्या मते कालिदास हा गुप्त घराण्यातील द्वितीय...
carasole

घायाळ – य.दि. पेंढरकर (कवी यशवंत)

1
कवी यशवंत ‘आई म्‍हणोनी कोणी’ ही कविता लिहिणारे आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक म्हणून जनसामान्यांना परिचित आहेत. ते बडोदे संस्थानचे राजकवी होते. यशवंतांनी गद्यलेखनही बरेच...
carasole

प्रतिभावंत कवी संजीव!

1
मराठी काव्य जगतात सोलापूरचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले ते प्रथम कुंजविहारी व त्यांच्यानंतर संजीव यांच्यामुळे. ख्यातनाम कवी, गीतकार संजीव यांचा १२ एप्रिल हा...

शम्स जालनवी – कलंदर कवी

जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलता यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायरे यांसाठीही परिचित आहे. एकेकाळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण...

तमीळ कवी सुब्रमणीयम् भारती

0
प्रासंगिक : सुब्रमणीयम् भारती यांचा मृत्यू १२ सब्टेंबर १९२१ रोजी झाला. ( गंगा नदीच्या परिसरात होणारा गहू आपण घेऊ आणि येथील लोकांना प्रिय...

विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !

महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...

हिंगोली : शेतकऱ्यांच्या मीराई !

हिंगोली येथील मीरा कदम या शिक्षिका स्वत: पायांनी अधू आहेत. त्यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले. त्यांना चालताना कशाना कशाचा आधार घ्यावा लागतो; पण त्यांची वृत्ती मात्र आधार देण्याची आहे ! त्यांनी मुख्यत: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये म्हणून ‘सेवासदन’ वसतिगृह चालवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची सुरुवात एकोणीस वर्षांपूर्वी झाली. मीरा कदम यांचे वडील वारले, तेव्हा त्यांना वडिलांचे छत्र हरपल्याने निर्माण होणारी पोकळी जाणवली. त्यांनी पाच मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली. त्यांच्या कार्याला लोकांचा पाठिंबा मिळाला, तेव्हा त्यांनी चाळीसपर्यंत मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे सुरू केले. मीरा यांनी आत्महत्या करू नका असा संदेश देण्याचे ठरवले. गावोगावी जाऊन मंदिरातील ध्वनिवर्धकावरून त्या ‘आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील इतरांची कशी परवड होते, तेव्हा आत्महत्या करू नका’ हे हृदयद्रावक वर्णन करून सांगू लागल्या...

राजाराम महाराजांचे इटालीमध्ये स्मारक ! (Rajaram Maharaj Memorial In Italy)

0
कोल्हापूरचे महाराज राजाराम (दुसरे) ह्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1870 मध्ये युरोपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जनसामान्यांत आणि काही कुटुंबीयांतही नाराजी उमटली. समुद्र ओलांडण्याला सनातनी हिंदुधर्मात मान्यता नाही असा समज होता ना ! पण राजाराम महाराज ती सर्व नाराजी ओलांडून निर्धाराने युरोपात गेले, कारण त्यांना युरोपीय शिक्षणपद्धत समजाऊन घेऊन ती स्वतःच्या संस्थानात सुरू करायची होती. राजाराम महाराज स्वतः इंग्रजी शिकलेले होते. त्यांनी उत्तम संभाषण इंग्रजीत करण्याइतकी पात्रता मिळवली होती. ब्रिटिशांनी राजाराम महाराजांना राज्यकारभार व शालेय शिक्षण, दोन्ही चांगल्या प्रकारचे देण्याची व्यवस्था केली होती...