अंधारातील हिरे


-  ज्‍योती शेट्ये

  क्रिकेट, अभिनय, राजकारण अशा ग्लॅमर प्राप्‍त असलेल्‍या क्षेत्रातील व्‍यक्‍तींना प्रकाशझोतात येण्‍यासाठी जास्‍त परिश्रम घ्‍यावे लागत नाहीत. ही मेहनत त्‍या क्षेत्रांच्‍या वाट्याला येते जी ग्‍लॅमरच्‍या वेशीबाहेर उभी असतात. हा प्रकाशझोत न लाभलेल्‍या व्‍यक्‍ती अंधारातील हि-यांप्रमाणे भासतात. अशा व्‍यक्‍तींच्‍या कर्तृत्‍वाची नोंद घेण्‍यास समाज किती अनिच्‍छुक असतो याचा प्रत्‍यक्षानुभव मांडतायत ज्‍योती शेट्ये...

-  ज्‍योती शेट्ये

     अपा शेर्पा व्‍यक्‍तीने एकवीस वेळा एव्‍हरेस्‍ट शिखरावर यशस्‍वी चढाई केली या गोष्टीचे तुम्हाला आश्‍चर्य वाटते? तर मग पुढील वाक्‍य तुम्‍हाला थक्‍क करून सोडेल! दोन्‍ही पाय नसलेल्‍या एका व्‍यक्‍तीने चक्‍क एव्‍हरेसट सर केला! त्याने शिखर पादाक्रांत केले असे म्‍हणता येणार नाही, कारण त्‍याने कृत्रिम पाय बर्फात रोवत सागरमाथ्‍्यावर झेंडा लावला. त्यांचा गिरीमित्र संमेलनात सत्कार करण्यात आला. मात्र त्याबाबत फार उल्लेख कुठे वाचले नाहीत वा एकले नाहीत.

     मी मे महिन्‍यात मनालीला गेले होते. तेव्‍हा एका खासगी वाहिनीवर माझ्या भाचीची मुलाखत झाली. ती व्‍यवसायाने अभिनेत्री आहे, या संदर्भात मला अनेकांनी चांगल्‍या प्रतिक्रिया दिल्‍या. एका मैत्रिणीने तर त्याच वेळी मला फोन करून, सुरू असलेली मुलाखत फोनवर ऐकवली. राष्‍ट्रीय जलतरणपटू असलेल्‍या माझ्या दुस-या भाचीला त्‍याच महिन्‍यात महाराष्‍ट्र राज्‍य सरकारतर्फे दिला जाणारा छत्रपती पुरस्‍कार मिळाला. मात्र ही गोष्‍ट मला माझ्या जवळच्‍या एकाही नातेवाईकाने सांगितली नाही! तिची बहीण काही दिवसांपूर्वी मला भेटली, त्‍या वेळी मला ही ‘ग्रेट न्‍यूज’ समजली. या पुरस्‍कारामागे माझ्या भाचीचे आणि तिच्या वडिलांचे (माझ्या भावाचे) तिच्‍या वयाच्‍या चौथ्‍्या वर्षांपासूनचे अनंत कष्‍ट आणि परिश्रम आहेत. तिने सेकंदाच्‍या फरकाने यश संपादन केले आहे.

     ज्‍या क्षेत्रांना ग्‍लॅमर प्राप्‍त आहे, त्‍यांतील व्‍यक्‍तींचा नेहमी गाजावाजा होतो. त्‍यांची दखल घेणे किंवा त्‍यांना लोकाश्रय मिळणे हे सहज घडते. मात्र ग्‍लॅमरच्‍या वेशीबाहेरील इतर क्षेत्रांच्‍या वाट्याला उपेक्षा येते. एव्‍हरेस्‍टवर चढाई करणारी व्‍यक्‍ती किंवा तिच्यासारखी इतर प्रयत्‍नशील माणसे ही ‘कोंदण न लाभलेले हिरे’ आहेत. आपण नवे हिरे घडवत नसू तर एकवेळ ठिक, पण आहेत त्‍या हि-यांना निदान अंधारात तरी ठेवू नये.

ज्‍योती शेट्ये, 9820737301,  jyotishalaka@gmail.com

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.