फ्लायओव्हरवर बसची संख्या वाढणे गरजेचे


- अशोक दातार 

     मुंबई शहरात बांधण्‍यात आलेल्‍या लालबाग येथील फ्लायओव्‍हरचे उद्घाटन झाले. मात्र फ्लायओव्‍हर उभारणे कितपत फायद्याचे आहे, हे पाहणेही महत्‍त्‍वाचे ठरते. सायनपासून सीएसटीपर्यतच्‍या अकरा किलोमीटरच्‍या रस्‍त्‍यात सुमारे दोन तृतीयांश भाग (सात किलोमीटर) फ्लायओव्‍हरनी व्‍यापलेला आहे. फ्लायओव्‍हर बांधल्‍याने वाहतूक वेगवान होण्‍याची अपेक्षा असते, मात्र प्रत्‍यक्षात तसे घडत नाही.

- अशोक दातार

     मुंबई शहरात बांधण्‍यात आलेल्‍या लालबाग येथील फ्लायओव्‍हरचे उद्घाटन झाले. मात्र फ्लायओव्‍हर उभारणे कितपत फायद्याचे आहे, हे पाहणेही महत्‍त्‍वाचे ठरते. सायनपासून सीएसटीपर्यतच्‍या अकरा किलोमीटरच्‍या रस्‍त्‍यात सुमारे दोन तृतीयांश भाग (सात किलोमीटर) फ्लायओव्‍हरनी व्‍यापलेला आहे. फ्लायओव्‍हर बांधल्‍याने वाहतूक वेगवान होण्‍याची अपेक्षा असते, मात्र प्रत्‍यक्षात तसे घडत नाही.

     फ्लायओव्‍हर बांधल्‍यावर पहिले काही दिवस वाहतूक वेगात होते, मात्र काही काळानंतर वाहतुकीचा वेग मंदावतो. फ्लायओव्‍हरवरून वाहने वेगात जात असली तरी फ्लायओव्‍हरच्‍या दोन्‍ही टोकांवर वाहतुकीची कोंडी होत असल्‍याचे कालांतराने लक्षात येते. नुकत्‍याच बांधलेल्‍या लालबाग  फ्लायओव्‍हरचे उदाहरण घेतले, तर फ्लायओव्‍हरच्‍या सीएसटीच्‍या टोकाला सकाळी तर सायन दिशेच्या टोकाला सायंकाळच्‍या सुमारास वाहतुकीचे मोठे प्रमाण असते. वाहने फ्लायओव्‍हरच्‍या मधल्‍या भागावरून वेगाने जात असली तरी जेव्‍हा ती फ्लायओव्‍हरच्‍या मुखाजवळ येतात, तेव्‍हा तिथे वाहतुकीची कोंडी होत असल्‍याचे निदर्शनास येते. आधीच या भागात असलेली कोंडी वेगाने येणा-या वाहनांच्‍या संख्‍येमुळे वाढत जाते. रस्‍त्‍यांच्‍या तुलनेत वाहनांची संख्‍या जास्‍त असणे हे आणखी एक महत्‍त्‍वाचे कारण आहे. त्‍यामुळे वाहतुकीचा वेग वाढण्‍याच्‍या अपेक्षेने फ्लायओव्‍हर बांधण्‍यात येत असले, तरी त्‍यांचा मूळ उद्देश सफल होत नाही.

     या संदर्भात काही उपाय सुचवता येतात. फ्लायओव्‍हरवर वाहनांची संख्‍या कमी झाल्‍यास सगळीच वाहतूक वेगात होऊ शकेल यासाठी सार्वजनिक प्रवासी व्‍यवस्‍थेला अधिक वाव द्यायला हवा. फ्लायओव्‍हरवरून जाणा-या बसेसची संख्‍या वाढवायला हवी. त्‍यामुळे बसचा वेग वाढेल आणि प्रवाशांनाही बसने प्रवास करण्‍याची इच्‍छा होईल. एक बस तीन गाड्यांची जागा व्‍यापते आणि त्‍यात जवळपास पंचवीस गाड्यांचे प्रवासी सामावू शकतात! हा उपाय अवलंबल्‍यास वाहतूक आणि पर्यावरण, अशा दोन्‍ही बाजूंनी फायदे होऊ शकतील.

अशोक दातार, वाहतूक अभ्‍यासक, संपर्क – 9867665107

(प्रस्‍तुत लेखकाने ‘मुंबईतील वाहतूक’ या विषयावर अभ्‍यास केला असून त्‍याचे या विषयावरील ‘वाहतूक ठप्‍प, बसू नका गप्‍प’ हे पुस्‍तक प्रकाशित झाले आहे.)

{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.