मुस्लिम महिला मंत्री :


मुस्लिम महिला मंत्री :

ग्रेट ब्रिटनच्या अलिकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये संमिश्र सरकार निवडून आले आहे. देहिड कॅमेरॉन हे ग्रेट ब्रिटनचे नवे पंतप्रधान आहेत. मंत्रीमंडळात काँझर्वटी पक्ष आणि लिबरल डेमॉर्कट अशा दोन पक्षांचे मंत्री सरकारात आहे. त्याचे वैशिष्टय म्हणजे सईदा वारसी नावाची पाकिस्तानी महिला त्यात समाविष्ट आहे. सईदा वारसी या औऊस ऑफ लॉड्स या सभागृहाच्या सभासद आहेत. त्यांचे वय फक्त एकोणचाळीस वर्षांचे आहे. त्या म्हणतात, की मी कामगार वर्गातून आलेली असून माझी मंत्री म्हणून निवड झाली. यावरून कॉझर्वटीव पक्ष किती पुरोगामी आहे हे स्पष्ट होते. त्या स्वत:चा धर्म ईस्लाम असल्याचा आणि त्या मुळ पाकिस्तानातून आल्या असल्याचा स्पष्ट व नि:संकोच उल्लेख करतात.

सईदा यांचा जन्म इंग्लंड मध्ये झाला. त्यांचे वडील साधे कामगार होते. सईदा यांनी मात्र डूझबरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि लिडर्स विद्यापीठातून त्या कायद्याच्या पदवीधर झाल्या. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांच्या चळवळीत बराच भाग घेतला. त्यातूनच पुढे त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांच्याकडे सामाजिक एकात्मता हे महत्त्वाचे कार्य आहे. मात्र त्या मंत्री बीन खात्याच्या आहेत.

स्वयंपाक्याला ईस्टेट :

अमेरिकेतील रूथ फोर्ड नावाच्या नटीचा अलिकडेच चौऱ्याण्याव्या वर्षी मृत्यू झाला. तिने आपली पंच्याऐंशी लाख डॉलर किंमतीची ईस्टेट आपल्या स्वयंपाक्याच्या नावावर केली आहे. हा स्वयंपाकी तीस वर्षांपूर्वी नेपाळ मधून त्यांच्याकडे कामासाठी म्हणून आला. रूथ फोर्ड यांनी आपली मुलगी व नातवंडे यांचा पूर्वीच त्याग केला आहे.

रूथ फोर्ड यांचा भाऊ लेखक आहे. त्याचे नाव च्यार्ल्स हेंद्री फोर्ड असे आहे. तो एक कादंबरी लिहिण्याच्या निमित्ताने नेपाळ मध्ये गेला असता त्याला तमांग हा स्वयंपाकी काठमांडूला भेटला. चार्ल्स कमांगला घेऊन अमेरिकेत परतला. त्यानंतर कमांग या भावा-बहिणीकडे स्वयंपाकाचे काम करी. त्यामधून त्याचा संबंध दृढ होत गेला.

रूथ फोर्ड या सुसंस्कृत महिला होत्या. त्यांच्याकडे मोठ मोठे लेखक, कलावंत नियमित येत. त्यामध्ये विल्यम फॉकर्नर सेसील ब्रिटन, टयुमन कपोते, ऍण्डी ऑरहॉल वगैरेंचा समावेश आहे. रूथ यांच्या ईस्टेटीमध्ये त्यांच्या दोन इमारती व अनेक उत्तम चित्रकृती यांचा समावेश आहे.

ऋतीकचे इंग्रजी :

काईट्स नावाच्या नव्या इंग्रजी-हिंदी चित्रपटामुळे, असिम छाब्रा या न्यू यॉर्क येथील स्तंभ लेखकाने एक वेगळेच निरिक्षण नोंदवले आहे. तो म्हणतो, की बॉलिवूडमधल्या नट-नटया इंग्रजी बोलताना पुरेसे कष्ट घेत नाहीत. त्यांना भारतात ऐशाआरामात काम करण्याची सवय झालेली असते. परंतु हॉलिवूडमध्ये अपार कष्ट घ्यावे लागतात आणि शिस्त पाळावी लागते. इंग्रजीचे उच्चारण नीट नसलेल्या कलावंतांमध्ये ऋतीक बरोबर ऐश्वर्या रॉय (ब्राईड ऍण्ड प्रिझ्युडीस), सलमान खान (मेरी गोल्ड), अभिषेक बच्चन (दिल्ली-6) यांचा उल्लेख केला आहे. या उलट ओमपुरी आणि इरफान खान यांचे इंग्रजी उच्चार योग्य असतात, असे प्रमाणपत्र छाब्रा देतात.

छाब्रा यांनी एक वेगळा प्रसंग नमूद केला आहे. काईट्स चित्रपटाची न्यू यॉर्कमध्ये प्रेस कॉन्फरन्स होती. ऋतीक रोशन उत्तरे देत होता. त्याला जर्मनीतील डयुश वेली रेडिओच्या प्रतिनिधीने हिंदीत प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना ऋतीकने हिंदी भाषेत बोलण्यास सुरुवात केली. परंतु एक-दोन वाक्य होताच त्याला पुढे स्वत:चे हिंदी बोलता येईना आणि त्याने इंग्रजी भाषेत उत्तर पूर्ण केले.

ग्लोबीश :

रॉबर्ट मॅक्रम या ब्रिटिश लेखाने ग्लोबीश या नव्या भाषेवर पुस्तक लिहिले असून त्याचे उप शीर्षक इंग्रजी ही जागतिक भाषा कशी झाली.

ते म्हणतात, की एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश इंग्रजी हे आंतरराष्ट्रीय होते. वीसाव्या शतकात अमेरिकन इंग्रजीने ते स्थान पटकावले. आता, एकवीसाव्या शतकात ग्लोबीश भाषेचा वरचष्मा राहणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी 'येस, वी कॅन' ही घोषणा सर्वत्र प्रसिध्द केली. अशी छोटी-छोटी वाक्ये, साधे-साधे वाकप्रचार, जगभरातल्या भाषांमधील शब्दांचा समावेश आणि मुख्य म्हणजे शरिराच्या हालचालीतून अधिक व्यक्त होणे ही या नव्या भाषेची वैशिष्टये आहेत, असे मॅक्रम नमूद करतात.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.