तुळसण


_Tulsan_1_0.jpgतुळसण गाव हे कराड तालुक्याच्या सातारा जिल्ह्यात आहे. तुळसण गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. तुळसण गावची लोकसंख्या चार हजार पाचशे नव्वद इतकी आहे. निनाईदेवी ही तुळसणची ग्रामदेवता. गावात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यात्रा दसऱ्याला असते. यात्रा तीन दिवस असते. निनाईदेवीची पालखी संध्याकाळी पाच वाजता निघते आणि विठ्ठलवाडीपर्यंत जाऊन पुन्हा गावात रात्री एक-दोन पर्यंत येते. यात्रेआधी नऊ दिवस जागर असतो. यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. ऑर्केस्ट्राही ठेवला जातो. गावात यात्रेच्या शेवटच्या दिवशी दंडस्नान (लोटांगण घेत मंदिरापर्यंत जाण्याची) प्रथा आहे. गावात निनाईदेवी, दत्त, गणपती, हनुमान, शंकर, ज्ञानेश्वर, विठ्ठल-रूक्माई, लक्ष्मी, गगननाथदेव अशी आठ मंदिरे आहेत. गुढीपाडव्याला पारायण असते. तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात भजन होते. श्रीराम नवमीला काल्याचा कार्यक्रम असतो. त्यादिवशी घरी चूल पेटवत नाहीत. गावात पाऊस चांगला पडतो. लोक ऊस, भूईमूग, ज्वारी, मका तसेच पालेभाज्यांचे ही उत्पादन घेतात. गावात बाजार नाही, परंतु शेजारील गावांत (उंडाळे, ओंड, काले या गावांत) बाजार भरतो. गावात दहावीपर्यंत शाळा आहे. मुले पुढील शिक्षणासाठी उंडाळे, कराड या ठिकाणी जातात. पुरातन पांडवकालीन म्हटले जाणारे शिलालेख गावात आहेत. गावात येण्यासाठी एस. टी. ची सोय नाही, परंतु गावात जीपगाडीची व्यवस्था आहे. गावाच्या सभोवताली डोंगर आहे. गावात दोन तलाव आहेत.

गावात काकासाहेब माने यांची निनाईदेवी आणि शामराव पाटील यांची अशा दोन पतसंस्था आहेत. गावात चार ते पाच दुधसंघ आहेत. नवरंग गणेश मंडळ आणि नेहरू युवा गणेश मंडळ ही मंडळे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करत असतात.

_Tulsan_2.jpgगावात ग्रामपंचायतीची स्थापना 1953 मध्ये झाली. गाव 257 कराड विधानसभा मतदारसंघात व 45 सातारा लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे. गावातील पन्नास टक्के लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. काही लोक कराड एम.आय.डी.सी. मध्ये काम करतात. ड्रायव्हर, वकील, एल.आय.सी एजंट असे काही व्यावसायिक आहेत. गावात अरविंद माने नावाचे शिक्षक यांनी निवृत्तीनंतर पेन्शनच्या पैशांतून गावात वृक्षारोपण केले. त्यानी वडगांव, दहिवडी या गावांतदेखील वृक्षारोपण केले. त्यांनीच गावात एनआरडीएफ फाउंडेशनची स्थापना केली आहे. ते गावातील युवकांना संघटीत करून ग्रामविकासाचे कार्य करत अाहेत. तीन-चार किलोमीटर परिसरात शिंदेवाडी, कोळे, सवादे, कुसूर ही आजूबाजूची गावे आहेत.

माहिती स्रोत : रोहित शिवाजी साळुंखे 9604701261

- नितेश शिंदे

लेखी अभिप्राय

Rahul dilip veer

rahul veer19/05/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.