दुशेरे – जाधवांचे गाव (Dushere)


_Dushere_1.jpgदुशेरे हे गाव सातारा जिल्ह्यात कराड या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. तो भाग पश्चिम महाराष्ट्राचा. दुशेरे गावातील अधिकांश लोकांचे आडनाव जाधव हे आहे. ‘जाधवांचे गाव’ म्हणून ते प्रसिद्ध आहे. दुशेरे हे नाव कसे पडले? काहीजण सांगतात, की तेथे दुसऱ्या प्रदेशातील लोक आले म्हणून दुशेरे!

दुशेरे गावाचे तीन भाग पडतात. एक - दुशेरे गाव, दुसरा -  म्हसोबा माळ आणि तिसरा -चैनीमाळ. ते गाव स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील अनेकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कार्य केलेले आहे.

गावात प्रवेश केल्यावर मंदिर दिसते ते गावचे ग्रामदैवत हनुमान, याचे मंदिर आहे. गावात लक्ष्मी, म्हसोबा, नागोबा, विठ्ठलरुक्मिणी आणि वेताळेश्वर अशी मंदिरे आहेत. गावची जत्रा हनुमान जयंतीला असते. गावात गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, रामनवमी असे उत्सव साजरे केले जातात. गावातील लोक आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. गावात दोस्ती समाजसेवा मंडळ आहे.या मंडळामार्फत गणपतीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावात हनुमान दूध डेअरी आणि महिला पतसंस्था दूध डेअरी आहेत.

गावाची लोकसंख्या तीन ते चार हजार आहे. गावातील सर्व लोक सुशिक्षित आहेत. गावातील अनेक लोक कराड तालुक्याला कामासाठी जातात. तसेच, काहींचे स्वतःचे व्यवसायदेखील आहेत. अनेकजण नोकरी करून शेती व पशुपालन हा जोडधंदा  करतात.

_Dushere_2_0.jpgतेथे जाण्यासाठी कराडहून एसटीची सुविधा आहे. शेणोली हे रेल्वे स्टेशन जवळ आहे. तेथील वातावरण सुंदर आहे. तेथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाळ्यात ओढादेखील ओसंडून वाहतो. गावाच्या दक्षिणेस कृष्णा नदी वाहते. त्यामुळे वर्षभर पिके घेतली जातात. कृष्णा नदी प्रसिद्ध आहे. गावात बाजार भरत नाही. वडगाव या पाच किलोमीटरवर असलेल्या गावात बाजार भरतो.

गावात ग्रामपंचायत आहे. त्यांची सदस्यसंख्या सरपंच धरून दहा आहे. गावात शिक्षणाची सोय आहे. प्राथमिकपासून सातवीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थी कराड, वडगाव, कोडोली येथे जातात. आटके, मुनावळे, कोडोली, कार्वे, गोंदी, वडगाव, शेरे ही आजूबाजूची पाच किलोमीटर परिसरातील गावे आहेत. कराड हे जवळचे शहर आहे.  

माहिती स्रोत: शुभम शंकर गायकवाड -9604109404

- नितेश शिंदे

लेखी अभिप्राय

खूप छान माहिती, keep it up

Prashant Jadhav 08/05/2018

Nice

Sandeep Jadhav29/07/2018

सुंदर लेख आहे । अजून पण बरीच माहिती लिहिता येईल

vaibhav30/07/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.