गावगाथा

प्रतिनिधी 01/05/2018

चला! आपली गावं जपून ठेवुयात.

आवाहन

माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी त्याचा गाव त्याच्या मनातून दूर जात नाही. आठवणी, अनुभव, संस्कार, तेथे झालेली शरीर आणि मन यांची घडण यांच्या मिश्रणातून गावाबद्दलची जी ओढ तयार होते ती विलक्षण असते. म्हणूनच माणसाने त्याच्या गावाचे नाव कोठेही निव्वळ वाचले-पाहिले तरी त्याला आनंद होतो. प्रत्येकाचे ते गाव कायमस्वरूपी नोंदले जावे आणि तेथील प्रथा-परंपरा-जत्रा-इतिहास या तऱ्हेची माहिती जगभर सर्वत्र पोचत राहावी याकरता ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलने महाराष्ट्रातील सर्व गावांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. तुम्हीदेखील त्यात सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या गावासंबंधात मोठा, विस्तृत लेख लिहून द्यावा अशी अपेक्षा नाही. तुम्ही तुमच्या गावाची माहिती पंचवीस ते तीस वाक्यांत लिहून पाठवली तरी चालेल. ती माहिती तुमच्या नाव-फोटो-संपर्क यांसह 'थिंक महाराष्ट्र'चे वेबपोर्टल आणि अॅप यांवर प्रसिद्ध केली जाईल. जर तुमच्या गावाची नोंद 'थिंक महाराष्ट्र'वर आधीच झालेली असेल तर 'थिंक महाराष्ट्र'चे संपादकीय मंडळ तुम्ही पाठवलेली माहिती मूळ लेखात समाविष्ट करेल. त्यात 'माहिती संकलन सहाय्यक' म्हणून तुमच्या नावाचा उल्लेख करण्यात येईल.

गावाची माहिती लिहिताना पुढील मुद्दे समाविष्ट करावे. -
गावाचा तालुका आणि जिल्हा कोणता? गावाच्या नावाच्या उत्पत्तीची दंतकथा आहे का? गावात कोणकोणती मंदिरे आहेत? ग्रामदैवताचे नाव काय? त्याची माहिती. ग्रामदैवताच्या नावाने जत्रा किंवा यात्रा आहे का? ती कशी आयोजित-साजरी केली जाते? गावाचा इतिहास, स्थानिक कला आणि उत्सव, गावात वा गावाजवळ असलेली लेणी-किल्ले किंवा इतर ऐतिहासिक-पुरातन वास्तू, तेथील बाजार, सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, गावात असलेल्या किंवा होऊन गेलेल्या उल्लेखनीय व्यक्ती, गावातील संस्था किंवा उपक्रम, गावाची लोकसंख्या, गावातील लोकांची भाषा-बोलीभाषा, गावातील नदी-तलाव, पावसाचे प्रमाण, शिक्षणाची सोय, पाणी आणि पिके यांची स्थिती, हवामान, पर्यटन स्थळ, गावातील इतर व्यवसाय, गावापर्यंत पोचण्याची वाहतूक व्यवस्था व मार्ग, तसेच, गावाची इतर वैशिष्ट्ये! सर्वात महत्वाचे म्हणजे तेथील माणसे – त्या माणसांच्या हकिगती, त्यांची कर्तबगारी.

हे सगळेच मुद्दे तुमच्या लेखनात यावेत असा आग्रह नाही. तुम्ही तुम्हाला शक्य तितक्या मुद्यांची माहिती द्यावी. त्यात कमतरता राहिली तर ती 'थिंक महाराष्ट्र'चा संपादकीय विभाग तुमच्याशी व अन्य संबंधितांशी संपर्क करून भरून काढेल. माहिती पाठवताना गावाचे किंवा उल्लेखलेल्या मुद्द्यांचे फोटो जरूर पाठवावेत.
तुम्ही ती माहिती लिहून ‘थिंक महाराष्ट्र’कडे पुढील मार्गांनी पाठवू शकता.

इमेल -  info@thinkmaharashtra.com
व्हॉट्स अॅप - 9892611767 किंवा 9323343406
पत्ता - २२, पहिला मजला, मनुबर मँन्शन, १९३ आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व), मुंबई - ४०००१४
संपर्क - नितेश शिंदे (उपसंपादक, 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम', 9323343406.)

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' २०१० सालापासून महाराष्ट्रभराची सामाजिक-सांस्कृतीक माहिती गोळा करून ती ऑनलाईन मांडत आहे. तुम्हाला ती माहिती 'थिंक महाराष्ट्र'च्या वेबपोर्टलवर (www.thinkmaharashtra.com) किंवा अॅपवर (डाऊनलोड करा - https://goo.gl/DM3RRW) वाचता येईल.
धन्यवाद.

- टीम 'थिंक महाराष्ट्र'

लेखी अभिप्राय

छान उपक्रम राबवित आहात.. मी सुद्धा माझ्या गावाची म्हणजे मुरूड-जंजिराची माहिती तुमच्या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करेन..?

अतुल अनंत मोरे06/05/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.