कुळकथा सांगणारा हेळवी समाज


भटक्या विमुक्त समाजामध्ये असा एक समाज आहे, की त्या समाजाकडे प्रत्येक कुळाची संपूर्ण माहिती मिळू शकते! तो हेळवी समाज होय. तो कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात काही गावांमध्ये आढळून येतो. तो कर्नाटकात चिक्कोडी, निपाणी, संकेश्वर, रायबाग, अथनी, गोकाक या तालुक्यांतील जोडकुरळी, नंदीकुरळी, पट्टणकडोली, चिंचणीमायाक्का, भिरडी, शेडबळ, सत्ती,  गुंडखेत्र,  हुक्केरी आदी गावांमध्ये व शहरांमध्ये; तसेच, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आढळून येतो. तो समाज लिंगायत असल्याने त्यांचे धर्माचरण, चालीरीती, परंपरा लिंगायत समाजाप्रमाणे आहेत. मुत्तावर, हालनावर, टंकरावर, इरलावर व चन्नाबचावर अशा पाच कुळी त्या समाजात मानल्या जातात. समाज त्या पाच कुळांमध्येच विस्तारला गेला आहे. चिंचणी मायाक्का, उदगट्टी उद्धवा, कल्लोळी हनुमंता ही त्या समाजाची दैवते. सपाडल स्वामी हे समाजाचे गुरू आहेत. ते प्रत्येक समाजबांधवाच्या घरी वर्षातून एकदा जातात.

महाराष्ट्रात भटक्या विमुक्त समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आश्रमशाळा आहेत. हेळवी समाज महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जातीजमातींमध्ये येतो, परंतु तो कर्नाटकात मात्र इतर मागासवर्गात येतो. गोकाक ही हेळवी समाजाची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखली जाते. कुळकथा सांगण्यासाठी गावोगावी भटकंती करत असलेल्या हेळवी समाजाची मुले गोकाक येथे शिक्षण घेतात. तेथे त्या समाजाची स्वतःच्या मालकीची आश्रमशाळा आहे. शाळेला शासनाचे अनुदान नाही. समाजाच्या लोकवर्गणीतून आश्रमशाळा चालवली जाते.

शासनाच्या तहसिल कार्यालयात ज्याप्रमाणे रेकॉर्ड रूममध्ये जन्ममृत्यूच्या नोंदी ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे किंवा त्याहूनही अद्यावत अशा नोंदी हेळवी समाजाकडे ठेवल्या जातात. हेळवी समाजाकडे १०६१ सालापासूनच्या (शके ९८२) कुळाच्या नोंदी आढळून येतात. कोल्हापूर परिसरातील काही कुटुंबांची वंशावळ नोंदवून ठेवणारे हेळवी नंदी गुंडक्‍याळ (कुन्नूर, ता. चिक्‍कोडी) या गावात राहतात. त्यांच्याकडे अनेक कुटुंबांची गेल्या चार-पाचशे वर्षांतील माहिती आहे. हेळवी समाजाकडे नंदिकर संस्थान, निपाणीकर संस्थान, कोल्हापूर संस्थान, सातारा संस्थान, येडुरकर संस्थान, चिंचणीकर संस्थान, बेकिरीकर संस्थान, मरबकर संस्थान आदी संस्थानांचे सतरा-अठरा पिढ्यांचे रेकॉर्ड पाहायला मिळते. समाज प्रतिनिधी मुख्यत्वे करून बेळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आदी जिल्ह्यांत व राज्यांत कुळकथा सांगण्यासाठी व नवीन नोंदी घेण्यासाठी जातात. ते दिवाळीनंतर त्या कामासाठी घराबाहेर पडतात. वाहन बैलगाडी किंवा छकडा.

समाजातील लोकांना राहायला पक्की घरे नाहीत. उघड्यावर ऊन, वारा, पाऊस सहन करत वंशावळीचे रेकॉर्ड मात्र ते सुरक्षित ठेवतात. एका मोठ्या लोखंडी पेटीमध्ये त्या त्या भागाचे रेकॉर्ड जपून ठेवले जाते.

समाजातील लोकांनी त्यांची त्यांची गावे वतनाप्रमाणे विभागून घेतली आहेत. ते दरवर्षी त्याच गावात जायचे व नवीन जन्म, मृत्यू, लग्न आदींच्या नोंदी घ्यायच्या. पूर्वी ते सुगीनंतर येत असत. त्यांच्‍या नोंदींच्‍या बदल्यात पूर्वी त्यांना गावातील लोक धनधान्य, शेळी, मेंढी, बकरे, कोंबडी, कपडालत्ता किंवा गुंजभर सोनेही दान म्हणून देत. आता, लोक पैसे देतात व त्यास मर्यादा येते. त्यामुळे पिढ्यान् पिढ्यांची कुळांची नोंद ठेवणारा हेळवी समाज उपेक्षित झाला आहे.

नंदीकुरळी गावचे (ता.रायबाग जि.बेळगाव) उद्दप्पा महादेव हेळवी यांची चिक्कोडी येथे भेट घेतली. ते म्हणाले, पूर्वीचे दिवस चांगले होते. लोक मोठ्या प्रमाणात दान करायचे. आता बदल झाला आहे. जी काही घराणी मोठी आहेत तेथे आदरातिथ्य होते. इतरत्र मात्र हेटाळणी केली जाते. गावात घर नाही, शेतीबाडी नाही, सततच्या भटकंतीमुळे शिक्षण नाही. दिवाळीत घर सोडले की पावसाळ्यापर्यंत फिरावे लागते. लहान मुलांना बरोबर घेऊनच भटकंती करावी लागत असल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहवे लागते. जुलै महिन्यात पुन्हा गावाकडे येतो. चार महिने राहून पुन्हा भटकंतीसाठी बाहेर पडतो.

गेल्‍या वीस-पंचवीस वर्षांमध्‍ये हेळवी समाजाचे महत्त्व कुणी जाणून न घेतल्‍याने त्‍या समाजाने अनेक भागांमध्‍ये फिरणे बंद केले आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत हेळव्यांना गावांमधून प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. ते त्‍यांच्‍या परंपरागत कुटुंबात नोंदी घ्यायला गेले, की त्यांच्याकडे संशयाने बघितले जाऊ लागले. काही कुटुंबे माहिती देण्याचे टाळू लागले. काही जणांनी तर वंशावळीच्या नोंदीची गरज नाही म्हणून हेळव्यांना परत पाठवले. परिणामी हेळवी यायचे बंद झाले.

- सूर्यकांत भगवान भिसे

(प्रस्‍तुत लेख सूर्यकांत भिसे यांच्‍या 'भटक्‍यांची भटकंती' या आगामी पुस्‍तकातून घेण्‍यात आलेला आहे.)

Last Updated On - 29 Mar 2016

लेखी अभिप्राय

छान माहिती देणारा हा लेख आहे. हा विषय भारतीय चित्रपटात काही अंशी येऊनही गेला आहे. लहानपणी ही मंडळी गावात सुगीच्या दिवसात येताना दिसत होती. पण आता मात्र क्वचितच यांच्या विषयी ऐकायला मिळते. हा लेख वाचून आपल्या दुर्मिळ आणि ख-या इतिहासाला आपली आणि पुढील पिढी मुकणार आहे. नंतर एखादा परदेशी नागरिक संशोधन करून आपलाच इतिहास सांगेल आणि मग...

राम कोंडीलकर 01/10/2015

महाराष्ट्रामध्ये अडगळीत पडलेल्या समाजाला आपण समाजासमोर आणलात त्या बद्दल धन्यवाद सर. आपल्या सोलापुर जिल्ह्यातही हेळवे समाज आहे. दक्षिण सोलापुर तालुक्यातील मंद्रुप व अक्कलकोट तालुक्यातील करजगी तसेच सोलापुर शहरातही हा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. अधिक संशोधनासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करु. माझा पत्ता - मु.पो.मंद्रुप ता.दक्षिण सोलापुर जि.सोलापुर. 9011582700

कल्लप्प मारुती…01/10/2015

मी माझ्या समाजासाठी काहीतरी करून समाजातील लोकाना एकत्र करून वंश कसे पुढे चालु राहिल आणि तसेच सरकार कडून मदत कशी मिळेल याबद्दल माहिती हवी आहे. त्यासाठी तुमची मदत हवी. तुमचे 'थिंक महाराष्ट्र'चे उपक्रम चांगले असून तुमच्या पुढील कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा.

श्रीकांत हेळवे 20/03/2016

Khup chan mahiti ahe purvi saraka notebook tevacha hot nahi ata caputar , lafatof soy vayala fayaje

Parshuram hela…04/09/2016

कोल्हापूर
लेख खूपच छान आहे
मला माझ्या कुटुंबियांची माहिती तसेच कूळ कुलावळ संपूर्ण माहिती एका हेळवी ने दिली
माझ्या कुटुंबियांची १६०४ पासूनची माहिती मला मिळाली

सागर गाडे27/10/2016

माझ गाव मु.पो.घोटवडे,ता.सुधागड जि.रायगड,पिन:-D ४१०२०५ हेळवी येत नाहीत,तरी आमचे हेळवी कुठे राहतात
कोन ही मिळाली
तर बरः होईल बर्याच लोकांना वंशवेळ माहित नाही.स्वतःच्या माहिती किंवा आमच्याकडे

योगेश ह.मोरे14/12/2017

माझ गाव मु.पो.पाटण जि सातारा आमचे इकडे हेळवी लोक येत नाहीत, आम्हाला आमची वंशावळ हवी होती कृपया ता पाटण मधील वंशावळ नोंद ठेवणारे हेळवे कुठे राहतात हे माहीत असेल तर कृपया सांगा
मोबा नं 9421865098

yogesh chaudhari17/01/2018

मिसाळ आडनावाचे गोत्र मिळेलका

सुखदेव Misal 04/02/2018

9892294370

सुखदेव Misal 04/02/2018

मी बेळगाव मधून आहे माझे माहेरचे आडनाव रोकडे व सासरे आडनाव रणखांबे आहे आमच्या दोन्ही कडच्या कुटुंबातील लोकांनी त्याची कुलावळ व कुलदैवत माहिती नाही त्यामुळे काही देवकार्य करताना अडचणी येतात तर कृपया हेळवी समाजात आता ही माहिती सांगत असतील तर त्याचा पत्ता आणिनबर द्यावा मी मुळी सोलापूर आणि सासरे अर्धी तालुक्यातील आहे

Rajashree rana…18/04/2018

मी मूळचा रायगड पोलादपूर चा पण आमची आजी सांगते की आपले गाव खेड मध्ये होते आपण नंतर इथे आलो त्या मुळे आमची कूळ मला माहित नाही म्हणणजे घरात कोणालाच माहीत नाही आणि इकडे हेलवी ही येत नाही आम्हला आमची वंशावळ हवी होती कृपया रायगड जिल्ह्यातील हेळवी समाज कुठे राहतो कुणाला माहीत असेल तर 7709257279ह्या नंबरवर फोन करा..

Uday kadam 09/09/2018

लांजा रत्नागिरी येथील वांशवलीच्या नोंदी ठेवणाऱ्या हेळवी मंडळींचे संपर्क क्रमांक कृपया मिळू शकतील का?

सहदेव रामचंद्र…18/10/2018

nice report.
i need contact number of mahabaleshwar District satara Helavi .
please share .
mob 9960400930

irfan shaikh29/10/2018

Sir, मला चितळी तालुका खटाव जिल्हा सातारा यां गावाचा हेळवी कोण असेल तर मला कॉन्टॅक्ट no. द्या... नाही तर 9004697123 यां no. Contact करायला सांगा.. आमचे गाव धार पवारांचे असल्या मुळे माझ्या वंशावळी चा शोध घेतोय

प्रशांत pawar04/01/2019

Sir, मला चितळी तालुका खटाव जिल्हा सातारा यां गावाचा हेळवी कोण असेल तर मला कॉन्टॅक्ट no. द्या... नाही तर 9004697123 यां no. Contact करायला सांगा.. आमचे गाव धार पवारांचे असल्या मुळे माझ्या वंशावळी चा शोध घेतोय

प्रशांत pawar04/01/2019

मी हरीश नारायण पाटील माझे गाव भाडळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर मला माझ्या वंशाची माहिती हवी आहे. कुलदैवताची माहिती हवी आहे.

Harish patil29/03/2019

सर,मी हलकर्णी ता.चंदगड,जि.कोल्हापूर (महाराष्ट्र) 416552 या गावचा असून मला तात्काळ हेळवी समाजाची माहिती हवी आहे.तरी क्रुपया सदरची माहीती मला मिळावी ही नम्र विनंती. 7798698823

लक्ष्मण यशवंत नाईक01/05/2019

माझे गांव खालिंग बु.पोस्ट-पडघा ता भिवंडी, ठाणे असून मला आमची वंशावळ शोधायची आहे. पूर्वी काही वर्षांपूर्वी वंशावळ सांगायला एक आजोबा नित्यनेमाने यायचे, ती प्रथा आता बंद झाली आहे. तरी सदर त्यांचे कोणी वंशज आसतील तर त्यांचा नंबर मिळेल का? 9702935532.

भरत शेलार01/08/2019

मी भडकंबा साखरपा ता-संगमेश्वर आम्हाला आमची वंशावळ सांगणारे हेळवी कोठे मिळतील.

तृप्ती भोसले 20/11/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.