म्हैसगावचा रामहरी फ्रान्समध्ये!


म्हैसगाव कुर्डुवाडीपासून दहा किलोमीटर दूर आहे. म्हैसगावसारख्या सात-आठ हजार लोकवस्तीच्या गावातील दोन मुले उच्च शिक्षण घेत आहेत! ही कहाणी आहे गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झालेल्या शैक्षणिक प्रगतीची. म्हैसगावात चंद्रकांत कुंभार नावाचे गृहस्थ राहतात. कुंभारकाम हा त्यांचा व्यवसाय. कुंभार यांचा थोरला मुलगा रामहरी फ्रान्समध्ये पीएच.डी. करत आहे व दुसरा मुलगा, नामदेव मुंबई विद्यापीठात पत्रकारितेतील पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे.

रामहरी सांगतो, तो लहान असताना, म्हैसगावातील एकंदर वातावरण चांगले नव्हते. राजकारण बरेच होते व त्याचे पडसाद घराघरात जाणवत. घरांमध्ये भांडणे होत असत. शिवीगाळ चालू असे. गावातील मुलांच्या शिक्षणाकडे कोणी लक्ष देत नसे.

परंतु कुंभाराचे घर त्याला अपवाद होते. रामहरी म्हणाला, की वडिलांना कोठली डिग्री नव्हती, पण आयुष्याच्या शाळेत ते खूप काही शिकले होते. त्यांच्या मुलांनी शिकून मोठे व्हावे असे त्यांना वाटत असे. त्यासाठी ते स्वत: कष्ट करून पै-पै वाचवत. तो पैसा आमच्या शिक्षणासाठी खर्च करत व आम्हाला सतत प्रोत्साहन देत. शाळेतील आमच्या शिक्षकांकडून, आम्हा दोन्ही मुलांच्या अभ्यासातील प्रगतीविषयी जाणून घेत. वेळप्रसंगी धोपटूनही काढत आम्हाला! रामहरीने त्याला उपमा फार छान दिली. मडके बनवताना कुंभार कसा आतून एका हाताचा आधार देतो व वरून त्या मातीला आकार देण्यासाठी मारतो. अगदी तसेच, वडील आमच्या बाबतींत करत होते! घरातून मिळालेले चांगले संस्कार हे शिक्षणामागचे महत्त्वाचे कारण आहे असे रामहरीने आदराने नमुद केले.

रामहरी म्हणाला, मला घडवण्यात माझ्या शिक्षकांचा वाटाही मोलाचा आहे. रामहरीने तो शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या शिक्षकांकडून काय काय शिकला हेही उत्सुकतेने सांगितले. रामहरीचे प्राथमिक शिक्षण म्हैसगावात झाले. त्यावेळी रामहरीला शिकवणारे सकपाळ गुरुजी हे उत्तम शिक्षक होते व उत्तम व्यक्तीही होते. तो सकपाळ गुरुजींकडून कोठलेही काम करायचे ते अगदी मनापासून हा धडा शिकला. रामहरी सहावीपासून जवाहर नवोदय विद्यालय (पोखरापूर) येथे निवासी शाळेत शिकला. बारावीपर्यंतचे शिक्षण त्याच विद्यालयात झाले. रामहरीच्या मते, त्याच्या आयुष्याला खरी कलाटणी नवोदय विद्यालयात मिळाली. तो म्हणाला, “मी सामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी. पण तेथे मला कळू लागले, की मला खूप काही शिकायचे आहे. शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तेथे होते. आजुबाजूला असणारे विद्यार्थी-मित्र हुशार होते. अभ्यासाबरोबर इतर गोष्टींतही तेथे आवड निर्माण झाली. उदाहरणार्थ खेळ, प्रत्येक बाबीत शिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन, पाठीवर मिळणारी शाबासकीची थाप ही प्रोत्साहित करत गेली आणि अगदी नकळतपणे स्वत: स्वत:चे निर्णय घ्यायला सुरुवात केव्हा केली ते माझे मलाच कळले नाही. अकरावीमध्ये गणिताऐवजी बायोटेक्नॉलॉजी विषय घेतला, त्याला कारण निखिलकुमारसर. त्यांच्यामुळे, त्यांच्या शिकवण्यामुळे बायोटेक्नॉलॉजी विषयात गोडी निर्माण झाली आणि त्याच विषयात पुढे करिअर करायचे हे निश्चित करता आले. कठोर परिश्रम करायला हवेत हेही निखिलकुमारसरांकडून शिकायला मिळाले. मगरसरांकडून आयुष्यात प्रामाणिकपणे वागायचे, नीतिमूल्यांचे पालन करायचे हे शिकलो."

लायब्ररी व लायब्ररीयन या दोघांशी मैत्री करायला हवी. हे राऊतसर व झांबरेमॅडम यांच्याकडून रामहरी सातवीत असताना शिकला. त्याचा उपयोग त्याला आयुष्यात पुढे खूप झाला व अजूनही होत आहे. रामहरीला इंग्लिश शिकवणाऱ्या रावसरांनी संभाषणकौशल्य शिकवले. संभाषणातही वादविवाद – चांगल्या मुद्यांवर करता आला पाहिजे. दुसऱ्यांचे मुद्दे चांगले कोणते? त्याची प्रशंसा करणे हेही रावसरांनी शिकवले. केवळ पाठ्यपुस्तकासंबंधी विचार न करता, पाठ्यपुस्तकाबाहेरील इतर विषयांचा विचार करण्यासही रावसरांनी प्रोत्साहित केले.

आयुष्यात त्याला जी अनेक व्यक्तिमत्त्वे भेटतात, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, त्यातील काही लोक, काही ना काही कारणाने टीका करत असतात, परंतु त्या टिकेमुळे विचलित न होता इतर सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. ती शिकवण रामहरीला त्याच्या कॉम्प्युटर शिकवणाऱ्या तराळेसरांकडून मिळाली. कॉम्प्युटरपेक्षा आयुष्यात कोणकोणते धडे शिकायला हवेत हेच तराळेसरांनी जास्त शिकवले. ते अतिशय महत्त्वाचे आहे.

सुदिन दळवेसर व लक्ष्मीकांत कदमसर यांनी नेहमी सकारात्मक पद्धतीने विचार करण्यास शिकवले. त्या दोन्ही सरांनी रामहरीला प्रोत्साहन दिले. उच्च शिक्षणासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात त्या सरांचा वाटा मोठा असल्याचे रामहरीने सांगितले.

आयुष्यात जशी अनेक चांगली माणसे भेटली तशी काही निराश करणारी, मागे खेचण्याचा प्रयत्न करणारीही माणसे आली असे रामहरी म्हणाला. परंतु त्याचा फायदा असा, की आयुष्यात काय करायचे नाही, कोणाचे अनुकरण करायचे नाही हे त्याला शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.

रामहरी म्हणाला, की तोसुद्धा संशोधनक्षेत्रात काम करत आहे. शास्त्रज्ञांनी खूप काम करायला हवे, नीतिमूल्ये पाळायला हवीत. हे सर्व या वयात जाणवत आहे आणि ते धडे शाळेत त्या त्या शिक्षकांकडून मिळाले याची कृतज्ञ जाणीव होते.

रामहरी म्हणतो, आईवडील, कुटुंबातील मंडळी मुलाला चालायला शिकवतात, परंतु शिक्षक कोठल्या मार्गावर चालले पाहिजे ते शिकवतात. दिशा व हेतू या दोन्हींचेही मार्गदर्शन करतात.
रामहरीने सोलापूरच्या ‘लोकमंगल महाविद्यालया’तून बी.एससी. (बायोटेक्नॉलॉजी) ही पदवी घेतली. रामहरीला M.Sc. साठी इंग्लंडमधील ‘शेफिल्ड विद्यापीठा’ची पूर्ण स्कॉलरशिप मिळाली. रामहरीने Molecular Medicine मध्ये M.Sc. केले. तो काळ खूपच शिकवणारा होता असे तो सांगतो. म्हैसगावसारख्या खेडेगावातून, इंग्लंडला संपूर्ण वेगळ्या वातावरणात, वेगळ्या संस्कृतीच्या देशात, सगळे काही भव्यदिव्य असणाऱ्या देशात रुळायला रामहरीला वेळ लागला. सर्वांत पहिली अडचण भाषेची – इंग्रजीची होती. पण रामहरीला चांगली मित्रमंडळी मिळाली.

सध्या रामहरी फ्रान्समधील 'इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स' या संस्थेत (CNRS UPR 1142, 141 rue de la Cardonille, 34396, Montpellier Cedex 5, France) DNA Replication and DNA Damage Response या विषयावर संशोधन करत आहे. त्यासाठी त्याला विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

रामहरी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये काटकसरीने राहतो व शिल्लक पैसे मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या धाकट्या भावाला – नामदेवला – पाठवतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, भारतात परत आल्यावर केवळ म्हैसगावसाठी नाही तर भारतातील एकूणच शैक्षणिक व्यवस्थेत आणि आरोग्य व्यवस्थेत काही बदल घडवून आणण्याचे विचार रामहरीच्या मनात घोळत आहेत. आरोग्य व्यवस्था तळागाळातील लोकांपर्यंत पोचत नाही, त्या संदर्भात त्याला काही करायचे आहे. खेड्यातील मुलांमध्ये प्रतिभा आहे, कौशल्य आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी काहीतरी करण्याचे रामहरीने ठरवले आहे.

-  पद्मा कऱ्हाडे

लेखी अभिप्राय

फारच सुंदर

Mohan Gadkari04/07/2015

माला अभिमान वाटतो की रामहरी माझा भाऊ आहे. भाऊ तु अजुन प्रगति कर. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे. तुला जे योग्य वाटते ते तू कर . पण आपल्या कुंभा रांच नाव गाजल पाहिजे .

सागर कुंभार04/07/2015

खूप खूप अभिनंदन प्रथम तुझ्या वडिलांचे आणि आईचे.
तुझे खूप खूप कौतुक.हजारो र्षापासून ज्यांना शिक्षणाचे दार बंद होते. त्यांच्यासाठी क्रांतिबा फुलेनी ते दार खुले केले त्याचं सार्थक तुझ्यासारखी मुले करीत आहेत.
तुला खूप खूप शुभेच्छा.

एम.डी.चौरे वकी…05/07/2015

Very very nice Ramhari & I Proud of you

Ajit Popat Borkar05/07/2015

अतिशय उत्तम उदाहरण, मराठी पाऊल पड़ती पुढे।

सागर भालेराव05/07/2015

All the Best Ramhari.

Ganesh Waghmare06/07/2015

अतिशय सुंदर.....कारण माझे ही गाव म्हैसगाव आहे.अभिमान वाटतो तुझा....सलाम माझा तुला.....॥

शिवा बोरकर नवी मुंबई06/07/2015

Congrats bhava from all JNV

Jeevan06/07/2015

we know you were really impessive and has been constant inpiration to all of us .best wishesh are always with you .

abhijeet junio…06/07/2015

SIMPLY .........GREAT

siddeshwar Godage06/07/2015

congrats bro.....
wishing you very bright future ahead....!!!

LAXMAN WAGHMODE06/07/2015

Ramhari best of luck

Gopal shinde06/07/2015

REALLY GREAT JOB & BEST LUCK

GANESH KULKARNI06/07/2015

खूप खूप अभिनंदन प्रथम तुझ्या वडिलांचे आणि आईचे. तुझे खूप खूप कौतुक.हजारो र्षापासून ज्यांना शिक्षणाचे दार बंद होते. त्यांच्यासाठी क्रांतिबा फुलेनी ते दार खुले केले त्याचं सार्थक तुझ्यासारखी मुले करीत आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा.

SHARAD JAGTAP06/07/2015

many congratulations dear.....Keep going and hope you win more accolades. (y)

Vikas Burte07/07/2015

Proud of u Ramhari

Avinash Dhayfule 07/07/2015

Best of luck ..Ramhari...hope u will be back some time in Sheffield....

nitin kamble08/07/2015

रामहरी तु कुर्डूवाडी आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी आदर्श तरुण आहेस....
मला तुझा अभिमान वाटतो.

औदुंबर नरुटे10/07/2015

Proud of u RAMHARI.ALL THE BEST

rahul suslade14/07/2015

माझे ही गाव म्हैसगाव आहे.अभिमान वाटतो तुझा....सलाम माझा तुला

shamad mahajan26/07/2015

शिक्षीणाची पंरपरा नसताना शिकण हेच मोठ काम त्यात ऊच्चशिक्षण घेण फारच मोठ्ठ अन त्यातही परदेशी शिकण दिव्य कर्म.तुझ्या पाठीशी तर ईश्वरआहेस बेटा अन तु कर्मान तो मिळवलाय.घे गगनभरारी अन बन आदर्श जे कुरकुरतात पुढे जायला .शाब्बास

अज्ञात26/08/2016

खुप छान वाटले अटकेपार झेंडा रोवला........आभिमान वटतो माझ्या गावचा....

shahaji ghuma…12/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.