वीणा - प्राचीन शास्त्रीय वाद्य


वीणा वाद्यवीणा हे जगातले सर्वात प्राचीन शास्त्रीय वाद्य (तंतुवाद्य) आहे. वीणेचे उल्लेख वेद-उपनिषदात आहेत.

सरस्वती नदीच्या काठी वेद-उपनिषदे-पुराणांची उत्पत्ती झाली. तो काळ सरस्वतीच्या अनुषंगाने व नव्या वैज्ञानिक परीक्षणांनी सात हजार ते नऊ हजार वर्षे पूर्वीचा समजला जातो. सरस्वती ही विद्येची देवता इतक्या प्राचीन काळापासून भारतीयांचे दैवत आहे. सरस्वतीच्या हाती वीणा हे तंतुवाद्य रामायण -महाभारत काळापासून वा त्या अगोदर दिसू लागले. याचा अर्थ तेव्हापासून भारतीयांना तंतू (धातूच्या तारा) व त्यांचा गायनात वापर माहीत असावा. तंतुवाद्ये नक्की कुणी व केव्हा शोधून काढली?

वीणा वाद्य

भारतीय संस्कृतीला माहीत असणारी नारद व भरतमुनी ही नावे आपला इतिहास सात हजार वर्षांइतका मागे नेतात. सरस्वती नदी व सरस्वती देवता यांचा काळ त्याहून एक हजार वर्षें तरी मागे जातो. सर्वात आद्य विद्यापीठ शारदापीठम् (नीला खोरे- नीला पुराण-पाकव्याप्त काश्मीर) सरस्वती आणि सिंधू या नद्यांच्या काश्मीरमधील संगमावर वसले गेले. या विद्यापीठाचे अवशेष त्या संगमावरील शारदी या खेड्यात सापडले आहेत.

भरतमुनी हे भारतीय शास्त्रीय संगीताचे आद्य प्रवर्तक समजले जातात. संगीत हे मंत्र व त्यांचे -हस्व, दीर्घ उच्चार यांनुसार तयार झाले. पक्षांच्या कूजनातून भरतमुनींना मंत्रोच्चाराधारित चाली, ताल व लय यांचा परिचय झाला. त्यांचा तंतुवाद्यात उपयोग करून घेण्याची कल्पना त्यांचीच. पूर्वी झाडांचे तंतू वापरून केलेले वाद्य असे.

शारदा विद्यापीठाचा काळ निश्चित झालेला नाही. भरतमुनी शारदापीठात शास्त्रीय संगीत शिकवत असत (इसवी सनपूर्व २९००) सरस्वती नदीचा नव्याने शोध लागल्यानंतर इस्त्रो व नासा या कालानिश्चितीच्या मागे लागले आहेत. कदाचित तो काळ काही हजार वर्षेही मागे जाऊ शकेल!

हार्मोनियम (मेलोडियम Melodium)भरतमुनींनी सात शुद्ध व पाच कोमल म्हणजे ज्याचे दोन रूपांत -म्हणजे -हस्व व दीर्घ- आवर्तन होते असे एकूण बारा स्वर असल्याचा शोध लावला. त्यांनी बारा स्वरांच्या सुरावटीतून रागनिर्मिती होते असे मांडले. प्रत्येक दोन स्वरांमध्ये जी कंपने निर्माण होतात ती पुढचा स्वर घेईपर्यंत एकूण बावीस होतात; ती कमी करता येतील पण वाढवता येऊ शकत नाहीत. कारण शेवटच्या कंपनाने त्या स्वराचा अंत होतो. डॉ. विद्याधर ओक यांनी भरतमुनींच्या या संशोधनाचा धागा पकडून बावीस श्रुती स्वरात घेता येणारे एक हार्मोनियम (मेलोडियम Melodium) तयार केले आहे. त्यांनी श्रुती-स्वर-रागांचे आविष्कार कसे होतात हे प्रात्यक्षिकांसह समजावून दिले आहे. जगातल्या कुठल्याही देशात वा भाषेत स्वराधारित संगीत जाणून घ्यायचे असेल तर त्याचे स्वर सातच मिळतात, ते भारतीय संगीतातील सप्तस्वरांप्रमाणेच व्यक्त होतात. संगीत ही कला असली तरी ते विज्ञानही आहे आणि विज्ञानाला शिस्त असते.

  वीणेला सुरुवात एकतारीपासून झाली. सरस्वतीच्या हाती असणारी वीणा तीन ते सात तारांची दिसते. वीणेचा विकास दक्षिण भारतात झाला. तंजावर (तंजोर) येथे कर्नाटक पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचा उदय झाला. त्यास प्रतिष्ठा प्राप्त झाली ती तंजावरच्या भोसले घराण्याच्या राजाश्रयामुळे. दुबईच्या म्युझियममध्ये जी संगीत  वाद्ये जपली गेली आहेत त्यात सतार, वीणा, तबला , पखवाज, ढोल, झांजा आहेत. त्या म्युझियमच्या संचालक आयेशा मुबारक यांनी ती मला दाखवली. प्रत्येक वाद्याखाली त्याचा परिचय, त्याचे नाव, ते कुठून आले ही माहिती निर्देशित केली होती. मुबारक म्हणाल्या, ‘अरब जग वाद्यांचा उपयोग आठव्या शतकात करू लागले, त्यांच्या संगीताच्या चालींना भारतीय स्वरशास्त्राचा आधार जाणवतो. तसेच वाद्यांची भारतीय नावेच अरेबिकमध्ये प्रचलित आहेत.’

रूद्रवीणा (रावणवीणायाळ) वीणेची सतार व सरोद ही मध्ययुगीन भावंडे आहेत. ती मोगल काळात पर्शियातून इकडे आली असावीत. प्राचीन भारतीय विद्यापीठांतून (शारदापीठम, तक्षशिला, नालंदा, बनारस, श्रावस्ती) नृत्यसंगीताचे शिक्षण दिले जाई. हे वाद्यसंगीतात रूपांतरित झाले (संदर्भ – पितळखोरा, अंजठा लेणी ). वीणावादनात प्राचीन काळात ज्या शिष्यांनी प्रावीण्य मिळवले, त्यांची नावे १. गौतमबुद्ध, २. पुष्यमित्र शुंग, ३. महेंद्रवर्मन, ४. प्रसेवजीत(काशी), ५. लिच्छवी राजकन्या चेलना, ७. समुद्रगुप्त, ८. हर्षवर्धन (सातवे शतक)

हर्षवर्धन हा प्राचीन भारताच्या संगीत परंपरेला उज्वल करणारा राजा होऊन गेला. त्याचा उल्लेख चिनी प्रवासी ह्युएनसंग व प्रख्यात संस्कृत कवी बाण (हर्षचरित) यांनी केला आहे. ह्युएनसंग त्याच्या राजधानीत पोचला तेव्हा मोठा संगीत महोत्सव सुरू होता. तो दीड महिना चालला. त्यात देशादेशीचे गायक, नर्तक, वाद्यसंगीतकार (वीणावादक) उपस्थित होते असा उल्लेख त्याने केला आहे.

रावण त्याची रूद्रवीणा (रावणवीणायाळ) वाजवण्यात दंग असताना मारुती अशोक वनात सीतेचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत होता अशी पुराणकथा आहे. रावण एक मर्मज्ञ संगीतकार होता. कुणी त्याला रावण ऊर्फ रुद्रवीणेचा जनक समजतात. रावणाच्या कुळातले सर्व विद्याव्यासंगी होते. स्वरूपनखा ही त्याची वेदविद्यापारंगत बहीण होती. रावणाने भारतातील जिंकलेल्या दहा राज्यांच्या व्यवस्थापनाचे कार्य एक प्रशासक म्हणून तिच्यावर सोपवले होते. कच-देवयानी, भीम-हिडिंबा (राक्षस), रावण-मंदोदरी (यक्षकन्या) यांचे विवाह होऊ शकले. त्या काळच्या समाजव्यवस्थेचे दर्शन यातून होते. राक्षस असोत वा यक्ष, दानव, दस्यू, असूर, गंधर्व, देव... कुणीही असले तरी ते विद्याग्रहणाच्या बाबतीत एकाच त-हेचे शिक्षण विद्यापीठांतून घेत असत. ते भारताबाहेरून आलेले असोत (ऑस्ट्रेलिया, लंका) वा इथले असोत त्यांची भाषा, शिक्षणपद्धत एकच होती. वीणा हे वाद्य येथे सर्वत्र शिकले जाई.

- अरुण निगुडकर

arun.nigudkar@gmail.com

Last Updated On - 10th May 2016

लेखी अभिप्राय

thank you

pratik28/09/2013

अतिशय उपयुक्त माहिती.

मोहन घोंगटे10/05/2016

अतिशय वाचनीय माहिती. धन्यवाद.

Dr. Madhura Ba…10/05/2016

खूप छान माहिती मिळाली . धन्यवाद ....

अर्जुन शिरसाट 24/10/2016

अत्यंत उपयुक्त व वाचनीय माहिती. संपूर्ण इतिहास समजला. खूप छान .

प्रशांत गोसावी13/01/2017

Verry nice its

Kartiki04/02/2017

आणखी माहिती पाहिजे

Dhanashri ume…02/03/2017

माहिती खूपछान

अज्ञात02/03/2017

खूप छान माहिती
Thank you

Snehal shinde11/03/2018

खूपच छान व उपयुक्त माहिती.

लाड शर्मिला13/03/2018

अतिशय दुर्मीळ माहिती. खूप छान. धन्यवाद.

सुनंदा जुलमे 03/06/2018

Very good

Vijay Prashant Sole 26/07/2018

Very good information , thanks

ABHIJEET Jallewar05/11/2018

Information is very good thanks

ABHIJEET Jallewar05/11/2018

सर खूप चांगली माहिती आहे .सर मला अखंड विना पहारा मंजे काय?
माहिती मिले का

आंधळे अजिनाथ29/01/2019

sir mala list pahije vadyachi bhetel ka

Samadhan dawange04/03/2019

Excellent

Anushka kate16/03/2019

Thanks in information.

dnyaneshwar.shedge20/03/2019

It is very useful information..nice

vandana mahend…07/07/2019

Thank you

gauri masale25/09/2019

Thank you so much. For Info.

Sayali gaikar03/10/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.