'थिंक महाराष्ट्र' प्रकल्प’


'थिंक महाराष्ट्र' प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. पण त्या सर्व दूरच्या व लांब पल्ल्याच्या गोष्टी म्हणून बाजूला ठेवून सध्या तीन उपक्रम हाती घ्यावे आणि त्या आधारे महाराष्ट्रीय समाजातील आत्मविश्वास जागा होण्यास चालना द्यावी असे ठरवण्यात आले आहे. हे तीन उपक्रम असे-

'थिंक महाराष्ट्र' प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. पण त्या सर्व दूरच्या व लांब पल्ल्याच्या गोष्टी म्हणून बाजूला ठेवून सध्या तीन उपक्रम हाती घ्यावे आणि त्या आधारे महाराष्ट्रीय समाजातील आत्मविश्वास जागा होण्यास चालना द्यावी असे ठरवण्यात आले आहे. हे तीन उपक्रम असे-

 

1. मराठी कर्तृत्वाची नोंद, ती जिल्हा, राज्य, राष्ट्र-आंतरराष्ट्र अशा पातळ्यांवर असेल.

 

2. स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांच्या निरलस कार्याचा आढावा वेळोवेळी सादर केला जाईल.

 

3. मराठी समाज व संस्कृती यांच्यासंबंधात विकिपीडिया धर्तीचे माहिती-संकलन.

 

वेबसाईट हे तुलनेने कमी खर्चाचे माध्यम आहे आणि त्यावर माहिती साठवण्याची क्षमता अपार आहे. म्हणून या प्रकल्पामध्ये वेबसाईट हा मूलाधार मानला आहे आणि या प्रकल्पाचा गाभा निकोप संपादकीय दृष्टीने माहिती संकलित करणे हा आहे.

 

त्याचप्रमाणे छापील माध्यमाची कास, ती सोय उपलब्ध होईल त्याप्रमाणे धरली जाते. उदाहरणार्थ, ‘ग्रंथाली ’च्या ‘रूची ’ मासिकात ‘ग्रंथाली’च्या विश्वस्तांनी चार पाने मजकूर देण्यास मान्यता व्यक्त्त केली. त्या औदार्याचा लाभ आपण घेत आहोत.

 

'थिंक महाराष्ट्र' प्रकल्पाने महाराष्ट्रातील विधायकतेला चालना व प्रसिद्धी मिळेल; तसेच, त्यामध्ये गुंतलेल्या व्यक्ती व संस्थांमध्ये समन्वय घडून येईल अशी खात्री वाटते.

 

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

 

हेतू- समाजातील विधायकतेची शक्ती नेटवर्क करणे आणि योग्य कारणांसाठी तिचा वेळोवेळी प्रेशरग्रूप म्हणून उपयोग करण्याची शक्यता अजमावणे. विधायकता ही व्यक्ती किंवा संस्था या कोणाही मार्फत व्यक्त होत असल्याने या दोन्हींना नेटवर्कचे भागीदार होता येईल.

 

कार्य- वाढत्या 'ग्लोबल' वातावरणात आपले 'लोकल' स्वरूप झपाट्याने नष्ट होत असल्याची भावना जगभर, देशोदेशी आहे. आपणास 'थिंक महाराष्ट्र'मार्फत महाराष्ट्रीय समाजापुरता या भावनेचा आदर करून या प्रदेशाचे व संस्कृतीचे संचित जपण्याचे उपक्रम हाती घेता येऊ शकतील आणि असे काम करणा-या संस्था व व्यक्ती यांचे कार्य समाजासमोर सातत्याने मांडता येईल.

 

प्रकल्पाचे काम तीन आघाड्यांवर होईल:

 

1. महाराष्ट्राचे संचित अधोरेखित करणे.

 

2. मराठी माणसाची गुणवत्ता व चांगुलपणा यांचे नेटवर्किंग करणे, म्हणजेच विधायकता जोपासणे.

 

3. समाजात वेळोवेळी जे सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न उद्भवतील त्या संबंधात योग्य जनमत घडवण्यासाठी प्रेशरग्रूप म्हणून काम करणे.

 

प्रकल्पाचे लाभधारक- महाराष्ट्राशी आपुलकीचे व सततचा बंध असलेले नाते जपणारी कोणतीही व्यक्ती या प्रकल्पाची भागीदार होऊ शकेल व म्हणून ह्या नेटवर्कशी जोडून घेतली जाईल. मराठी कोणास म्हणावे? - हा बिकट असा प्रश्न आहे. त्यासाठी उत्तरही देता येत नाही. हा प्रश्न दोन पातळ्यांवर सोडवावा लागेल. एक-ताबडतोबीचे उत्तर. दोन-सखोल अध्ययनानंतरचे उत्तर.

 

1. ताबडतोबीच्या उत्तरासाठी महाराष्ट्रात राहतात व मराठीची आस्था बाळगतात ती आणि जगभर असलेली व मराठी बोलतात ती मराठी माणसे होत असे धरून चालायला हरकत नाही.

 

2. सखोल अध्ययनासाठी 'एक्झिट पोल' धर्तीची पाहणी महाराष्ट्रभर विद्यापीठातील मराठीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांमार्फत करता येईल. ही पाहणी सहा ते आठ महिन्यांच्या अवधीत उरकणे गरजेचे आहे. त्यासाठी ब-यापैकी खर्च येऊ शकेल व तो परवडेल तेव्हा पाहणी हाती घ्यावी, परंतु त्यातून सुनील गावसकर यांच्या मुलाला (रोहन) किंवा यश चोप्रा यांना मराठी म्हणायचे की नाही अशासारखे जे प्रश्न पडतात त्याचे कायमस्वरूपी उत्तर मिळून जाईल.

 

प्रकल्पाची भाषा- मराठी, मराठी-कम-इंग्रजी, अपवादात्मक परिस्थितीत निव्वळ इंग्रजी.

   

प्रकल्पाची व्याप्ती- महाराष्ट्रास मायभूमी वा कर्मभूमी मानणारा जगभरचा समुदाय

 

उपक्रम 1.मराठी कर्तृत्वाची नोंद - समाजातील सर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांची उपेक्षा होते आणि लता मंगशेकर, शरद पवार, माधुरी दीक्षित-नेने अशांची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून वारंवार घेतली जातात. अशा सेलिब्रिटींबरोबर जिल्हा, राज्य, राष्ट्र-आंतरराष्ट्र या पातळ्यांवरील सर्वसामान्यांतील आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाची नोंद करणे.

 

मराठी माणसात जसा संकोच आहे तसा न्यूनगंडही आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचे विद्यमान कर्तृत्व आपल्याला माहीत नसते. उलट, महाराष्ट्रात इतिहासात रमण्याची (शिवाजी, पेशवे यांची थोरवी गात बसण्याची) वाईट खोड आहे. त्यातूनही न्यूनगंड जोपासला गेला आहे. दुसरे असे, की समाजातील गुणवत्ता (शिक्षण, क्रीडा, व्यवसाय-वृत्ती वगैरे क्षेत्रांतील) जोपासण्याची आखीव अशी व्यवस्था महाराष्ट्रात नाही. त्यामुळे येथे कर्तृत्व बहरले ते योगायोगाने, त्या त्या व्यक्तीच्या सक्षमतेने. त्याचीदेखील यथायोग्य सामाजिक नोंद होत नाही. कधी कधी ते प्रकाशात येते; तथापि, तो झोत दूर झाला, की पुन्हा कर्तृत्व सामाजिक अज्ञानांधकारात लुप्त होते.

 

यावर मात म्हणून कर्तृत्वाची कायमस्वरूपाची आणि सतत अद्ययावत होत असलेली नोंद करणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

 

कर्तृत्वाच्या अशा नोंदीमुळे समाजाला आधार तर लाभेलच, परंतु तरुण वर्गाला ते प्रेरणास्थान होईल. कर्तृत्वाची नोंद फक्त जिवंत व शक्यतर वयाच्या सत्तरीआधीच्या व्यक्तींची चार पातळ्यांवर करायची आहे. हे कर्तृत्व वेगवेगळ्या किंबहुना सर्व क्षेत्रांतील गृहीत धरले आहे.

 

1. जिल्हापातळी - जिल्ह्यात गाजलेले, राज्यात माहीत असलेले लोक.

 

2. राज्यपातळी - राज्यपातळीवर प्रभाव टाकू शकणा-या आणि देशभर माहीत असलेल्या व्यक्ती.

 

3. राष्ट्र आणि आंतरराष्ट्र पातळी -पद्म पुरस्काराने सन्मानित व राष्ट्रपातळीवर परिचित व्यक्ती.

 

याखेरीज आणखी दोन वेगळ्या प्रकारांत कर्तृत्व नोदवायचे आहे; पहिला प्रकार म्हणजे अभिनव उपक्रमशीलता आणि त्यातून मिळालेले यश अशा व्यक्ती व दुसरा प्रकार तारांकित व्यक्तींचा.

 

2.स्वयंसेवी संस्थांचा ताळेबंद - महाराष्ट्राची ताकद कार्यकर्त्यांत आहे असे गांधीजी म्हणत. कर्नाटकाला सात ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले तर महाराष्ट्राला सात मॅगसेसे अँवार्ड मिळणे स्वाभाविकच ठरले. महाराष्ट्रभर स्वयंसेवी संस्थांचे जाळे आहे. त्यांचे काम, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे अर्थकारण ह्यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडू शकलो व त्या क्षेत्रातील घडामोडी नित्य कळवू शकलो तर ते महत्त्वाचे काम होईल. संस्थांनाही अधिक बळ लाभेल.

 

महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणतात. त्यामुळे येथे स्वयंसेवी पद्धतीने व्यक्तिगत व संस्थात्मक रीत्या बरेच मोठे सामाजिक कार्य होत असते. मात्र त्याचा समाजावर हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. उलट, कार्यकर्त्यांची उपेक्षा होते आणि त्याला आर्थिक मदतीसाठी व सहभागासाठी दारोदार याचना करावी लागते.

 

'ताळेबंद' मध्ये संस्था व व्यक्ती यांच्या कार्याची वस्तुनिष्ठ, विश्वासपात्र मांडणी असेल. त्यामधून संस्था व एकूण समाज यांचे नाते निर्माण होईल, ती या उपक्रमाची जमेची बाजू असेल.

 

3. माहिती कोष - मराठी समाज आणि संस्कृती या संबंधातील माहितीचे तालुकानिहाय संकलन

 

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ही वेबसाइट 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन' ह्या कंपनीमार्फत चालवली जाते. कंपनीची स्थापना ना नफा तत्त्वावर कलम 25 अनुसार करण्यात आली आहे.

 

कंपनीचे संचालक सध्या दोघेच आहेत 1. दिनकर गांगल व 2. माधव शिरवळकर. परंतु कंपनीच्या स्थापनेमध्ये अतुल तुळशीबावाले व भूषण केळकर ह्यांचा तेवढाच सहभाग आहे आणि प्रकल्पाच्या कामात ते आपला वाटा संचालकाच्या मानाने, अधिकाराने व जबाबदारीने उचलत असतात.

 

'थिंक महाराष्ट्र’ला सदिच्छा तर अनेकांच्या लाभत आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका ह्यांनी प्रकल्पास पहिली तीन वर्षे, दरवर्षी दहा लाख रुपयांपर्यंत रक्कम देण्याचे व तेवढ्या प्रकल्पाचे पालकत्व स्वीकारण्याचे ठरवले आहे. काही व्यक्तींनी व्यक्तिश: देणग्या दिल्या आहेत. माधव शिरवळकर ह्यांनी प्रकल्पाची तांत्रिक बाजू पहिले सहा महिने विनामूल्य सांभाळली. कंपनीचे ऑफिस वर्षभर त्यांच्याच कार्यालयात होते. त्याचे मूल्य सुमारे चार लाख रुपये होते. दादरचे प्रवीण शिंदे यांनी मोठ्या सौजन्याने त्यांच्या कार्यालयात व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनला जागा देऊ केली आहे. तेथे संस्थेचे पूर्णवेळ कर्मचारी काम करत असतात. मेगॅसस इन्स्टिट्यूटचे मंगेश कीर्तने ह्यांनी 'थिंक महाराष्ट्र'मधील कार्यकर्त्यांसाटी 'व्हिजन वर्कशॉप' विनामूल्य घेतले. तो सर्व कार्यकर्त्यांना मोठाच धडा वाटला. ह्या शिबिरास चार 'संचालक', किशोर कुलकर्णी खेरीज विदुर महाजन, विश्वनाथ खांदारे, पदमा कर्‍हाडे, प्रमोद शेंडे, अनुराधा गांगल, सीमा दांडेकर, मंदार दातार, आदिनाथ हरवंदे अशी मंडळी हजर होती. ज्योती शेट्ये, राम कासार, विजय नाडकर्णी यांचा वेबसाइटच्या कामात मोठा सहभाग असतो.

 

ह्या वेबसाईटला गावोगावी आपल्या परिसरातील माहिती देऊ शकतील असे कार्यकर्ते (संस्कृतिसमन्‍वयक) हवे आहेत.

लेखी अभिप्राय

malahi aaplya sati lihave ase vatte.

sharad shahare29/06/2013

किरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.

लेखकाचा दूरध्वनी

9029557767

शरद शहारे,
तुम्‍हाला 'थिंक महाराष्‍ट्र'साठी नक्‍की लिहिता येऊ शकेल. तुम्‍ही आम्‍हाला thinkm2010@gmail.com या मेल आयडीवर किंवा 9029557767/ 022-24183710 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
उपसंपादक
थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम

किरण क्षीरसागर15/07/2013

May I want to join & write us in your site.

sharad shahare12/01/2014

किरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.

लेखकाचा दूरध्वनी

9029557767

जरुर! आम्‍हाला तुमचा संपर्क पुरवावा किंवा तुम्‍ही मला संपर्क करावा.
किरण क्षीरसागर
९०२९५५७७६७

किरण क्षीरसागर14/01/2014

aatyant udabodhak upakram. lakh lakh shubhechhya.

krupashankar s…06/02/2014

नमस्कार. प्रकल्प संकल्पना उत्तम आहे. संस्कृती सामन्वायाकांकडून नेमकी काय अपेक्षा आहे?

प्रीति दामले27/03/2014

किरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. ते त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.

लेखकाचा दूरध्वनी

9029557767

प्रीति दामले,
संस्‍कृति समन्‍वयकांनी त्‍यांच्‍या परिसरातील कर्तृत्ववान व्‍यक्‍ती, स्‍वयंसेवी संस्‍था आणि व्‍यक्‍ती, विविध छंद जोपासणा-या व्‍यक्‍ती, तेथील यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, बाजार, किल्‍ले, ग्रामदेवता, लोककला, प्राणीजीवन, पक्षीजीवन, वन्‍यजीवन आणि संस्‍कृतिची इतर वैशिष्‍ट्ये, अशी विविध प्रकारची माहिती 'थिंक महाराष्‍ट्र'ला देणे अपेक्षीत आहे. त्‍यातून महाराष्‍ट्राचे समग्र आणि सच्‍चे चित्र साकारता येईल. समन्‍वयकाने स्‍वतः लेख लिहावेत किंवा इतरांकडून लिहून घ्‍यावेत. त्‍यास फोटोंची (शक्‍य असल्‍यास व्हिडीओचीही) जोड आवश्‍यक आहे.
कळावे.
किरण क्षीरसागर
सहाय्यक संपादक
9029557767

किरण क्षीरसागर01/04/2014

संस्कृतिसमन्‍वयक
Tal sangola Dist Soalpur

Prashant Lokhande 25/11/2014

sir..please send some articles for my Magasine "Shivamarg" in Marathi...i will like to help your's "Think Maharashtra"project. in print media every month...
My email is -dattasurve27@gmail.com,dattasurve@yahoo.co.in
Mob-9765626828,9372111575

dattatray Nara…08/12/2014

खूप छानचं उपक्रम आहे
सोलापुरातील माहिती संकालांसाठी मी काम करू इच्छितो
मी आकाशवाणीत नैमित्तिक निवेदक आहे

Santosh Pawar 10/12/2014

Mi barshi tuche karykram attend kale. Mala volunteer banayche aahe thinkmaharashtra.com che. My contact no 9881419139

sagar Kulkarni 17/01/2015

Kamache swarup uttam ahe . Mi kay karu shakato te kalvave

Maza email : omnianand@yahoo.com

Nndkumar Deshpande25/02/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.