Member for
8 years 6 monthsपद्मा क-हाडे यांचे इराणमधील वास्तव्यात आलेल्या अनुभवांचे लिखाण 'इराण' या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले आणि त्या लेखिका म्हणून प्रकाशात आल्या. त्या मूळच्या पुण्याच्या. त्यांनी लग्नाआधी पुण्यात अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये तर लग्नानंतर मुंबईत परांजपे विद्यालय, अंधेरी येथे शिक्षिका म्हणून काम केले. त्यांचा विषय होता विज्ञान. त्या, त्यांचे पती पुरूषोत्तम क-हाडे यांच्या नोकरीच्या निमित्ताने इराण आणि सौदी अरेबिया इथे वास्तव्यास होत्या. त्यांनी देशविदेशातील भ्रमंतीमध्ये आलेले अनुभव पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत. आतापर्यंत त्यांची इराण, सौदीच्या अंतरंगात, हॉंगकॉंग सफारी, स्वान्तसुखाय आणि भटकंतीची साद अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9223262029