Member for

3 years

शिरीष गंधे हे 'लासलगाव महाविद्यालया'मध्ये बत्तीस वर्षे मराठी विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचे वडील श्रीकृष्ण गंधे हे बालसाहित्यिक होते. शिरीष गंधे यांनी पंचवीस वर्षे शाहीर अनंत फंदी यांचा अभ्यास करून लेखन केले आहे. त्यांची 'महाराष्ट्राचे शिल्पकार शाहीर राम जोशी', संत नामदेव महाराजांवर आधारीत 'ऐसा भक्तराज निका', संत ज्ञानेश्वर महाराजांवर आधारीत 'ज्ञानदेवांचे सप्तरंग', शाहीर अनंत फंदी यांच्यावर आधारीत 'बिकट वाट वहिवाट नसावी', 'स्वाध्यायाची सत्वधारा', 'फुलांची शाळा', कै. श्रीकृष्ण गंधे यांचे बालसाहित्य 'एक समालोचन’, ‘वाती संजफुलांच्या’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे 
तबला वादन आणि चित्रकला हे छंद आहेत.  
 

लेखकाचा दूरध्वनी

9766202141