Member for
4 years9923136584
नीलिमा बापट या पुण्याच्या. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाच्या पदवीधर आहेत. त्यांनी मानसिक रुग्णांकरताच्या शिक्षकांचा अभ्यासक्रम 'कामायनी'मधून पूर्ण केला. त्या 'सा' या संस्थेच्या संपर्कात १९९९ साली आल्या. त्यांनी संस्थेसोबत कार्यकर्ता म्हणून सुरू झालेल्या प्रवास सहसचिव, खजिनदार, उपाध्यक्ष अशा विविध जबाबदा-या पार पाडल्या. सध्या त्या संस्थेच्या सचिव म्हणून काम पाहात. त्यांनी 'बायपोलार' या मानसिक रुग्णांच्या अवस्थेबाबत 'आता उजाडेल' हे पुस्तक २००९ साली लिहिले. त्यांच्या कामाबद्दल त्यांना 'माऊली प्रतिष्ठान' आणि 'रोटरी पुणे वेस्ट' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.