Member for

10 years 2 months

प्रमोद मुनघाटे हे नागपूरच्या 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठा'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते कादंबरी, आदिवासी साहित्य, लोककला व लोकनाट्य या क्षेत्रांचे संशोधक आहेत. त्यांनी पूर्वविदर्भातील लोकरंगभूमी व खडीगंमत या विषयांवर संशोधन प्रकल्प राबवले आहेत. मुनघाटे यांनी ‘१८५७: सत्य आणि कल्पित’, ‘लंकेची पार्वती’, ‘आदिवासी साहित्य: स्वरूप व समस्या’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मययनिर्मिती पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी अमेरिकेतील पहिल्या 'विश्व मराठी साहित्य संमेलना'त विदर्भाचे प्रतिनिधित्व केले होते.

लेखकाचा दूरध्वनी

7709012078