Member for
5 years 7 monthsवैजिनाथ जगन्नाथ घोंगडे हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी. ते गेल्या वीस वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असून ' माणदेश वैभव' या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. ते गेल्या बारा वर्षांपासून नदीकाठी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचं काम करतात. त्यांनी 2010 साली माणगंगा नदीपात्रातून १६५ किलोमीटरचे अंतर पायी कापून नदीपरिक्रमा व अभ्यासदौरा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी नदीची दुरवस्था व विकासाचे उपाय यावर अहवाल तयार करुन सादर केला. त्यांचे माणगंगेच्या व्यथा आणि उपाय यांवरील लेखन असलेले 'परिक्रमा माणगंगेची' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. घोंगडे यांनी २०१२-१३ आणि २०१३-१४ या काळात त्यांचे राहते गाव, वाढेगाव येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी काम करत काही समाजपयोगी उपक्रम राबवले. त्यांनी त्यातून गावाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त करुन दिला. जलतज्ञ मा. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत माणगंगेच्या उगमस्थळापासून वैजिनाथ घोंगडे यांच्या हस्ते माणगंगेच्या पुनर्जीवनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल आहे. त्यांनी 2010 साली सोलापूर जिल्ह्यात लोकसहभागातून माणगंगा स्वच्छता अभियान राबवले. त्यांनी २०१५ मध्ये माणगंगेची दुसरी परिक्रमा केली. त्यामध्ये माण नदीला मिळणारे ओढे, त्यांची लांबी, त्यावर बांधलेले सिमेंट ना. बं. व अपेक्षीत सिमेंट ना. बं. याबाबतची माहिती संकलीत केली असून त्याचा अहवाल सातारा, सांगली व सोलापूर जिल्हाधिकार्यांना देण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांनी नदीकाठच्या निवडक ठिकाणी वृक्षारोपण, पर्यावरण, नदीस्वच्छता याबाबत जनजागृतीचे काम सुरु आहे.
9420093599