Member for

5 years 11 months

प्रा. स्मिता पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. बी. एड.ची पदवी मिळवली आहे. त्‍या पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्राध्‍यापक पदावर कार्यरत आहेत. त्‍यांचा 'पाझर' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला असून त्‍यांनी पुस्‍तकपरिक्षणासोबत अनेक नियतकालिकांमधून ललित व इतर लेखन केले आहे. त्‍यांचा आकाशवाणीच्‍या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेल्‍या  'मराठीच्‍या बोलू कौत कौतुके' या शृंखलेमध्‍ये वाडवळ बोली संदर्भात सहभाग होता. त्‍यांनी लिहिलेला 'ललित साहित्‍य - प्रदेश आणि माणसं' हा लेख महेश केळुस्‍कर संपादीत 'मधु मंगेश कर्णिक - दृष्‍टी आणि सृष्‍टी' या पुस्‍तकात समाविष्‍ट करण्‍यात आला आहे. पाटील यांनी 'भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण - महाराष्‍ट्र' (संपादक डॉ. गणेश देवी) या आंतरराष्‍ट्रीय प्रकल्‍पात 'वाडवळी' आणि वारली बोलींचे माहिती देणारे लेखन केले आहे. त्‍यांनी अनेक कार्यक्रमांच्‍या सूत्रसंचालनासोबत मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे आदी मान्‍यवरांच्‍या मुलाखती घेतल्‍या आहेत. तसेच अस्मिता वाहिनीवरील 'जीवनशैली' या कार्यक्रमात लता भालेराव यांनी त्‍यांची मुलाखत घेतली आहे.

लेखकाचा दूरध्वनी

8007848384