Member for

6 years 1 month

यशवंत त्र्यंबक पाठक हे मराठीचे प्राध्‍यापक. ते पुणे विद्यापीठाच्‍या संत ज्ञानदेव अध्‍यासनात प्रमुख प्राध्‍यापक म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्‍य' या विषयावर पुणे विद्यापीठातून 1978 साली पीएच. डी. प्राप्‍त केली. ते पीएच्. डीचे मार्गदर्शक म्‍हणून काम करतात. त्‍यांची ब्रम्‍हगिरीची सावली, नक्षत्रांची नाती, मैत्रीचा मोहोर, तुकारामांचे निवडक अभंग, समर्थांची स्‍पंदने अशी एकूण पंचवीस पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यांनी अनेक पुस्‍तकांचे संपादन केले असून विविध गौरवग्रंथांमध्‍ये त्‍यांचे संशोधन लेखन प्रसिद्ध झाले आहे. पाठक यांना विविध पुरस्‍कांरानी सन्‍मानित करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या चार पुस्‍तकांना महाराष्‍ट्र शासनाचे सर्वोत्‍कृष्‍ट वाड्ःमय पुरस्‍कार मिळाले आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

02591223250