Member for
6 years 10 monthsराजा पटवर्धन यांचा जन्म जैतापूरच्या प्रकल्प परिसरातील जानशी गावातला. ते जैतापूरच्या हायस्कूलमध्ये नववीपर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईस आले. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी रासायनिक उद्योगात नोकरी केली. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दैनिकांमध्ये लेखन करण्यासोबत त्यांनी कोकण विकास, देशापुढील आर्थिक प्रश्न आणि विशेष करून ऊर्जा समस्या यांबद्दल लिखाण व व्याख्याने दिली. त्यांनी 'एन्रॉन' प्रकल्पाच्यावेळी मुंडे कमिटीसमोर प्रकल्पाच्या बाजूने साक्ष दिली. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात स्थानिकांचा प्रचंड विरोध असताना 'विकसनशील पुर्नवसन' ही भूमिका घेऊन देश हिताच्या दृष्टीने प्रकल्पाचे समर्थन केले. त्यांनी त्यासंदर्भात अनेक लेख लिहिले व महाराष्ट्रभर व्याख्याने दिली. त्या काळात त्यांनी अनेक टिव्ही चॅनेल्सवरून त्या विषयातील तज्ञ म्हणून सहभाग घेतला. त्यांच्या 'जैतापूरचे अनुमंथन' (ग्रंथाली प्रकाशन) या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा ज्योतिराव फुले पुरस्कार (2014) प्राप्त झाला. तसेच त्यांना I.N.S (इंडियन न्यूक्लियर सोसायटी) या संस्थेकडून 'अद्वितिय कार्य विज्ञान सुसंवाद' हा पुरस्कार देण्यात आला. तयांना आजही सह्याद्री वाहिनीवर रात्री साडेनऊ वाजताच्या बातम्यात पाहुणे विश्लेषक म्हणून पाचारण केले जाते.
9820071975