गायिका-नटी अमीरबाई कर्नाटकी


अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्‍यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात घेतला होता. त्याचा हा अनुवाद.)

बालगंधर्वांचे पत्र


माझ्या मुंजीत मला आशीर्वाद देण्यासाठी बालगंधर्व आले होते. माझी मुंज भरवस्तीतल्या ब्राह्मणसभेत होती. मी आठ वर्षांचा असल्याने मला काही कळत नव्हते. बालगंधर्व आले आहेत असे कळल्यावर त्यांना पाहणा-यांची अतिशय गर्दी जमली होती. ते माझ्या मुंजीला येण्याचे कारण म्हणजे माझे वडील विष्णुपंत मराठे हे गंधर्वांचे परमभक्त. ते स्वतःही गात असत. गंधर्व मंडळीचा बडोद्यात मुक्काम असला की विष्णुपंत प्रत्येक खेळाला हजर असत. त्यातून त्यांची ओळख झाली होती.

गोहराबाई-बालगंधर्व संबंधावर


बालगंधर्व व गोहराबाई यांच्या संबंधावर रवींद्र पिंगे यांनी १९७१ साली सविस्तर माहिती मिळवून लिहिले, ते मूळ कन्नड लेखक - रहमत तरीकेरी (मराठी अनुवाद – प्रशांत कुलकर्णी) यांच्या कथनाला छेद देणारे आहे.

गोहराबाई-बालगंधर्व संबंधावर वेगळा प्रकाश..

प्रशांत कुलकर्णी यांनी सादर केलेला गोहराबाई यांच्यासंबधीच्या मूळ कन्नड लेखाचा मराठी अनुवाद वाचकांना बराच रूचला. तथापि त्यांनी काही गोष्टी निदर्शनास आणल्या आहेत. त्यांतील प्रमुख संदर्भ ‘माणूस’ च्या १९७१ सालच्या दिवाळी अंकातील रविंद्र पिंगे यांच्या लेखनाचा आहे. पिंगे यांनी त्यावर्षी बरेच संशोधन करून बालगंधर्व यांच्यावर ‘चंद्रोदय व चंद्रास्त’ अशी दोन भागांतील प्रदीर्घ पुरवणी सादर केली आहे. त्यातील ‘चंद्रास्त’ या सुमारे सोळा ते अठरा पानी भागात गोहराबाईचे प्रकरण येते. त्यात पिंगे यांनी या बाईचे वर्णन केले आहे ते असे: गोहराबाईचा जन्म १९०८ सालचा असावा. ती रंगानं सावळी, रूपानं सामान्य, आवाजानं असामान्य-उत्तम-म्हणजे काळी दोनच्या पट्टीत गाणारी, वृत्तीनं भयानक महत्त्वाकांक्षी आणि देहयष्टीनं पुरुषांना भुरळ घालणारी अशी जिभेवर साखर घोळवणारी होती.
 

पिंगे नमूद करतात, की गोहराबाई नानासाहेब चाफेकरांच्या सहकार्याने मुंबईत आली, चाफेकर-चोणकर यांच्या पाठिंब्याने मुंबईत स्थिरावली. ती बालगंधर्वांप्रमाणे गायची, परंतु आरंभी बालगंधर्वांना ती आवडायची नाही आणि त्या दोघांचं एक भांडण कोर्टातही गेले होते.

गोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच!


बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू आहे. या निमित्ताने कन्नडमध्ये रहमत तरीकेरी या संगीत अभ्यासकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. प्रशांत कुलकर्णी यांनी सादर केलेला त्याचा अनुवाद

सोबत, मराठी गोहराबाई यांच्याबद्दलचा द्वेष काय प्रकारचा होता हे दर्शवणारी बाळ सामंत-शंकर पापळकर संवादाची झलक (पुनर्मद्रित)...

गोहरा-बालगंधर्व यांच्या संबंधांचे स्वरूप कसे असेल हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या दोघांच्या फोटोमध्ये कोट घातलेल्या आणि डोक्याला फेटा गुंडाळलेल्या पुरुषी वेशामध्ये गोहराबाई आहेत आणि बाजूला बालगंधर्व स्त्रीवेशामध्ये आहेत. गोहरा-बालगंधर्व संबंध दैहिक, प्रेमिक की कलात्मक होते हे सांगणे कठीण आहे. ते आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेले आध्यात्मिक असावेत.

अपूर्व नाट्य अभिनेत्री, गायिका गोहराबाई कर्नाटकी यांच्या निधनानंतरसुद्धा, त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार गौरव प्राप्त झाला नाही. गोहराबाई (१९१०-१९६७) ह्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे; तर कोणास त्यांची आठवणही राहिलेली दिसत नाही.

बेळगीच्या भगिनी