सत्यनारायणाची पूजा बंद!


_Satyanarayanachi_Puja_1.jpgसत्यनारायणाच्या पूजा श्रावण महिन्यात सगळीकडे आयोजल्या जातात. तशीच ती पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात झाली. त्यास विरोध झाला. त्यामुळे पूजा चर्चेत आली. कोणी घरगुती पूजा करत असतील तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही. मी तर प्रसाद घ्यायलासुद्धा सभ्यता म्हणून घरी जातो. पण विशेषत: सरकारी कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी पूजा सर्रास होत असतात, त्यांना माझा विरोध आहे आणि मी तो व्यक्त करतो. मी ‘महाराष्ट्र राज्य वीज मंडळा’त काम करतो. मी माझ्या तीन कार्यालयांतील पूजा बंद केल्या, त्या वेगळ्या प्रकारे, थोड्या युक्तीने.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील सत्यनारायण पूजा मीडियात गाजली. काही विद्यार्थ्यांनी तिला विरोध केला. प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे गेल्या काही वर्षांची परंपरा असल्याचे सांगून फेटाळले. ही परंपरा नव्हे, रुढी आहे आणि काही परंपरादेखील चुकीच्या असतील तर त्या बंद करणे गरजेचे असते. समाजसुधारकांनी गेली दीडशे वर्षांत जे केले तेही पाण्यात गेले काय? सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या कुप्रथा पुन्हा सुरू करण्यात कोणाचे हित आहे?