म्हैसगावचे मल्लिकार्जुन मंदिर
सोलापूरच्या माढा तालुक्यातील म्हैसगावात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. ते अंदाजे दोन हजार वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी दोन-तीन पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे पूर्ण अंधार आहे - टॉर्च घेतल्याशिवाय जाता येत नाही, गाभाऱ्यात भलेमोठे दगडी शिवलिंग आहे.
मंदिराची देखभाल, पूजा ‘वास्ते’ या परिवारातील लोक करतात. मंदिराशेजारी असलेल्या एका घरात वास्ते परिवारातील लोक राहतात. त्यास मठ असे म्हणतात, सध्या तेथे सुशिला मच्छिंद्र वास्ते या एकट्याच राहतात (सिनियर सिटिझन). त्यांची ही तेविसावी पिढी आहे.
हा मल्लिकार्जुन मठ आहे. तेथेही मल्लिकार्जुन यांचा पितळी मुखवटा, एका गाभाऱ्याप्रमाणेच जागेत ठेवलेला आहे. गाभाऱ्याबाहेर/ खोलीबाहेर कुंड आहे. त्या कुंडात दर पौर्णिमेला होम करतात.