ज्ञानेश्वर भोसले - पारधी समाजातील मुलांसाठी कार्यरत


ज्ञानेश्वर भोसले या पंढपरपूरच्या तरुणाने केवळ स्वतःचे नव्हे तर अवघ्या पारधी समाजाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा वसा घेतला आहे. ज्ञानेश्वरचा जन्म पंढरपूरमधील ताडगावजवळच्या जंगलातील. ज्ञानेश्वरने पुढे पोटा-पाण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावात मजलदरमजल करत मोहोळमध्ये बस्तान बसवले. त्याचे शिक्षण जेमतेम दहावी. तेसुद्धा केवळ शिकायचे या जिद्दीने त्याने दहावी गाठली. आईने त्याला आणि त्याच्या सावत्र बहिणींना वाढवले. ती तिच्या मुलांचा गुन्हेगारीशी संबंधही येऊ नये म्हणून पोलिसांची खबरी असल्याचे भासवत राहिली.

ज्ञानेश्वर म्हणतो, माझ्या आईने तीन नवरे केले. म्हणजे मला तीन बाप. पहिल्या बापाला पोलिसांनी पकडले. त्याला सात वर्षांची सजा झाली. माझ्या आईने दुसरे लग्न केले. त्या बापाने आईला सोडल्यानंतर मी सात वर्षांचा असताना आईने परत तिसरे लग्न केले. तो बाप मराठा होता. त्याला पाच मुली होत्या. आईने तीन नवरे केले तरी तिने तिच्या मुलांना वाऱ्यावर सोडले नाही. तिने मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठीच लग्ने केली.