‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो’’ - बाळ कुडतरकर
21/01/2014
‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातील इतर आकर्षणे समोर आल्यानंतरही मी रेडियोची साथ सोडली नाही.’’ या शब्दांत आकाशवाणीवरील आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे बाळ कुडतरकर यांनी त्यांच्या जीवनप्रवासाचे सुत्र स्पष्ट केले. ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’, ‘सानेकेअर ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथाली’ यांच्या विद्यमाने आयोजित ‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’त दादर - माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात १८ डिसेंबर २०१३ रोजी बाळ कुडतरकर यांची मुलाखत झाली. ज्योत्स्ना आपटे यांनी घेतलेली त्यांची मुलाखत म्हणजे आकाशवाणीच्या सुवर्णकाळाचा मागोवाच ठरली.