'मिया पोएट्री'चे आसामात वादळ!
I am Miya ; My serial number in NRC
is 200543
I have two children
another is coming next summer
will you hate him?
as you hate me!
ही आहे सध्या ‘मिया पोएट्री’मध्ये गणली जाणारी आणि गाजणारी ‘मिया पोएम’ म्हणजे मिया कविता! आसाममधील बांगलाभाषी मुसलमानांची व्यथा व्यक्त करणारी ही एक कविता. महाराष्ट्रामध्येही दलितांची व्यथा व्यक्त करणारा ‘विद्रोही कविता’ हा काव्यप्रकार जन्माला आलात्याशी ‘मिया पोएट्री’ची तुलना करण्याकडे काही लोकांचा कल आहे - तोच कवितेचा ‘विद्रोही’ मार्ग आसाममधील बांगलादेशी मुस्लिमांनी ‘मिया पोएट्री’ या नावाने रूढ केला आहे. मात्र त्या कवितांतील आशय आणि त्यांचा उद्देश पाहता, त्यांची तुलना मराठी विद्रोही कवितेशी करणे चुकीचे ठरेल. खरेतर, विद्रोहीपण ही दलित तरुणांमधील ऊर्जा होती, तिला संवेदनेचा, निर्मितीचा बाज होता. विद्रोही कवितांमुळे दलितांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. परिणामी दलित चळवळ काही प्रमाणात पुढे गेली. उलट, ‘मिया पोएम’ दोन समाजात संघर्षाची ठिणगी पाडण्यास कारणीभूत ठरतील काय अशी भीती वाटते.