मला स्वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगभूमीवर यावं असंच वाटत राहिलं – अरूण काकडे
‘‘मला, मी स्वतः कलाकार असलो तरी स्वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगमंचावर यावं असंच वाटत राहिलं. आजही वाटतं. इथून पुढंही तेच करण्याची इच्छा आहे.’’ ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण काकडे यांनी दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये रंगलेल्या ‘कृतार्थ मुलाखतमाले’त अशी भावना व्यक्त केली. नाटकाचा प्रवास चालू राहिला पाहिजे अशा आशयाच्या त्यांच्या बोलण्यातून ते आणि त्यांची नाटके यांच्यातील एकात्मता प्रत्ययास येत राहिली. कार्यक्रमात विश्वास काकडे लिखित ‘ग्रंथाली’ प्रकाशनाच्या ‘मनाचे कवडसे’ या पुस्तकाचे अरुण काकडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.