गझलमधील दार्शनिकता महत्त्वाची!

Think Maharashtra 10/07/2019

-gazal-introकवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन ठिकठिकाणी कविसंमेलने गाजवली जात आहेत. सोशल मीडियामुळे तर कवितेला पूरच आला आहे. परंतु ढोबळ अंदाजाने मराठीत तीनेकशेपर्यंत कवी कविता या ‘साहित्य’प्रकाराकडे गांभीर्याने पाहत आहेत; तसे त्याचे अनुसरण करत आहेत. कवी (आणि साहित्यिकदेखील) म्हणून व्यक्तीला नावलौकिक मिळवणे सद्यकालात दुरापास्त झाले आहे. मात्र, अनेक कवींच्या एकापासून दहापर्यंत उत्तम कविता असू शकतात. त्याच्या/तिच्या सर्व कवितांना सतत दाद मिळत राहील अशी शक्यता नसते. त्यामुळे कविता मंचावरून सादर करणे आणि तेथल्या तेथे वाहवा मिळवणे हे श्रेयस्कर मानले जाते. त्याचा एकूण काव्यनिर्मितीच्या स्वरूपावर परिणाम होत असतोच. 

अभिवाचन – नवे माध्यम!


अभिवाचन - एक स्‍वतंत्र माध्‍यममहाराष्‍ट्रात ठिकठिकाणी अभिवाचनाचे कार्यक्रम होत असतात. त्‍यांचे वृत्तांत, बातम्‍या वर्तमानपत्रांतून अधुनमधून प्रसिद्धही होतात. अभिवाचनात प्रामुख्‍याने कविता आणि कथा यांचा समावेश असतो. काही ठिकाणी स्‍वरचित साहित्‍याचेही अभिवाचन केले जाते. विजया मेहता यांचे ‘झिम्मा’ प्रसिध्द झाले तेव्हा नाना पाटेकर, सुहास जोशी यांनी त्यातील उतारे वाचले, तेदेखील अभिवाचन म्हटले गेले. प्रकाशक अभिवाचन नव्या पुस्तकांच्या प्रसिध्दीसाठी उपयोगात बर्‍याच वेळा आणतात. ते तो प्रकाशन कार्यक्रमाचा भाग समजतात. तेवढ्यापुरते ते खरे असतेही.

चित्रकलेचे बाजारीकरण

प्रतिनिधी 27/11/2012

चित्रकलेबद्दलची रसिकता संग्राहक ते खरेदीदार ते गुंतवणूकदार अशी बदलत गेली आहे. चित्रकलेचे त्यामधून घडून आलेले बाजारीकरण कोणी रोखू शकणार नाही. खरे तर, ते नैतिकतेचे बाजारीकरण आहे, अशा आशयाचे उद्गार प्रसिध्द चित्रकार प्रभाकर कोलते यांनी रविवारी झालेल्या दिवसभराच्या ‘विचारमंथना’त काढले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल आणि ‘साने केअर ट्रस्ट’ या संस्थांच्या वतीने खोपोलीजवळच्या ‘माधवबागे’त दर महिन्याच्या चौथ्या रविवारी एकेका क्षेत्रातील मान्यवर जमतात आणि त्या त्या विषयातील विविध मुद्यांची सखोल चर्चा करतात.

अभाव व्यंगचित्रांच्या साक्षरतेचा


       आपल्‍याकडे एकूण चित्रकलेची आणि व्‍यंगचित्रांची जाण कमी आहे. शंभर वर्षे होऊन गेली तरीही वाचक-प्रेक्षक चित्र जसेच्‍यातसे अपेक्षित करतात किंवा व्‍यंगचित्र ढोबळ असले तरी आनंद मानतात. जीवन गुंतागुंतीचे होत जाते तेव्‍हा कला अधिकाधिक सूक्ष्‍म होत जाते, हा साधा विचार त्‍यांना स्‍पर्श करतो असे वाटत नाही. त्‍यामुळे चित्रकला व त्‍याचा एक विभाग व्‍यंगचित्रकला याबद्दलची साक्षरता वाढली पाहिजे असे वाटते.

       ‘व्‍यंगचित्रे’ या विषयावरील तीन वेगवेगळ्या दृष्‍टीकोनातील लेखन ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध करत आहोत. व्‍यंगचित्र कलेचा प्रवास, त्‍या कलेशी संबंधित असलेल्‍या व्‍यक्‍ती असे स्‍वरूप मांडत असताना नुकत्‍याच झालेल्‍या व्‍यंगचित्र वादावरील एक टिपण येथे उद्धृत करत आहोत.

अभिजात वाचकाच्या शोधात!


अभिजात साहित्य आणि अभिजात वाचक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत; तरीदेखील ज्याच्या वाचनात अधिकाधिक ग्रंथ येतात तो अभिजात वाचक असे म्हणता येईल अशी सुटसुटीत व्याख्या प्रसिध्द लेखक-आस्वादक संजय भास्कर जोशी यांनी ‘अभिजात वाचकाच्या शोधात’ या विषयावरील दिवसभराच्या चर्चासत्रात केली. त्या ओघात अभिजाततेचा अनेकांगांनी विचार घडून आला. त्यामध्ये अरुण साधू, सतीश काळसेकर, अशोक नायगावकर, दिनकर गांगल, रविप्रकाश कुलकर्णी असे ग्रंथव्यवहारामधील अनुभवी लोक सहभागी झाले. चर्चासंचालन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांनी केले. के. ज. पुरोहित व सुनील कर्णिक चर्चासत्रास पोचू शकले नाहीत. त्यांनी पाठवलेली टिपणे वाचून दाखवण्यात व प्रसृत करण्यात आली.

अभिजात वाचकाच्या शोधात


     ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि ‘माधवबाग’चा साने केअर ट्रस्ट यांनी वेगवेगळ्या विषयांवर दिवसभराच्या सखोल विचारमंथनाचा आगळावेगळा उपक्रम येत्या कोजागिरीचे निमित्त साधून सुरू करण्याचे ठरवले आहे. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी ‘माधवबागे’च्या खोपोलीजवळच्या आरोग्यकेंद्रात या चर्चा घडून येतील. पहिले ‘विचारमंथन’ ‘अभिजात वाचकाच्या शोधात’ या विषयावर अरुण साधू, सतीश काळसेकर, संजय भास्कर जोशी, सुनील कर्णिक व ‘ग्रंथसखा’ श्याम जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, २८ ऑक्टोबरला सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळात होणार आहे. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार संचालन करतील. त्यांना सहाय्य साधना गोरे यांचे आहे. चर्चेचे स्वरूप गोलमेज धर्तीचे असणार आहे. त्यामुळे उपस्थितांतील इच्छुकांना चर्चेत भाग घेता येईल.

     समाजातील वाचन कमी होत आहे/वाढत आहे याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे दावे मान्यवरांकडून होत असतात. मल्टिमीडियाच्या वातावरणात वाचनाचे स्थान काय? त्यापलीकडे स्वत:त मग्न असा शोधक वाचक असतो का? त्याला धुंडाळायचे कुठे व कोणी? असे मुद्दे त्या दिवशीच्या चर्चेमध्ये यावेत हे अपेक्षित आहे. ज्या मंडळींना या कार्यक्रमास यायचे असेल त्यांनी महेश खरे यांना ९३२०३०४०५९ या नंबरवर कळवावे.

- संपादक
thinkm2010@gmail.com

अभंग आणि गझल


अरूण भालेराव हे बहुश्रृत वाचक-अभ्‍यासक आहेत. ते वेगवेगळ्या विषयांवर सातत्‍याने लेखन करत असतात. त्‍यांचा अभंग आणि गझल यांच्‍यासंबंधातील लेख वाचनात आल्‍यावर तो आम्‍हाला महत्त्वाचा वाटलाच, परंतु त्‍याचबरोबर त्‍यासंबंधात चर्चा घडून यावी असेही वाटले. त्‍यामुळे गझलकार आणि गझलचे अभ्‍यासक सदानंद डबीर यांच्‍याकडे आम्‍ही भालेराव यांचा ‘तुकाराम महाराजांच्‍या गझला’ हा लेख अभिप्रायार्थ दिला. सदानंद डबीर यांनीदेखील तो लेख वाचून त्‍यावर आपले टिपण - ‘अभंगात गझलेचा शोध - एक व्‍यर्थ खटाटोप’ - सादर केले. हे दोन्‍ही लेख वादचर्चा स्‍वरूपात ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर सादर करत आहोत. वाचकांनी त्‍यावर आपली टिकाटिप्‍पणी करावी अशी इच्‍छा आहे.

- संपादक
thinkm2010@gmail.com

मराठी माणसाचा न्यूनगंड...


सुजाता आनंदन 'हिंदुस्थान टाइम्स' मध्ये दर बुधवारी मुख्यत: महाराष्ट्रा बाबत एक स्तंभ लिहितात. त्यामधून त्यांची या राज्याबाबतची व येथील माणसांबाबतची चांगली आस्था दिसून येते. त्यांचे राजकीय नेत्यांबरोबरचे संबंधही उत्तम आहेत. त्यांनी बाळ ठाकरे व ठाकरे घराणे याबद्दल अनेक वेळा प्रेमपूर्वक लिहिल्याचे आठवते...
 

मात्र त्यांनी 10 नोव्हेंबर 2009 च्या 'हिंदुस्थान टाइम्स' मध्ये लिहिलेला प्रसंग धक्कादायक आणि महाराष्ट्राच्या वर्मावर अचूक बोट ठेवणारा वाटला. त्यांनी नमूद केलेले निरीक्षण असे:

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अलिकडे झाली. त्या आधीच्या प्रचारकाळात 'टाइम्स नाऊ' च्या अर्णव गोस्वामी ने राज ठाकरेची मुलाखत घेतली, तेव्हा इंग्रजी वाहिनीवर राजने आपण मराठीतच बोलणार असा आग्रह धरून भाषेसंबंधातील अस्मिता प्रकट केली. परंतु त्याने मराठीतून बोलणे पसंत केले याचे साधे कारण, त्याला इंग्लिश येत नाही हे होय!
 

सुजाता आनंदन यांचा अनुभव असा आहे, की राजला काही इंग्रजी शब्द एकमेकांशी जुळवून प्राथमिक स्वरूपाचे इंग्रजी बोलता येत नाही. यामुळे त्याच्यामध्ये एक न्यूनगंड तयार झालेला आहे. सुजाता आनंदन यांनी तसा एक प्रसंग त्यांच्या लेखात नोंदला आहे. त्या लिहितात,

बैलपोळ्यावर संक्रांत


‘गरिबाची बायको आणि शेतकऱ्याचा बैल आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. आणि यंदातर दुष्काळाच्‍या माराने शेतकरीच आजारी पडला आहे. याचे पडसाद उमटलेले दिसताहेत ते बैलपोळ्याच्या सणावर. राज्यातील तीव्र दुष्काळामुळे बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरवर्षी खेड्यापाड्यातून मोठ्या उत्सा‍हाने साजरा होणा-या बैलपोळ्यांला यंदा रंगच चढला नसल्याचे चित्र राज्यात दिसून आले.

बळीराजावर चारा छावण्‍यांमध्‍ये बैलपोळा साजरा करण्‍याची पाळी आलीभयावह दुष्काळामुळे चारा व पाणी टंचाईने ग्रासलेल्या शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी दुष्काळी भागांसाठी काही ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरे दाखल केली. स्वतः शेतकरीही छावणीतच आश्रयाला होते . त्यामुळे बळीराजाला यंदाचा बैलपोळा चारा छावण्यांमध्येच साजरा करण्याची वेळ आली. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे बैलपोळा केवळ बैलपूजेपुरताच मर्यादीत राहिला. यावर्षी अतिवृष्टीने बैल सतत पाण्यातच आहेत. शेतात पाण्याचे डोह साचले असल्याने शेतातील कामे बंद आहेत. या कारणांमुळे बैलपोळ्याच्या मिरवणुका, बैलांच्या शर्यती आणि बैलपोळ्याशी निगडीत प्रथा पार पाडण्यात शेतक-यांचा फारसा उत्साह दिसून आला नाही.
 

थिंक महाराष्‍ट्रः प्रगतीची पावले


- दिनकर गांगल

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप, मग प्रतिसाद उबदार व धो-धो का येत नाही? कारणे दोन आहेत: एक तर ज्या पिढीला फुरसत आहे व जी पिढी सुखस्वस्थ आहे तिला संगणक, महाजाल या गोष्टी दूरच्या वाटतात, आपल्या जमान्याच्या वाटत नाहीत. उलट, जी पिढी या माध्यमाजवळ आहे ती जीवनसंघर्षात, करिअरच्या प्रगतीत गुंतली आहे. तिला ‘फेसबूक’,ट्विटर्’ ही दैनंदिन गप्पाष्टकांची सदरे फार प्रिय असतात. थोडे वेगळे आणि अधिक ओळखीचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. हे अत्यंत उपयुक्त साधन, परंतु त्यावरील सत्तर ते ऐंशी टक्के संभाषण ही निव्वळ बडबड असते. पण विचार असा करू या, की एरवी घरात तरी असाच वायफळपणा चालू असतो ना? (असायचा ना?) घराघरातली माणसे कमी झाली म्हणून ती गरज मोबाईल फोनमधून जनात भागवली जाते. टेलिव्हिजनवरच्या ‘सोप’ दैनंदिन मालिकांची महती तीच सांगतात. राहण्याची घरे, जागा आणि माणसे या दोन्ही गोष्टींनी लहान झाल्यावर मोठ्या कुटुंबाची गरज सासू-सून-दीर-भावजया अशा, मालिकांतील नाट्यातून, एकत्रितपणातून भागवली जाते. असो.
 

‘थिंक महाराष्ट्र’ची संकल्पना Think Maharashtra Link Maharashtra अशी माणसांना जोडण्याची असल्याने ती लोकांना पसंत पडते. आतापर्यंत आपण परभणी, नांदेड, अंबाजोगाई, लातूर, धुळे, अमरावती, येथे बैठका घेऊन, तेथे मोठ्या पडद्यावर ‘थिंक महाराष्ट्र’चे पोर्टल दाखवून अनेक माणसांना या जाळ्यात आणले आहे.