अथर्व दीक्षितला हाक प्रकृतीची!


_AtharvDixitla_HakkaPrakrutichi_1.jpgछायाचित्रकार अथर्व दीक्षित या कल्याणमधील (ठाणे जिल्हा) युवकाने त्याच्या अमित बाळापुरकर आणि मयुरेश देसाई या मित्रांसह 'प्रकृती कला मंच' संस्थेची स्थापना केली आहे. हौशी कलाप्रेमींना त्यांची कला सादर करता यावी, त्यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश संस्था स्थापन करण्यामागे आहे. संस्थेच्या कार्याला छायाचित्रे व चित्रे यांचे एकत्रित असे प्रदर्शन भरवून 2 ऑक्टोबर 2015 पासून सुरुवात करण्यात आली. ते प्रदर्शन 'गायन समाज' (कल्याण) येथे तळमजल्यावर मांडण्यात आले होते. त्यामध्ये अठरा नवीन कलाकार सहभागी झाले होते. दीडशेच्यावर चित्रे व छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट होती. प्रदर्शनाचे उद्घाटन शिल्पकार भाऊ साठे यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये कलाकारांच्या वीस फ्रेमची विक्रीदेखील झाली.

अतुल धामणकर - वन्यजीवनाचे भाष्यकार (Atul Dhamankar)


अतुल धामणकर गेली वीस वर्षें जंगलात फिरत आहे. त्याने आयुष्याची तेवीस वर्षे ‘ताडोबा अंधारी व्याघ्रजतन प्रकल्प’ या व भारतातील इतर अभयारण्यांत अभ्यासासाठी घालवली; हरीण आणि वाघ यांचे जवळून निरीक्षण केले. अतुलला त्याचे वीस वर्षांचे ताडोबातील रात्रीबेरात्रीचे खडतर, त्रासदायक वास्तव्य आणि त्याला शालेय जीवनापासून अरण्याबद्दलची असणारी आवड... या गोष्टी जपून ठेवाव्याशा वाटतात. त्याने सुरुवातीला घरच्यांचा विरोध पत्करून स्वतःच्या आवडीचा ध्यास सुरू ठेवला. आता आईबाबा, पत्नी- सगळे त्याला सहकार्य करतात. त्याचा धाकटा भाऊ आशीष हा तर जंगलातील मोहर्ली गावातच स्थायिक झाला आहे. अतुलचे आईबाबाही तेथे राहतात!

अतुल शाळेत असताना चंद्रपूरजवळील जुनोनाच्या जंगलात पक्षीनिरीक्षणासाठी जात असे. त्याची आवड इतर मुलांपेक्षा वेगळी होती. अतुलला संदर्भ म्हणून त्यावेळी पुस्तके मिळत नव्हती. नातेवाईक त्याच्यासाठी पुस्तके आणायचे, पण ती त्याच्या छंदासाठी उपयोगाची नसत. अतुलने त्याचा छंद सातत्याने जोपासला. अतुलची बारावी झाली. इतर मुले डॉक्टर वा इंजिनीयर होण्यासाठी धडपडत असताना, अतुलने मात्र करिअर म्हणून जंगल निवडले!

कलामहर्षी केकी मूस

प्रतिनिधी 15/09/2015

लपली आहे ती सर्व कला!

कलामहर्षी केकी मूस यांचा जन्म २ ऑक्टोबर १९१२ रोजी झाला. त्यांना बाबुजी म्हणत. बाबुजी हे पारशी समाजात जन्मले, ते तहहयात अविवाहित राहिले. त्यांची आई पिरोजाबाई सात्त्विक, प्रेमळ अन् दयाळू होत्या. वडील माणेकजी शांत, संयमी, सुशील व हिशोबीदेखील होते.

बाबुजींचा जन्म मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत – मलबार हिल येथे त्यांच्या मामांच्या घरी झाला. मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. त्यांचे नाव आर.सी. नरिमन. मुंबईतील समुद्रकाठच्या एका टोकाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे - नरिमन पॉर्इंट. मामांनी केकींचे शिक्षण- प्राथमिकपासून तर महाविद्यालयापर्यंत मुंबईत केले. केकींनी १९३३ साली पदवी प्राप्त केली.

मामा अविवाहित होते. त्यांनी केकीला त्यांचा मुलगा मानले होते. केकीने पदवी प्राप्त होताच लंडनला जाऊन कलाशिक्षण घेण्याची इच्छा प्रकट केली. परंतु मामाला त्यांचा उद्योग व्यवसाय केकीने सांभाळावा असे वाटत होते. केकी हट्टी होते. ते म्हणाले, “मामा कोठलेही ऐश्वर्य मला माझ्या निर्णयापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही.” ते ऐकल्यावर मामा भडकले. त्यांनी केकींना त्यांच्या आईबाबांकडे पाठवून दिले. केकींनी त्यांची बॅग भरली व त्याच मिनिटाला मामांचा बंगला सोडला व रात्रीची कलकत्ता मेल धरली.

अजिंठ्यातील 'प्रसाद'


“बुध्द माझ्या आयुष्यात कधीच नव्हता...आणि आता, त्याच्याशिवाय दुसरा विचार माझ्या मनात येत नाही.” प्रसाद पवार त्याच्या आयुष्यातील परिवर्तनाबद्दल बोलत होता.
 

प्रसादला तीन डोळे आहेत. दोन डोळे आपल्या सगळ्यांना असतात तसे आणि त्याचा तिसरा डोळा आहे, त्याचा कॅमेरा! त्याच्या तिस-या डोळ्याला समोर जे, जसे आहे ते दिसतेच, पण त्याही पलीकडे जे अव्यक्त व अनंत आहे तेही जाणवते. त्या जाणिवेतूनच, तो सध्या एका प्रकल्पावर झपाटल्यासारखा काम करत आहे. त्याचा संबंध आहे दोन हजार वर्षांपूर्वी अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये रंगवल्या गेलेल्या चित्रांशी. प्रसादने त्याला स्वत:ला त्या वेळचे सामाजिक जीवन, राहणीमान, कला, जीवनशैली यांविषयी तपशिलात जाऊन बोलणा-या त्या चित्रांचा सांभाळ व्हावा यासाठी वाहून घेतले आहे.
 

भारतीय चित्रपटांचा वारसा

प्रतिनिधी 20/05/2010

 

 

भारतीय चित्रपटांचा वारसा जिथं जिवंत होतो...

'राजा हरिश्चंद्र'... चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेलं मोठं वरदानच. भारतीय चित्रपटसृष्टीचं 1913 साली सुरू झालेलं पर्व चित्रपट रसिकांना सतत उत्तमोत्तम कलाकृती देत आलं आहे.

विविध भाषा, प्रांत आणि संस्कृतींमुळे समृध्द होत गेलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीला काळानुरूप मिळालेली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तिची उंची वाढवणारी ठरली. महाकाव्यांपासून अभिजात साहित्यकृतींपर्यंत आणि भावनिक विषयांपासून नवीन तंत्रज्ञानाला गवसणी घालणारे चित्रपट हे या सृष्टीचं वैभव. भारतात आज तर, दरवर्षी सुमारे एक हजार चित्रपट तयार होतात!

देशात निर्माण होणारा चित्रपटांचा हा खजिना जतन करण्याचं महत्त्वाचं काम पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे केलं जातं. पुण्यातील लॉ कॉलेज रोड परिसरात असलेल्या फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) अर्थात तेव्हाच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या परिसरात १९६४ साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची (नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया - एनएफएआय) स्थापना करण्यात आली. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा माध्यम विभाग असलेलं हे संग्रहालय भारतीय चित्रपटसृष्टीच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे. पुणे हे या कार्याचं मुख्यालय असून बंगळुरू, कोलकाता आणि तिरूवनंतपुरम् अशा तीन ठिकाणी एनएफएआयची विभागीय कार्यालयं आहेत. सुमारे सहा हजार चित्रपट, दोन लाख पोस्टर्स आणि फोटोग्राफ यांचं उत्तम कलेक्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आहे.

Where The Heritage of Indian Cinema Comes Alive... हे ब्रीद असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. भारतीय चित्रपटांचा इतिहास, त्यांची परंपरा, त्यांतील विविध पैलू, वैशिष्ट्ये आणि त्यातील कलेचे कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोचवणे हा या संग्रहालयाचा उद्देश आहे. भारतीय चित्रपटांबरोबरच विदेशांतील, विविध भाषांमधील चित्रपट भारतीय अभ्यासकांना येथे उपलब्ध करून दिले जातात. केवळ चित्रपट नाही तर त्याच्याशी संबंधित साहित्य, फोटो, गाण्यांची बुकलेट्स आणि पोस्टर्स हे साहित्यदेखील भारतीय चित्रपटांच्या अभ्यासासाठी मोलाचं ठरत आहे. देशभरात चित्रपटविषयक संस्कृतीचा प्रसार आणि परदेशामध्ये भारतीय चित्रपटांचा प्रचार करण्याचं कार्य या विभागातर्फे केलं जातं. पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावरील बॅरिस्टर जयकर बंगल्याच्या परिसरात एनएफएआयच्या कार्याचा विस्तार अधिक जोमानं झाला.

चित्रपटाशी संबंधित विषयांमध्ये संशोधन करणा-या व्यक्तींना केवळ प्रोत्साहन देण्याचं नाही तर त्यासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम एनएफएआयतर्फे केलं जातं. चित्रपटांच्या विविध पैलूंवर आधारित उपक्रम इथं राबवले जातात. भारतीय चित्रपटांचा इतिहास हा पैलू तर अधिक प्रभावीपणे हाताळला जातो.

अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील एक पॅनल : जब्बर पटेल, मोहन आगाशे सहभाग

चित्रपटांविषयीचा अभ्यास करणारे संशोधक आणि विद्यार्थी यांच्यासाठी संग्रहालयातील चित्रपट, व्हिडिओ कलेक्शन, डॉक्युमेंटेशन विभाग आणि ग्रंथालयांची कवाडं कायमच खुली असतात. एनएफएआयच्या सुसज्ज अशा ग्रंथालयात चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलांवर आधारित पुस्तकं आणि नियतकालिकं अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत. अशा प्रकारची पुस्तकं आणि नियतकालिकं वाचकांना उपलब्ध करून देणारं देशातलं हे एकमेव ग्रंथालय आहे. इथं असलेली चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर जगभरातून प्रसिध्द झालेली सुमारे 25 हजार पुस्तकं म्हणजे अभ्यासक-वाचकांसाठीचा खजिनाच आहे. मुख्य म्हणजे अभ्यासकांच्या संदर्भासाठी बांधणी स्वरूपात करून ठेवण्यात आलेले 1920 पासूनचं सेन्सॉर रेकॉर्ड आणि 1930 पासूनचे भारतीय चित्रपटविषयक मासिकांचे बांधणी केलेले व्हॉल्युम्स, तसंच संदर्भ आणि अभ्यासासाठी महत्त्वाचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे.