‘नॉ लिंग’ : रेवदंडा गावाजवळ सापडले दुर्मीळ भाषेचे धन
कोरलई हे रायगड जिल्ह्यातील रेवदंड्याच्या खाडीच्या पलीकडे असणारे छोटेसे गाव. ते अलिबागपासून बावीस किलोमीटरवर आहे. ते रेवदंड्याच्या खाडीत घुसलेल्या भूभागावर वसलेले आहे. कोकण किनारपट्टीवर वसलेल्या कोठल्याही छोट्या गावासारख्याच खाणाखुणा अंगावर वागवणारे. शेती आणि मासेमारी हा तेथील मुख्य व्यवसाय. पण तेथील एक गोष्ट विशेष आहे - आणि ती एकमेवाद्वितीय आहे! ती म्हणजे तेथे बोलली जाणारी भाषा. ती भाषा त्या गावाव्यतिरिक्त जगात इतरत्र कोठेही बोलली जात नाही.