एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास


 रेणू गावसकर‘UNTO THE LAST’ हा विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आयुष्याची पंचवीस-तीस वर्षे झटणारी, अतिशय संवेदनाशील, प्रेमळ, मुलांवर माया पाखरणारी आणि त्याचबरोबर नम्र आणि साधी स्त्री म्हणजे रेणू गावसकर .

वेश्यांची, व्यसनाधीनांची व रस्त्यावरची मुले - त्यांच्यावर आईचे संस्कार करणारी, आरोग्याची देखभाल करणारी रेणुताईंनी उभी केलेली संस्था म्हणजे ‘एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास’. पुण्याच्या भाजी मंडईमागे ही संस्था 2003 पासून कार्यरत आहे.

समाजातील वंचितांकरता काम करणार्‍या किंवा समाजातील अन्यायाविरुध्द झगडायला प्रवृत्त होणा-या बहुतेक व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक दु:खातून संवेदनशील होतात आणि मग स्वत:ला समाजाच्या प्रश्नांमध्ये झोकून देतात.

हरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी

प्रतिनिधी 16/09/2011

झाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून पदभ्रमण करायला हवे! वाढत्या शहरी जीवनात आपण निसर्गापासून दूर जाताना झाडांना पारखे होत आहोत. शतकानुशतके तग धरून असलेले शेकडो जातींचे वृक्ष आपणांस अपरिचित आहेत.

‘कदंब तरुना बांधून झोके...... उंचखालती झोके........’ अशी गाणी ऐकताना ‘कदंब’ आपल्या डोळ्यांपुढे येत नाही, कारण तो आपणास अपरिचित असतो आणि गाणे ऐकून आपण सुखावतो ते कल्पनेनं; पण गोल काटेरी सुबक फळे, अंगावर मिरवणारा कदंब आपण पाहिलेला असेल तर त्या गाण्याचा प्रत्यय अधिक खोलवर येऊ शकतो आणि हिरवाईचा सुखानंद प्रदीर्घ काळ टिकू शकतो. मुचकुंदाचे सोनेरी तांबडे फूल व त्याचा थोडासा उग्र तरी सुखद हवाहवासा गंध ही झाडे शहरांतून नाहीशी झाल्याने स्मृतीतच उरला आहे!

मानवाने वृक्षांचा भरपूर उपयोग करून घेतला, जंगले तोडून लाकडी सामानाने घरे सजवली, परंतु तो पुढील पिढ्यांसाठी आणखी खूप झाडे लावण्याचे विसरला!

या संदर्भात मुंबईजवळच्या ठाणे येथील ‘हरियाली’ या संस्थेचे कार्य डोळ्यांसमोर येते. ही संस्था वृक्षसंवर्धन व पर्यावरणजतन या क्षेत्रांत अनेकविध उपक्रम हाती घेऊन गेली एकोणीस वर्षे कार्यरत आहे.

डिस्कव्हरी सायन्स सेंटर


वैज्ञानिक शोधांची अद्भुत दुनिया

 

डिस्कव्हरी सायन्स सेंटरसूर्य का उगवतो? रबर कसे बनते? लाकूड पाण्यात का तरंगते? आकाश निळे का दिसते? हे प्रश्न विचारले आहेत परभणी जिल्ह्यातल्या तांदुळवाडी, केंजलगाव, शिरपूर अशा छोट्या छोट्या खेड्यांतल्या आठ-दहा वर्षे वयाच्या मुलांनी. निमित्त आहे ‘कुतूहल जगत’ मासिक पत्रिकेत येणा-या विविध माहितीचे.

‘ज्ञान आपल्या घरी’ या उपक्रमांतर्गत ही चार पानी पत्रिका दर महिन्याला प्रसिध्द होते. अनेकरंगी छपाई असलेल्या या पत्रिकेत कोडी-माहिती-प्रश्नोत्तरे-प्रयोगमाला-चरित्रं असं विविध साहित्य असतं. त्यात भरपूर चित्रं-छायाचित्रं असतात. पाहताक्षणी आकृष्ट व्हावं असंच पत्रिकेचं रूप आहे.

ही कल्पना अजिंक्य कुलकर्णीची. तोच पत्रिकेचं संपादन करतो आणि नवनव्या कल्पना लढवत असतो. त्याला अभिजित संघई, विष्णू जाधव, गौळण शिंदे अशा तरूण चमूची साथ आहे. पण ही पत्रिका हेदेखील एका मोठ्या प्रकल्पाचं छोटं पिल्लू आहे. तो प्रकल्प आहे ‘डिस्कव्हरी सायन्स सेंटर’चा.

नीलिमा मिश्रा - ऐसी कळवळ्याची जाती


आशिया खंडातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणा-या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं आतापर्यंत पंचेचाळीसहून अधिक भारतीयांना सन्मानित करण्यात आलं आहे. या प्रभावळीतील नवीन नाव आहे, धुळे-जळगावच्या नीलिमा मिश्रा . या पुरस्कारासाठी निवड झालेली देशातील ती सर्वांत तरुण महिला आहे. 

महाराष्ट्राच्या नकाशात ठिपक्याएवढं अस्तित्व असणा-या बहाद्दरपूर या खेड्यातील तिच्या ग्रामरचनेच्या कार्याला हा पुरस्कार मिळाला आहे. या ग्रामरचनेत आर्थिक स्वयंपूर्णतेबरोबर स्वच्छतेलाही तितकंच महत्त्व आहे. म्हणूनच तिथं बचतगट स्थापना, विपणनव्यवस्था, उद्योजकता यांबरोबरच शौचालय-बांधणीच्या कामालाही प्राधान्य दिलं गेलं आहे. स्वयंपूर्ण ग्राम आणि ग्रामस्थांचा विकास या ध्यासानं झपाटून काम करणा-या नीलिमा मिश्रा या झंझावाताची ही कहाणी आहे.

बहाद्दरपूर हे धुळे–जळगावच्या सीमेवरचं छोटंसं खेडं. अल्प उत्पन्न देणारी शेती आणि महाराष्ट्रातील विकासाच्या वाटांपासून दूर वसलेलं हे गाव. मिश्रा कुटुंबाच्या साताठ पिढ्या तिथंच नांदल्या. खाऊनपिऊन सुखी असलेल्या मिश्रा कुटुंबानं स्वत:भोवती सुखी सुरक्षिततेचा कोष मात्र विणला नाही.

श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा

प्रतिनिधी 09/09/2011

श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखाझाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या स्वत:बरोबरच सभोवतालच्या माणसांची वाचनाची भूक वाढवतात आणि शमवतातदेखील! त्या झाडांसारखी.. निरलस भावनेने.. प्रौढी न मिरवता. सभोवतालच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून दरवेळी प्रवाहाच्या विरुद्धच पोहायला हवे असे नाही, तर प्रवाहाबरोबर राहतानासुद्धा आपल्याला हव्या त्या दिशेला जाता येते, हे काही माणसे आपल्या कृतीतून दाखवून देतात.

‘उडान- एक झेप’


 कर्जंतमधल्या कोकण ज्ञानपीठ इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये शिकणारे काही मित्रमैत्रिणी आणि काही बायो-टेक, कॉमर्स पदवीधर व डॉक्टर (B.A.M.S.) अशा वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी-मित्र एकत्र आले. ‘समाजासाठी काहीतरी करायचं, काही अंशी समाजाचं ऋण फेडायचं’ ही भावना, हा त्यांच्यामधला समान दुवा होता. समाजसेवा, समाजसुधारणा ह्या फक्त बोलायच्या गोष्टी नसतात तर स्वत:ला जमेल त्या प्रमाणात काही केलं तर त्यांतून आनंद निर्माण होतो हे त्यांना समजलं आहे. ह्या तरुणांनी त्यांच्या कॉलेजच्या आसपास जी खेडी, पाडे आहेत तिथल्या मुलांच्या जीवनाचा थोडाफार अनुभव ‘रिसर्च वर्क’च्या काळात घेतला होता. त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी करुया असं वाटत होतं, पण दिशा सापडत नव्हती. एका ट्रेकमध्ये ती दिशा सापडली.

 

शाळाबाह्य मुले- यशोगाथा आणि आव्हाने


 

हेरंब कुलकर्णी

शाळेत येणा-या विद्यार्थ्‍यांना शिकवण्‍यासोबत, जी मुले शाळेबाहेर आहेत; त्‍यांना शाळेत आणून सुशिक्षीत करण्‍याची जबाबदारी शिक्षकांवर पडलेली आहे. अनेक शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून हे कार्य सजगतेने केल्‍याचे आढळते. गडचिरोलीपासून यवतमाळपर्यंत सर्वत्र सेतुशाळांमार्फत मोठ्या प्रमाणात 2004पासून मुले शाळांत दाखल झाली आणि टिकलीही. शाळाबाह्य मुलांना नियमितपणे शाळेत आणणे आणि त्‍यांना शिक्षणाची गोडी लावणे हे शिक्षकांसमोरील एक आव्‍हानच म्‍हटले पाहिजे. ही आव्‍हाने आणि त्‍यासाठी केलेल्‍या प्रयत्‍नांच्‍या यशोगाथा यांचा हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षकदिनाच्‍या निमित्‍ताने घेतलेला हा आढावा...

- हेरंब कुलकर्णी

गावांचा सहभाग मोलाचा!


जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था ही आकुर्डी(पुणे) येथे आहे. ही संस्था बजाज उद्योग समूहा शी संलग्न आहे. ती ग्रामविकासाचे महत्त्व लक्षात घेऊन पुणे, औरंगाबाद व वर्धा आणि सिकर (राजस्‍थान) परिसरातील एकूण शंभर गावांना साहाय्य करत आहे. ‘निवडक गावांतील ग्रामीण समाजाचे राहणीमान सुधारण्यासाठी, दारिद्र्यनिर्मूलन, आरोग्यरक्षण, महिलांचे सबलीकरण, न्याय, स्त्री-पुरुष समान अधिकार यांसाठी प्रयत्न हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या गावांनी आपला आदर्श प्रस्थापित करावा म्हणून ग्रामस्थांनी स्वेच्छेने, प्रामाणिकपणे सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे. संस्थेत प्रत्येक योजना विचारपूर्वक आखली जाते. तेथील शिस्त आणि आदब हे गुण घेण्यासारखे आहेत. स्वयंसेवी संस्थांनी कॉर्पोरेट व्यवस्थापानाचा मार्ग अंगिकारायला हवा आहे. त्यामुळे कामे व्यवस्थित, ठऱल्यावेळी व रास्त खर्चात तर होतीलच, पण त्याचबरोबर जनतेचा विश्वासही दुणावेल, हा मंत्र जानकीदेवी संस्थेत छानपैकी जाणवतो.

मृणालिनी-उमा ह्यांची मायेची सावली


पुण्यात उपेक्षित वर्गातल्या, विशेषत: वेश्यांच्या मुलांसाठी काम करणारा ‘सावली सेवा ट्रस्ट’, हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. 2003 सालापासून कार्यरत असलेल्‍या या ट्रस्टने आतापर्यंत अनेक मुलांवर मायेची सावली धरली आहे!

मृणालिनी भाटवडेकर आणि उमा इनामदार या दोघी, संवेदना जाग्या असलेल्या आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव असलेल्या गृहिणी. त्या दोघींनी मुलांसाठी काम करणा-या एका समाजसेवी संस्थेतून कामाला सुरुवात केली. मृणालिनी आणि उमा यांनी, मूळ संस्थेतून तेथील एका गुणी मुलीला बाहेर काढले गेले तेव्हा संस्थेची कार्यपद्धत न पटल्यामुळे तिची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिथेच त्या दोघींच्या स्वतंत्र कार्याची आणि ‘सावली सेवा ट्रस्ट’ची बीजे रोवली गेली.

जप्तीवाले!


सुनंदा आणि चंद्रहास जप्‍तीवालेवंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्‍याचे नाव सुनंदा आणि चंद्रहास जप्तीवाले. दोघांचे वय पन्नाशीच्या अलिकडे-पलीकडे. चंद्रहासांनी बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मग आपल्‍या हाती असलेल्‍या वेळेचा सदुपयोग करायचे उभयतांनी ठरवले आणि आपल्या घराजवळच्या पालिकां शाळेतील अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी सुट्टीच्या काळात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ शिबिर आयोजित केले, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांच्या सहकार्याने.